जानेवारी ५
Appearance
<< | जानेवारी २०२४ | >> | |||||
सो | मं | बु | गु | शु | श | र | |
१ | |||||||
२ | ३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ | |
९ | १० | ११ | १२ | १३ | १४ | १५ | |
१६ | १७ | १८ | १९ | २० | २१ | २२ | |
२३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ | २९ | |
३० | ३१ |
जानेवारी ५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ५ वा किंवा लीप वर्षात ५ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]पंधरावे शतक
[संपादन]- १४६३ - कवि फ्रांस्वा व्हियोंची पॅरिसमधून हकालपट्टी.
- १४७७ - नॅन्सीची लढाई - चार्ल्स द बोल्डचा मृत्यू. बरगंडी फ्रांसमध्ये समाविष्ट.
सतरावे शतक
[संपादन]- १६६४ - छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेच्या सीमेवरून तेथील सुभेदार इनायत खानकडून खंडणीची मागणी केली.
- १६७१ - छत्रपती शिवाजी महाराजांनी साल्हेर मुघलांकडून काबीज केले.छत्रपती शिवाजी महाराज आणि मोरोपंत पिंगळे यांनी साल्हेरच्या किल्ल्यास वेढा घालून किल्ला जिंकून घेतला
- १६७५ - कोल्मारची लढाई - फ्रेंच सैन्याने ब्रांडेनबर्गला हरविले.
अठरावे शतक
[संपादन]- १७५९ - जॉर्ज वॉशिंग्टन व मार्था डॅंड्रिज कर्टिसचे लग्न.
- १७८१ - अमेरिकन क्रांती - बेनेडिक्ट आर्नोल्डच्या ब्रिटिश नौदलाने रिचमंड, व्हर्जिनिया जाळले.
एकोणिसावे शतक
[संपादन]- १८३२ - दर्पण या मराठी वृत्तपत्राचा पहिला अंक प्रकाशित.
- १८५४ - सान फ्रांसिस्को जहाज बुडाले. ३०० ठार.
- १८९६ - विल्हेल्म रॉन्ट्जेनने विशिष्ट प्रकारचे किरणोत्सर्गत्त्व शोधल्याचे ऑस्ट्रियाच्या दैनिकात प्रसिद्ध झाले. या किरणोत्सर्गाला पुढे क्ष-किरण असे नाव दिले गेले.
विसावे शतक
[संपादन]- १९०९ - कोलंबियाने पनामाचे स्वातंत्र्य मान्य केले.
- १९१४ - फोर्ड मोटर कंपनीने आठ तासांचा दिवस व ५ डॉलर प्रती दिवशीचा पगार जाहीर केला. याआधी कामगारांना ठराविक तासांचे काम करणे भाग नसे.
- १९१९ - जर्मनीत जर्मन कामगारांच्या शांततेसाठीची मुक्त समिती स्थापन झाली. याचेच पुढे नाझी पक्षात रूपांतर झाले.
- १९२४ - महाड महानगरपालिकेने चवदार तळे अस्पृश्यांसाठी खुले केले.
- १९३३ - सान फ्रांसिस्कोच्या खाडीवर गोल्डन गेट ब्रिजचे बांधकाम सुरू झाले.
- १९४१ - दुसरे महायुद्ध - लिब्यातील बार्डिया इथे २५००० इटालियन सैनिकांनी दोस्तसैन्यापुढे शरणागती पत्करली.
- १९४८ - वॉर्नर ब्रदर्सनी प्रथम रंगीत सिनेमाचे प्रदर्शन केले.
- १९४९ - पुणे यथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी ही संस्था सुरू झाली.
- १९५७ - भारतात विक्रीकर कायदा लागू झाला.
- १९६८ - अलेक्झांडर दुब्चेक चेकोस्लोव्हेकियाच्या राष्ट्राध्यक्षपदी. चेकोस्लोव्हेकियामध्ये प्राग वसंत सुरू.
- १९७२ - अमेरिकन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सनने स्पेस शटल कार्यक्रम सुरू करण्याचा हुकूम दिला.
- १९७४ - अंटार्क्टिकामधील सर्वोच्च तापमानाची (१५º सेल्सियस) नोंद झाली.
- १९७५ - ऑस्ट्रेलियातील टास्मानियाच्या टास्मान ब्रिजला खनिजवाहू जहाज लेक इलावाराने धडक दिली. १२ ठार.
- १९७६ - कंबोडियाने नाव बदलले. नवीन नाव काम्पुचियाचे गणराज्य.
- १९८४ - रिचर्ड स्टॉलमनने ग्नूवर काम सुरू केले.
- १९९३ - तेलवाहू जहाज एम.व्ही.ब्रेर शेटलंड बेटांवर किनाऱ्यास घसटले. ८४,७०० टन खनिज तेल समुद्रात.
- १९९७ - रशियाने चेचन्यातून सैन्य मागे घेण्यास सुरुवात केली.
