फेब्रुवारी २७
Jump to navigation
Jump to search
<< | फेब्रुवारी २०२१ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ |
फेब्रुवारी २७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ५८ वा किंवा लीप वर्षात ५८ वा दिवस असतो.
ठळक घटना[संपादन]
सोळावे शतक[संपादन]
- १५६० - बर्विकचा तह - इंग्लंड व स्कॉटलंडने फ्रान्सला स्कॉटलंडमधून घालवून देण्याचे ठरवले.
- १५९४ - हेन्री चौथा फ्रान्सच्या राजेपदी.
अठरावे शतक[संपादन]
- १७०० - न्यू ब्रिटन या पापुआ न्यू गिनीतील बेटाचा शोध लागला.
एकोणिसावे शतक[संपादन]
- १८०१ - वॉशिंग्टन डी.सी. अमेरिकन कॉंग्रेसच्या अखत्यारीत आले.
- १८४४ - डॉमिनिकन प्रजासत्ताकला हैती पासून स्वातंत्र्य.
- १८५४ - झांसी संस्थान ईस्ट इंडिया कंपनीने ताब्यात घेतले. गव्हर्नर लॉर्ड डलहौसीने झांसी संस्थानचे प्रमुख राजे गंगाधरराव नेवाळकर यांनी घेतलेला दत्तक नामंजूर केला. याचा धक्का बसून गंगाधररावांचे निधन झाले. राणी लक्ष्मीबाई यांनी ब्रिटिशांच्या अन्यायाविरुद्ध लढण्याचे ठरवले.
- १८७९ - सॅकेरिन या साखरेसारख्या मानवनिर्मित गोड पदार्थाचा शोध.
विसावे शतक[संपादन]
- १९०० - ब्रिटिश लेबर पार्टीची स्थापना.
- १९१२ - वि. वा. शिरवाडकर यांचा जन्म.
- १९३३ - जर्मनीच्या संसदभवनाला आग लागली.
- १९४२ - दुसरे महायुद्ध - जपानच्या लढाऊ विमानांनी अमेरिकेचे विमानवाहू जहाज यू.एस.एस. लॅंगली बुडवले.
- १९४३ - बेर क्रीक, मॉन्टाना येथे एका खाणीत स्फोट. ७४ ठार.
- १९५१ - अमेरिकेच्या संविधानातील २१वा बदल - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची कारकीर्द जास्तीत जास्त दोन मुदतीं(८ वर्षे)पुरतीच.
- १९६३ - हुआन बोश डॉमिनिकन प्रजासत्ताकच्या राष्ट्राध्यक्षपदी आले.
- १९६७ - डॉमिनिकाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
- १९८९ - व्हेनेझुएलामध्ये जनक्षोभ.
- १९९१ - कुवैतला इराकी सैन्यापासून मुक्ती.
- १९९८ - मुंबईत कांदिवली व विरार रेल्वे स्टेशनमध्ये बॉम्बस्फोट. ३ ठार .
- १९९९ - ओलुसेगुन ओबासान्जो नायजेरियाच्या राष्ट्राध्यक्षपदी.
एकविसावे शतक[संपादन]
- २००१: जमिनीवरून आकाशातील अनेक लक्ष्यांवर मारा करू शकणार्या आकाश या देशी बनावटीच्या क्षेपणास्त्राची चंडीपूर तळावर यशस्वी चाचणी.
- २००२ - गुजरातच्या गोधरा रेल्वे स्थानकात साबरमती एक्सप्रेसला आग लावण्यात आली. ५८ हिंदू यात्रेकरू ठार. या घटनेचा सूड म्हणून उसळलेल्या जातीय दंग्यांमध्ये १,००० हून अधिक व्यक्तींचे प्राण गेले.
- २००४ - फिलिपाईन्समध्ये अबु सयफ या अतिरेकी गटाने फेरीवर बॉम्बस्फोट घडवले, ११६ ठार.
- २००७ - शांघाय रोखे बाजारातील भाव एका दिवसात ९ टक्क्यांनी कोसळले.
- २०१० - चिलीमध्ये रिश्टर मापनपद्धतीनुसार ८.८ तीव्रतेचा भूकंप.
जन्म[संपादन]
- २७२ - कॉन्स्टन्टाईन पहिला, रोमन सम्राट.
- १८०७ - हेन्री वॅड्सवर्थ लॉंगफेलो, इंग्लिश कवि.
- १८६० - वैदिक वाङ्मयाचे अभ्यासक वैजनाथ काशिनाथ राजवाडे
- १८८२ - विजय सिंह पथिक - राजस्थानचे प्रसिद्ध स्वतंत्रता सेनानी
- १९०२ - जॉन स्टाइनबेक, अमेरिकन लेखक.
- १९०५ - भाषाविषयक लेखक शं. रा. हातवळवणे
- १९०६ - माल मॅथिसन, न्यू झीलॅंडचा क्रिकेट खेळाडू.
- १९१० - केली जॉन्सन, अमेरिकन विमान तंत्रज्ञ.
- १९१२ - कुसुमाग्रज, मराठी कवी, नाटककार. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक, कवी व नाटककार विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा जन्म, म्हणून आज मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो.
- १९२० - रेज सिम्पसन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९२४ - नॉर्मन मार्शल, वेस्ट इंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९२६: मराठी व हिन्दी लेखिका ज्योत्स्ना देवधर
- १९२८ - एरियेल शरोन, इस्राइलचे पंतप्रधान.
- १९३४ - राल्फ नेडर, अमेरिकन राजकारणी, ग्राहक-हक्क चळवळीची नेता.
- १९३९ - लेस्टर किंग, वेस्ट इंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९४४ - ग्रेम पोलॉक, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९४७ - ऍशली वुडकॉक, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९६६ - इनामुल हक, बांगलादेशी क्रिकेट खेळाडू.
- १९७४ - जिमी माहर, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९८६: भारतीय हॉकी खेळाडू संदीप सिंग
मृत्य[संपादन]
- १८८७ - आनंदीबाई गोपाळराव जोशी, भारतातील पहिल्या महिला डॉक्टर.
- १९२१ - शोफील्ड हे, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९३१: थोर क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांनी अलाहबादच्या पार्क मध्ये पोलिसांच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देतांना शेवटची गोळी शिल्लक असल्यामुळे स्वता:च्याच कानशिलावर गोळी मारून प्राण मातृभूमीला अर्पण केले.
- १९४७ - एफ.ए. मॅककिनन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९५६: भारतीय वकील आणि राजकारणी गणेश वासुदेव मावळणकर
- १९७६ - के. सी. रेड्डी - कर्नाटकचे प्रथम मुख्यमंत्री तथा मध्य प्रदेशचे भूतपूर्व राज्यपाल
- १९८७: अभिनेते, दिग्दर्शक, नाटककार व संपादक अदि मर्झबान यांचे निधन.
- १९९७: गीतकार श्यामलाल बाबू राय ऊर्फ इंदीवर यांचे निधन.
- २०१०: भारतीय शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते नानाजी देशमुख यांचे निधन.
- २०१७- प्रा. डॉ. अंजली रॉय .अंजली रॉय यांचा जन्म स्वातंत्र्यपूर्व काळात बांगलादेशातील राजशाही येथे 1930 मध्ये झाला. त्यांनी कोलकात्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमधून वनस्पतिशास्त्रात पदवी घेतली. कोलकाता विद्यापीठातून त्यांनी डॉ. एस. एन. बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली पीएच. डी. केली. नंतर त्यांनी कोलकाता विद्यापीठातून डी. एस्सी. पदवी घेतली.
प्रतिवार्षिक पालन[संपादन]
- जागतिक मराठी भाषा दिवस (कुसुमाग्रजांचा जन्म दिन)
- स्वातंत्र्य दिन - डॉमिनिकन प्रजासत्ताक.
- स्वातंत्र्य दिन - डॉमिनिका.
बाह्य दुवे[संपादन]
- बीबीसी न्यूजवर फेब्रुवारी २७ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
फेब्रुवारी २५ - फेब्रुवारी २६ - फेब्रुवारी २७ - फेब्रुवारी २८ - फेब्रुवारी २९ - (फेब्रुवारी महिना)