जानेवारी २६
Appearance
<< | जानेवारी २०२४ | >> | |||||
सो | मं | बु | गु | शु | श | र | |
१ | |||||||
२ | ३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ | |
९ | १० | ११ | १२ | १३ | १४ | १५ | |
१६ | १७ | १८ | १९ | २० | २१ | २२ | |
२३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ | २९ | |
३० | ३१ |
जानेवारी २६ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २६ वा किंवा लीप वर्षात २६ वा दिवस असतो.
ठळक घटना
[संपादन]चौदावे शतक
[संपादन]- १३४० - इंग्लंडचा राजा एडवर्ड तिसऱ्याला फ्रान्सचाही राजा घोषित केले गेले.
सोळावे शतक
[संपादन]- १५०० - व्हिसेन्ते यानेझ पिन्झोन ब्राझीलला पोचणारा पहिला युरोपीय ठरला.
- १५३१ - पोर्तुगालची राजधानी लिस्बनमध्ये भूकंप. हजारो ठार.
सतवे शतक
[संपादन]- १६९९ - कार्लोवित्झचा तह मंजूर.
अठरावे शतक
[संपादन]- १७०० - अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर रिश्टर मापनपद्धतिनुसार ९ तीव्रतेचा भूकंप झाला.
- १७३६ - पोलंडचा राजा स्तानिस्लॉस पहिला याने पदत्याग केला.
- १७८८ - आर्थर फिलिपच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश आरमाराची जहाजे सिडनीला पोचली व पुढे सिडनी शहर वसवले. ही ऑस्ट्रेलियातील पहिली कायम वसाहत आहे. पहा ऑस्ट्रेलिया स्थापना दिन.
एकोणिसावे शतक
[संपादन]- १८०८ - क्रांतिकारकांनी ऑस्ट्रेलियाचचे सरकार (काही दिवसांकरता) उलथवलले.
- १८३७ - मिशिगन अमेरिकेचे २६वे राज्य झाले.
- १८३८ - टेनेसीने दारूबंदी जाहीर केली.
- १८४१ - युनायटेड किंग्डमने चीनकडून हाँगकाँगचा ताबा घेतला.
- १८६१ - अमेरिकन यादवी युद्ध - लुईझियाना विभक्त झाले.
- १८६३ - अमेरिकन गृह युद्ध - मॅसेच्युसेट्सला अमेरिकेच्या युद्ध सचिवानी आफ्रिकन वंशाच्या सैनिकांची पलटण उभारण्याची मुभा दिली.
- १८७० - अमेरिकन गृह युद्ध - व्हर्जिनिया परत अमेरिकेच्या संयुक्त राज्यात दाखल झाले.
- १८८५ - सुदानमध्ये माह्दी सैनिकांनी खार्टुम जिंकले.
- १८८७ - डोगालीची लढाई - ॲबिसिनिया(इथियोपिया)च्या सैनिकांनी इटलीच्या सैन्याला हरवले.
विसावे शतक
[संपादन]- १९०५ - दक्षिण आफ्रिकेत प्रिटोरिया जवळच्या खाणीत कलिनन हिरा सापडला.
- १९११ - ग्लेन एच. कर्टिसने पहिले समुद्री विमान उडवले.
- १९३० - भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ने २६ जानेवारी हा पूर्ण स्वराज्य दिन असल्याचे जाहीर केले. वसाहतीच्या स्वराज्याऐवजी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करून काँग्रेसने २६ जानेवारी हा स्वातंत्र्यदिन मानण्याला सुरुवात केली.
- १९३३ - स्वातंत्र्यदिन साजरा केल्याने देशात धरपकड.
- १९३९ - स्पॅनिश गृहयुद्ध - इटलीच्या मदतीने फ्रान्सिस्को फ्रॅंकोने बार्सेलोना जिंकले.
- १९४२ - दुसरे महायुद्ध - आयर्लंडमध्ये अमेरिकन सैन्य उतरले.
- १९४६ - फेलिक्स गोआं फ्रान्सच्या पंतप्रधानपदी.
- १९४९ - भारताच्या राज्यघटनेचा पहिला मसुदा मंजूर झाला.
- १९५० - भारत प्रजासत्ताक देश झाला. डॉ. राजेन्द्रप्रसाद राष्ट्रपतीपदी.
- १९५६ - इटलीत कोर्टिना द'आम्पेझो येथे सातवे हिवाळी ऑलिम्पिक खेळ सुरू.
- १९६५ - भारताने हिंदी भाषेला शासकीय भाषा जाहीर केले.
- १९९३ - वाक्लाव हावेल चेक प्रजासत्ताकच्या अध्यक्षपदी.
एकविसावे शतक
[संपादन]- २००१ - गुजरातमध्ये भूकंप. २०,००० ठार.
- २००१ - व्हेनेझुएलात सिउदाद बॉलिव्हार जवळ डी.सी.३ जातीचे विमान कोसळले. २४ ठार.
- २००५ - ग्लेन्डेल, कॅलिफोर्नियात तीन रेल्वे गाड्या एकमेकांवर आदळल्या. ११ ठार, २०० जखमी.
- २००५ - इराकच्या पूर्व भागात अमेरिकेचे हेलिकॉप्टर कोसळले. ३१ सैनिक ठार.
- २०१८ - प्रसिद्ध शास्त्रीय गायक उस्ताद गुलाम मुस्तफा खान, इलायाराजा (संगीत) आणि परमेश्वरन (साहित्य आणि शिक्षण) यांना पद्मविभूषण तर भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी व बिलियर्डपटू पंकज अडवाणीला पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
जन्म
[संपादन]- १४९७ - गो-नारा, जपानी सम्राट.
- १७६३ - चार्ल्स चौदावा, स्वीडन व नॉर्वेचा राजा.
- १८१३ - हुआन पाब्लो दुआर्ते, डॉमिनिकन प्रजासत्ताकचा राष्ट्रपिता.
- १८५७ - दलाई लामा, बारावा अवतार.
- १८६२ - फिलिप हचिन्सन, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १८८० - डग्लस मॅकआर्थर, अमेरिकन सेनापती.
- १९०३ - जॉफ्री लेग, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९१५ - राणी गायडिनलू, ईशान्य भारतातील वीरांगना. 'राणी' ही पदवी त्यांना नेहरूंनी दिली. त्यांच्या स्मरणार्थ स्त्रीशक्ती पुरस्कार दिला जातो.
- १९१८ - निकोलाइ चाउसेस्क्यु, रोमेनियाचे राष्ट्राध्यक्ष.
- १९१९ - खानमोहम्मद इब्राहीम, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९२७ - होजे अझ्कोना देल होयो, होन्डुरासचा राष्ट्राध्यक्ष.
- १९४५ - किम ह्युस, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९५३ - अँडर्स फो रासमुसेन, डेन्मार्कचा पंतप्रधान.
- १९५७ - शिवलाल यादव, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९५७ - अशोक मल्होत्रा, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९६२ - टिम मे, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९६२ - रोशन गुणरत्ने, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९६३ - सायमन ओ'डोनेल, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९६८ - क्रिस प्रिंगल, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
- १९७४ - समन जयंता, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
[संपादन]- १६३० - हेन्री ब्रिग्ज, लघुगणकसारिणी (लॉगॅरिदम टेबल्स) तयार करण्यात मोठा वाटा असणारा इंग्लिश गणितज्ञ.
- १८८५ - एडवर्ड डेव्ही, ब्रिटिश संशोधक, भौतिकशास्त्रज्ञ.
- २००० - डॉन बज, सर्वप्रथम ग्रँड स्लॅम जिंकणारा अमेरिकन टेनिस खेळाडू.
- २०१५ - आर.के. लक्ष्मण, भारतीय व्यंगचित्रकार.
- २०२० - कोबे ब्रायंट, अमेरिकन बास्केटबॉलपटू
प्रतिवार्षिक पालन
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]- बीबीसी न्यूजवर जानेवारी २६ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
जानेवारी २४ - जानेवारी २५ - जानेवारी २६ - जानेवारी २७ - जानेवारी २८ - (जानेवारी महिना)