पूजा भट्ट
Jump to navigation
Jump to search
![]() | |
जन्म |
२४ फेब्रुवारी, १९७२ मुंबई |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनेत्री, दिग्दर्शक, निर्माती |
कारकीर्दीचा काळ | इ.स. १९८९ - चालू |
वडील | महेश भट्ट |
आई | किरण भट्ट |
नातेवाईक | आलिया भट्ट (सावत्र बहीण) |
पूजा भट्ट (जन्म: २४ फेब्रुवारी १९७२) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री, निर्माती व दिग्दर्शक आहे. सिने-दिग्दर्शक महेश भट्ट ह्याची थोरली मुलगी असलेल्या पूजाने १९९१ साली प्रदर्शित झालेल्या दिल है के मानता नही ह्या चित्रपटामध्ये आमिर खानच्या नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ह्या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर सडक, फिर तेरी कहानी याद आयी, चाहत इत्यादी काही चित्रपटांमध्ये भूमिका केल्यानंतर पूजाने चित्रपट निर्माणाकडे व दिग्दर्शनाकडे लक्ष केंद्रित केले.
बाह्य दुवे[संपादन]
- इंटरनेट मूव्ही डेटाबेसवरील पूजा भट्टचे पान (इंग्लिश मजकूर)
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत