रुहोल्ला खोमेनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Rouhollah Khomeini


आयातोल्ला रुहोल्ला खामेनी (२४ सप्टेंबर, इ.स. १९०२ - ३ जून, इ.स. १९८९) इराण देशाचे राजकारणी व धर्मगुरू होते. इ.स. १९७९ साली इराणमध्ये घडलेल्या राजकीय क्रांतीनंतर खोमेनी इराणचे पहिले सर्वोच्च पुढारी (रहबारे इन्किलाब) बनले. आपल्या प्रभावशाली व्यक्त‍िमत्वामुळे ते इराणमधील जनतेमध्ये प्रचंड लोकप्रिय होते.

इ.स. १९८९ साली खोमेनी ह्यांनी वादग्रस्त ब्रिटिश भारतीय लेखक सलमान रश्दी ह्यांच्या विरुद्ध फतवा जाहीर केला, ज्याला रश्दी ह्यांनी आपल्या द सॅटॅनिक व्हर्सेस ह्या कादंबरीत कुराणाबद्दल लिहीलेले अपशब्द हे कारण होते.