एकविसावे शतक
[संपादन]- २००४ - संभाजी ब्रिगेड या जातीयवादी संघटनेने भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरावर हल्ला करून अनेक अनमोल व दुर्मिळ ग्रंथ फाडले.
जन्म
[संपादन]- १५८७ - झु झियाके, चीनी लेखक व शोधक.
- १५९२ - शहाजहान, भारतातील मोगल सम्राट.
- १७७९ - झेब्युलोन पाईक, अमेरिकन शोधक.
- १८४६ - रुडॉल्फ क्रिस्टॉफ युकेन, जर्मन लेखक, नोबेल पारितोषिक विजेता.
- १८५५ - किंग कॅम्प जिलेट, अमेरिकन शोधक.सेफ्टी रेझर तयार करून प्रथम बाजारात आणणारा.
- १८६८ - गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे उर्फ दासगणू, मराठी संतकवी.
- १८६९ - वेंकटेश तिरको कुलकर्णी, कन्नड साहित्यिक .
- १८८३ - खलील जिब्रान, अरब कवी, तत्त्वज्ञानी व चित्रकार.
- १८९२ - कृ.पां. कुळकर्णी मराठी भाषेचे अभ्यासक.
- १८९३ - परमहंस योगानंद, भारतीय तत्त्वज्ञानी.
- १९१३ - श्रीपाद नारायण पेंडसे, मराठी साहित्यिक.
- १९२० - मोहम्मद अस्लम, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- १९२२ - मोहम्मद उमर मुक्री, हिंदी विनोदी चरित्र अभिनेता.
- १९२५ - रमेश मंत्री, मराठी साहित्यिक .
- १९२८ - विजय तेंडुलकर, मराठी साहित्यिक .
- १९२८ - झुल्फिकार अली भुट्टो, पाकिस्तानी अध्यक्ष, पंतप्रधान.
- १९२८ - वॉल्टर मॉन्डेल, अमेरिकन राजकारणी.
- १९२८ - इम्तियाझ अहमद, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- १९३८ - पहिला हुआन कार्लोस स्पेनचा राजा.
- १९४१ - मन्सूर अली खान पतौडी, भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा माजी कर्णधार, पतौडी संस्थानाचा नववा व अखेरचा नवाब.
- १९४१ - बॉब क्युनिस, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
- १९४८ - पार्थसारथी शर्मा, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९४८ - फैय्याज अभिनेत्री व गायिका.
- १९५१ - एझ्रा मोझली, वेस्ट इंडीजचा क्रिकेट खेळाडू.
- १९५५ - ममता बॅनर्जी, बंगाली नेत्या.
- १९६१ - ना. धों. ताम्हणकर कथालेखक, कादंबरीकार व बाल साहित्यकार.
- १९६२ - ब्रॅंन्डन कुरुप्पु, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९७७ - जमालुद्दीन अहमद, बांगलादेशचा क्रिकेट खेळाडू.
- १९८१ - मार्लोन सॅम्युएल्स, वेस्ट इंडीजचा क्रिकेट खेळाडू.
- १९८६ - दीपिका पदुकोण – कन्नड, हिंदी आणि तामिळ चित्रपट अभिनेत्री.
मृत्यू
[संपादन]- ८४२ - अल मुतासिम, अब्बासी खलिफा.
- १५८९ - मेदिचीची कॅथेरीन, फ्रान्सचा राजा हेन्री दुसरा याची पत्नी.
- १६५५ - पोप इनोसंट दहावा.
- १७६२ - रशियाची एलिझाबेथ, रशियाची साम्राज्ञी.
- १८४७ - त्यागराज, कर्नाटक संगीताचे रचनाकार, संगीतशास्त्रज्ञ व गायक.
- १९३३ - कॅल्विन कूलिज, अमेरिकेचा २९वा अध्यक्ष.
- १९४३ - जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर, अमेरिकन शिक्षणतज्ञ, वनस्पतिशास्त्रज्ञ.
- १९८२ - रामचंद्र चितळकर उर्फ सी.रामचंद्र, भारतीय संगीतकार.
- १९८४ - सिद्धेश्वरशास्त्री चित्राव, वेदशास्त्र अभ्यासक, चरित्रकोशकार.
- १९९० - रमेश बहल, चित्रपट निर्माता व दिग्दर्शक.
- १९९२ - द.ग. गोडसे, मराठी समीक्षक , नाटककार, इतिहासकार, कलादिग्दर्शक, वेशभूषाकार आणि नेपथ्यकार
- २००३ - गोपालदास पानसे, पखवाजवादक.
प्रतिवार्षिक पालन
[संपादन]- पक्षी दिन - अमेरिकेची संयुक्त संस्थाने
संदर्भ
[संपादन]
जानेवारी ३ - जानेवारी ४ - जानेवारी ५ - जानेवारी ६ - जानेवारी ७ - (जानेवारी महिना)
बाह्य दुवे
[संपादन]- बीबीसी न्यूजवर जानेवारी ५ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)