फेब्रुवारी ११
Appearance
फेब्रुवारी ११ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ४४ वा किंवा लीप वर्षात ४४ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]इ.स.पू. सातवे शतक
[संपादन]- ६६० - सम्राट जिम्मुने जपानचे राष्ट्र निर्माण केले.
अठरावे शतक
[संपादन]एकोणिसावे शतक
[संपादन]- १८३० - मुंबईचे हंगामी राज्यपाल सर सिडने ब्रेकनिथ यांच्या अध्यक्षतेखाली सभा होऊन ऍग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना.
विसावे शतक
[संपादन]- १९११ - डॉ. गोपाळ सदाशिव पळसुले यांनी पुण्यात श्रीकृष्ण होमिओ फार्मसी हा औषधांचा कारखाना सुरू केला.
- १९७५ - ब्रिटनच्या हुजूर पक्षाने संसदीय नेतेपदी मार्गारेट थॅचर यांची निवड केली. त्या ब्रिटनच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत.
- १९७९ - पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी अंदमान निकोबार बेटावरील सेल्युलर जेल राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले.
- १९३३ - म. गांधी यांच्या हरिजन वीकलीचा पहिला अंक प्रसिद्ध झाला.
- १९९९ - मध्यप्रदेश सरकारतर्फे दिला जाणारा लता मंगेशकर पुरस्कार प्रसिद्ध संगीतकार इलायराजा यांना जाहीर.
एकविसावे शतक
[संपादन]- २००० – शटल रडार टोपोग्राफी मिशन पार पाडण्यासाठी स्पेस शटल एंडेव्हर एसटीएस-९९ मोहिमेवर प्रक्षेपित करण्यात आले.[१]
- २००१ – एका डच संगणकाने आना कुर्निकोव्हा व्हायरस प्रसारित केला; विपत्राद्वारे पाठवलेल्या टेनिस खेळाडूच्या एका फसव्या फोटोद्वारे लाखो संगणक संक्रमित झाले.[२]
- २००८ – पूर्व तिमोरमधील बंडखोर सैनिकांनी राष्ट्राध्यक्ष होजे रामोस-होर्टा यांना गंभीर जखमी केले. या हल्ल्यात बंडखोर नेता अल्फ्रेडो रीनाडो मारला गेला.[३]
- २०११ – अरब स्प्रिंग: १७ दिवसांच्या निदर्शनांनंतर होस्नी मुबारक यांनी राजीनामा दिला आणि सत्ता सर्वोच्च लष्करी परिषदेकडे सोपवण्यात आल्याने इजिप्शियन क्रांतीच्या पहिल्या लाटेचा समारोप झाला.[४]
- २०१३ – व्हॅटिकनने पोप बेनेडिक्ट सोळावे वाढत्या वयामुळे पोपपदाचा राजीनामा देतील या बातमीला दुजोरा दिला.[५]
- २०१३ – सुलू सल्तनतचे असल्याचा दावा करणाऱ्या अतिरेक्यांनी मलेशियातील सबाह येथील लाहाद दातू जिल्ह्यावर आक्रमण केले. याने लाहाद दातू संघर्षाला सुरुवात झाली.[६]
- २०१४ – पूर्व अल्जीरियामधील उम एल बुआघी प्रांतातील डोंगराळ भागात लष्करी वाहतूक विमान कोसळून ७७ लोकांचा मृत्यू झाला.[७]
- २०१५ – तुर्कीमध्ये बलात्काराच्या प्रयत्नाला विरोध करणाऱ्या एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीची हत्या करण्यात आली; यामुळे महिलांवरील छळ आणि हिंसाचाराच्या निषेधार्थ देशभर संताप व्यक्त झाला.[८]
- २०१५ – युरोपियन स्पेस एजन्सीचा उपग्रह एका व्हेगा रॉकेटवरून प्रक्षेपित करण्यात आले.[९]
- २०१६ – सौदी अरेबियातील जिझान प्रांतात एका व्यक्तीने शिक्षण केंद्रात सात जणांची गोळी झाडून हत्या केली.[१०]
- २०१७ – उत्तर कोरियाने जपानच्या समुद्रात बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली.[११]
- २०१८ – सारातोव्ह एरलाईन्स फ्लाइट ७०३ रशियातील मॉस्कोजवळ कोसळले; यामध्ये सगळ्या ७१ प्रवासी आणि कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला.[१२]
- २०२० – कोव्हिड-१९ महामारी: जागतिक आरोग्य संघटनेने अधिकृतपणे कोरोनाव्हायरस उद्रेकाला कोव्हिड-१९ असे नाव दिले आणि विषाणूचे नाव सार्स-कोव्ह-२ असे ठेवले.[१३]
- २०२४ – २०२४ फिनलंड राष्ट्राध्यक्ष निवडणूक - अलेक्झांडर स्टब यांची फिनलंडचे १३ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली.[१४]
जन्म
[संपादन]- १५३५ - पोप ग्रेगोरी चौदावा.
