डिसेंबर २२
Jump to navigation
Jump to search
<< | डिसेंबर २०२२ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ | २९ | ३० | ३१ |
डिसेंबर २२ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३५६ वा किंवा लीप वर्षात ३५७ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी[संपादन]
सतरावे शतक[संपादन]
- १६०३ - ऑट्टोमन साम्राज्याचा सुलतान महमद तिसरा याचा मृत्यू. अहमद पहिला सुलतानपदी.
एकोणिसावे शतक[संपादन]
- १८०७ - अमेरिकन कॉंग्रेसने एम्बार्गो ऍक्ट केला. अमेरिकेचे बाहेरच्या जगाशी व्यापारी संबंध संपुष्टात.
- १८०९ - अमेरिकन कॉंग्रेसने नॉन इंटरकोर्स ऍक्ट केला. एम्बार्गो ऍक्ट रद्द. युनायटेड किंग्डम व फ्रांस शिवाय अमेरिकेचे बाहेरच्या जगाशी व्यापारी संबंध परत सुरू.
- १८५१ - जगातील पहिली मालगाडी भारतात रूडकी येथे चालविली गेली.
- १८६४ - विल्यम टेकुमेश शेर्मनची समुद्रास कूच समाप्त. सवाना, जॉर्जिया युनियन सैन्याने काबीज केले.
- १८८५ - इटो हिरोबुमी जपानचा पहिला सामुराई पंतप्रधान झाला.
विसावे शतक[संपादन]
- १९०९ - भारतीय क्रांतिकारी अनंत कान्हेरेनी नासिकचा जिल्हाधिकारी जॅक्सनची गोळ्या घालून हत्या केली.
- १९३७ - न्यू यॉर्कमध्ये लिंकन टनेल वाहतुकीसाठी खुली.
- १९६३ - क्रुझ शिप लाकोनिया मडेरापासून २९० कि.मी. उत्तरेस जळाली. १२८ ठार.
- १९५३ - राज्य पुनर्रचनेसाठी भारतात उच्चाधिकार समिती स्थापन. यातून पुढे भाषावार प्रांतरचना झाली.
- १९७२ - ॲंडीज पर्वतराजीत विमान कोसळल्यानंतर दहा आठवड्यांनी १४ प्रवासी जिवंत सापडले. त्यांनी काही काळ मानवी मांसावर गुजराण केली होती.
- १९८९ - आठवडाभर चाललेल्या दंगल व जाळपोळीनंतर हुकूमशहा निकोलाइ चाउसेस्क्युने रोमेनियाचे राष्ट्राध्यक्षपद सोडले. शीतयुद्धाच्या अखेरीला कम्युनिस्ट राष्ट्रे कोसळण्यामध्ये एक महत्त्वाचा टप्पा.
- १९८९ - बर्लिनचे ब्रॅन्डेनबर्ग गेट ३० वर्षांनी खुले. पूर्व आणि पश्चिम जर्मनीची फाळणी संपुष्टात.
- १९९५ - प्रसिद्ध रंगकर्मी के. एन. पणीक्कर यांना मध्य प्रदेश सरकारचा ’कालिदास सन्मान’ जाहीर
- १९८४ - न्यू यॉर्कच्या भुयारी रेल्वेत बर्नार्ड ह्युगो गोत्झने चार गुंडांना गोळ्या घातल्या.
- १९८९ - आठवडाभर चाललेल्या दंगल व जाळपोळीनंतर निकोलाइ चाउसेस्क्युने रोमेनियाचे अध्यक्षपद सोडले. इयोन इलेस्क्यु अध्यक्षपदी.
- १९८९ - बर्लिनचे ब्रांडेनबर्ग गेट ३० वर्षांनी खुले. पूर्व आणि पश्चिम जर्मनीची फाळणी संपुष्टात.
- १९९० - लेक वालेंसा पोलंडच्या अध्यक्षपदी.
- १९९९ - स्पेनच्या नागरी रक्षकांनी ७५० कि.ग्रॅ. वजनाची विस्फोटके असलेली अजुन एक गाडी पकडली. (पहा डिसेंबर २१)
- १९९९ - तांद्जा ममदु नायजरच्या राष्ट्राध्यक्षपदी.
एकविसावे शतक[संपादन]
- २००१ - काबुल, अफगाणिस्तानमध्ये बुरहानुद्दीन रब्बानीने सत्तेची सूत्रे हमीद करझाईला दिली.
- २००१ - रिचार्ड रीड या दहशतवाद्याने अमेरिकन एअरलाइन्स फ्लाइट ६३मध्ये आपल्या बुटात लपविलेली स्फोटके उडविण्याचा प्रयत्न केला.
जन्म[संपादन]
- ११७८ - अंतोकु, जपानी सम्राट.
- १६६६ - गुरू गोबिंद सिंघ, शिख धर्मगुरू.शिखांचे १० वे गुरू
- १८८७ - श्रीनिवास रामानुजन, भारतीय गणितज्ञ.’पार्टिशन फंक्शन’च्या रचनेवर त्यांनी मूलभूत संशोधन केले.
- १९०३ - आबासाहेब तथा भालचंद्र दिगंबर गरवारे, भारतीय उद्योगपती.
- १९१२ - लेडी बर्ड जॉन्सन, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष लिंडन बी. जॉन्सनची पत्नी.
- १९७२ - व्हेनेसा पॅरेडिस, फ्रेंच गायिका.
मृत्यू[संपादन]
- १६०३ - महमद तिसरा, ऑट्टोमन सुलतान.
- १८८० - जॉर्ज इलियट, ब्रिटीश लेखिका(टोपण नाव).
- १९४५ - श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी तथा ’पठ्ठे बापूराव’ – रसाळ लावण्या लिहीणारे लावणीसम्राट
- १९७५ - पेडर रोडवरील टोपीवाला देसाई यांच्या निवासस्थानात लिफ्टमधून खाली उतरत असताना लिफ्ट नादुरुस्त झाल्याने संगीतकार वसंत देसाई यांचा मृत्यू झाला. ’राम जोशी’, ’अमर भूपाळी’, ’दो ऑंखे बारह हाथ’, ’झनक झनक पायल बाजे’, ’गुॅंज उठी शहनाई’ आदी गाजलेल्या चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन त्यांनी केले.
- १९७९ - नरहर रघुनाथ फाटक, भारतीय ईतिहास संशोधक, संत साहित्याचे अभ्यासक.
- १९९६ - रामकृष्ण धोंडो तथा तात्या बाक्रे – संगीत समीक्षक व पत्रकार
- इ.स. १९९५ - जेम्स मीड, अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिकविजेता
- १९९७ - पी. सावळाराम, भावगीतकार, ठाण्याचे नगराध्यक्ष.
- १९९७ - पंडित प्रभाशंकर गायकवाड, सनईवादक.
- २००२ - दिलीप कुळकर्णी – प्रायोगिक व व्यावसायिक रंगभूमीवरील चतुरस्त्र अभिनेते
- २०११ - वसंत रांजणे – मध्यमगती गोलंदाज
प्रतिवार्षिक पालन[संपादन]
- तोजी - जपान.
- मातृदिन - इंडोनेशिया.
- गणित दिन (भारत).
- सूर्याच्या उत्तरायणास प्रारंभ
- उत्तर गोलार्धात वर्षातील सर्वात छोटा दिवस
बाह्य दुवे[संपादन]
- बीबीसी न्यूजवर डिसेंबर २२ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
डिसेंबर २० - डिसेंबर २१ - डिसेंबर २२ - डिसेंबर २३ - डिसेंबर २४ - (डिसेंबर महिना)