- १५६८ - ऑनॉरे दुर्फे, फ्रेंच लेखक.
- १७६४ - मरी-जोसेफ दि शेनिये, फ्रेंच कवी.
- १८०० - विल्यम फॉक्स टॅलबॉट. छायाचित्रकलेचे निर्माते.
- १८३९ - जोसियाह विलार्ड गिब्स, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.
- १८४७ - थॉमस अल्वा एडिसन, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.
- १८६९ - एल्से लास्कर-श्युलर, जर्मन लेखक.
- १८७४ - एल्सा बेस्को, स्वीडिश लेखक.
- १८८७ - जॉन व्हान मेल, दक्षिण आफ्रिकेचा लेखक.
- १८९४ - जे.डब्ल्यू. हर्न, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८९८ - लिओ झिलार्ड, हंगेरीचा भौतिकशास्त्रज्ञ.
- १९०४ - सर कीथ होलियोके, न्यू झीलंडचा पंतप्रधान.
- १९१७ - सिडनी शेल्डन, अमेरिकन लेखक.
- १९२० - फारूक, इजिप्तचा राजा.
- १९२१ - लॉइड बेन्ट्सेन, अमेरिकन सेनेटर.
- १९२८ - पं. अरविंद गजेंद्रगडकर, बासरीवादक
- १९३३ - अनंतराव थोपटे, सहकारतज्ञ व माजी मंत्री
- १९३६ -डॉ. न.म. जोशी, शिक्षणतज्ञ, लेखक
- १९३७ - बिल लॉरी, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू.
- १९३८ - बेव्हन कॉॅंग्डन, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
- १९४२ - गौरी देशपांडे, मराठी लेखिका.
- १९५३ - जेब बुश, फ्लोरिडाचा राज्यपाल.
मृत्यू
[संपादन]- ६४१ - हेराक्लियस, बायझेन्टाईन सम्राट.
- ७३१ - पोप ग्रेगोरी दुसरा.
- ८२४ - पोप पास्कल पहिला.
- १६२६ - पियेत्रो कॅताल्डी, इटालियन गणितज्ञ.
- १६५० - रेने देकार्त, फ्रेंच गणितज्ञ व तत्त्वज्ञ.
- १८६८ - लेऑन फोकॉल्ट, फ्रेंच अंतराळशास्त्रज्ञ.
- १९२३ - विल्हेल्म किलिंग, जर्मन गणितज्ञ.
- १९४२ - जमनालाल बजाज, बजाज उद्योगसमूहाचे प्रवर्तक.
- १९६६ - लालबहादूर शास्त्री, भारताचे दुसरे पंतप्रधान
- १९६८ - पंडित दीनदयाळ उपाध्याय, भारतीय जनसंघाचे अध्यक्ष.
- १९७३ - हान्स डी. जेन्सन, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
- १९७६ - फ्रांक अर्नाऊ, जर्मन कवी, लेखक.
- १९७७ - फक्रुद्दीन अली अहमद, भारताचे पाचवे राष्ट्रपती.
- १९७७ - लुई बील, नेदरलॅंड्सचा पंतप्रधान.
- १९७८ - हॅरी मार्टिन्सन, नोबेल पारितोषिक विजेता स्वीडिश लेखक.
- १९९१ - रॉबर्ट डब्ल्यू. हॉली, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन जैवरसायनशास्त्रज्ञ.
- १९९३ - कमाल अमरोही, हिंदी चित्रपट निर्माते, लेखक आणि दिग्दर्शक.
- १९९६ - केबी मुसोकोट्वाने, झाम्बियाचा पंतप्रधान.
- १९९६ - सिरिल पूल, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९९६ - आमेलिया रॉसेली, इटालियन कवियत्री.
- २००० - रॉजर व्हादिम, फ्रेंच चित्रपट दिग्दर्शक.
- २००७ - मॅरियेन फ्रेडरिकसन, स्वीडिश लेखक.
- २००८ - एडमंड हिलरी, गिर्यारोहक.
- २०२५ - रावसाहेब रंगराव बोराडे, मराठी साहित्यिक.
प्रतिवार्षिक पालन
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]- बीबीसी न्यूजवर फेब्रुवारी ११ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
फेब्रुवारी ९ - फेब्रुवारी १० - फेब्रुवारी ११ - फेब्रुवारी १२ - फेब्रुवारी १३ - (फेब्रुवारी महिना)
- ↑ "Spaceflight mission report: STS-99". www.spacefacts.de. २५ एप्रिल २०२४ रोजी पाहिले.
- ↑ "CNN.com - Sci-Tech - Kournikova virus suspect arrested - February 14, 2001". CNN. २४ फेब्रुवारी २०२० रोजी पाहिले.
- ↑ Greener, B. K.; Fish, W. J. (2014). Internal Security and Statebuilding: Aligning Agencies and Functions (इंग्रजी भाषेत). Routledge. p. 102. ISBN 978-1-317-63133-0 – Google Books द्वारे.
- ↑ "Egypt Uprising of 2011". Encyclopædia Britannica (इंग्रजी भाषेत). २४ फेब्रुवारी २०२० रोजी पाहिले.
- ↑ "Frail Pope Benedict to step down". बीबीसी न्यूज. ११ फेब्रुवारी २०१३. १३ फेब्रुवारी २०२० रोजी पाहिले.
- ↑ Mullen, Jethro (१५ फेब्रुवारी २०१३). "Filipino group on Borneo claims to represent sultanate, Malaysia says". सीएनएन. २५ फेब्रुवारी २०२३ रोजी पाहिले.
- ↑ "One survivor as 77 killed in Algeria plane crash". द गार्डियन. १२ फेब्रुवारी २०१४. २४ फेब्रुवारी २०२० रोजी पाहिले.
- ↑ Davidson, Helen (१७ फेब्रुवारी २०१५). "Rape and murder of young woman sparks mass Twitter protest in Turkey". द गार्डियन. २४ फेब्रुवारी २०२० रोजी पाहिले.
- ↑ "European Mini-Space Shuttle Aces 1st Test Flight". Space.com. 11 February 2015.
- ↑ "Shooting at Saudi office 'kills six'". बीबीसी न्यूज. ११ फेब्रुवारी २०१६. २४ फेब्रुवारी २०२० रोजी पाहिले.
- ↑ Fifield, Anna (फेब्रुवारी ११, २०१७). "North Korea fires ballistic missile, first since Trump elected in U.S." द वॉशिंग्टन पोस्ट. ११ फेब्रुवारी २०२० रोजी पाहिले.
- ↑ Bennetts, Marc (११ फेब्रुवारी २०१८). "Russian passenger plane crashes outside Moscow, killing 71". द गार्डियन. ११ फेब्रुवारी २०२० रोजी पाहिले.
- ↑ "Coronavirus disease named Covid-19". बीबीसी. ११ फेब्रुवारी २०२०. ११ फेब्रुवारी २०२० रोजी पाहिले.
- ↑ Solomon, Erika; Lemola, Johanna (११ फेब्रुवारी २०२४). "Finland Elects Alexander Stubb President as It Ushers in NATO Era". द न्यू यॉर्क टाइम्स. १२ फेब्रुवारी २०२४ रोजी पाहिले.