डिसेंबर १७
Appearance
<< | डिसेंबर २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ | २९ | ३० | ३१ |
डिसेंबर १७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३५१ वा किंवा लीप वर्षात ३५२ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]चौदावे शतक
[संपादन]- १३९८ - तैमूर लंगने दिल्लीजवळ सुलतान नसिरुद्दीन मेहमूदच्या सैन्याचा पाडाव केला.
सोळावे शतक
[संपादन]- १५३८ - पोप पॉल तिसऱ्याने इंग्लंडच्या हेन्री आठव्याला वाळीत टाकले.
अठरावे शतक
[संपादन]- १७१८ - ग्रेट ब्रिटनने स्पेनविरुद्ध युद्ध पुकारले.
एकोणिसावे शतक
[संपादन]- १८१९ - सिमोन बॉलिव्हारने ग्रान कोलंबियाच्या प्रजासत्ताकचे स्वातंत्र्य घोषित केले.
- १८३४ - डब्लिन अँड किंग्सटाउन रेल्वे ही आयर्लंडमधील पहिली रेल्वे सुरू झाली.
- १८६२ - अमेरिकन यादवी युद्ध - उत्तरेच्या जनरल युलिसिस एस. ग्रॅंटने टेनेसी, मिसिसिपी आणि केंटकीमधून ज्यू व्यक्तींना हद्दपार केले.
विसावे शतक
[संपादन]- १९०३ - किट्टी हॉक, उत्तर कॅरोलिना येथे राइट बंधूंनी आपले राइट फ्लायर हे पहिल्या विमानाचे पहिले उड्डाण केले.
- १९२६ - लिथुएनियातील उठावात अंतानास स्मेतोनाने सत्ता बळकावली.
- १९२७ - हिन्दुस्तान रिपब्लिकन असोसिएशनचे क्रांतिकारक राजेन्द्र नाथ लाहिरी यांना ब्रिटिश सरकारने निर्धारित तारखेच्या दोन दिवस आधीच गोंडा तुरुंगात फाशी दिले.
- १९२८ - भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांनी ब्रिटिश पोलीस ऑफिसर जेम्स सॉंडर्स याची लाहोर येथे हत्या केली.
- १९३५ - डग्लस डी.सी. ३ प्रकारच्या विमानाचे पहिले उड्डाण.
- १९४४ - दुसरे महायुद्ध-बॅटल ऑफ द बल्ज-माल्मेडी हत्याकांड - वाफेन एस.एस.च्या सैनिकांनी अमेरिकेच्या २८५व्या फील्ड आर्टिलरी ऑब्झर्वेशन बटालियनच्या युद्धकैद्यांना ठार मारले.
- १९४७ - बोईंग बी-४७ प्रकारच्या विमानाचे पहिले उड्डाण.
- १९६१ - गोवा मुक्तिसंग्राम - भारतीय सैन्याने गोव्याला पोर्तुगालपासून मुक्त केले.
- १९६७ - ऑस्ट्रेलियाचा पंतप्रधान हॅरोल्ड होल्ट पोर्टसी, व्हिक्टोरियाजवळ समुद्रात पोहत असताना गायब.
- १९७० - पोलंडमध्ये ग्डिनिया शहरात सैनिकांनी कामगारांवर गोळ्या झाडल्या. सुमारे २५ ठार.
- १९७३ - रोमच्या लियोनार्दो दा व्हिंची विमानतळावर पॅलेस्टाइनच्या अतिरेक्यांनी हल्ला चढवून ३० प्रवाश्यांना ठार मारले.
- १९८३ - आय.आर.ए.ने लंडनच्या हॅरॉड्स डिपार्टमेंट स्टोरवर बॉम्बहल्ला केला. सहा ठार.
जन्म
[संपादन]- १२६७ - गो-उदा, जपानी सम्राट .
- १७७८ - सर हम्फ्री डेव्ही, इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ आणि रसायनशास्त्रज्ञ.
- १७७४ - विल्यम ल्यॉन मॅकेन्झी किंग, कॅनडाचा १०वा पंतप्रधान.
- १८४९ - लालमोहन घोष, काँग्रेसचे १६ वे अध्यक्ष.
- १८८१ - ऑब्रे फॉकनर, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १८८८ - अलेक्झांडर पहिला, युगोस्लाव्हियाचा राजा.
- १९०० - मेरी कार्टराइट, इंग्लिश गणितज्ञ.
- १९०१ - यशवंत गोपाळ तथा य.गो. जोशी, मराठी लघुकथाकार व ’प्रसाद’ मासिकाचे संपादक.
- १९०८ - विल्लर्ड लिब्बी,कार्बन १४ किरणोत्सर्ग कालमापन पद्धतीचा शोध लावणारा नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ.
- १९७२ - जॉन अब्राहम, हिंदी चित्रपट अभिनेता.
- १९७७ - आर्नॉ क्लेमेंट, फ्रेंच टेनिस खेळाडू.
- १९७८ - रितेश देशमुख, हिंदी चित्रपट अभिनेता.
मृत्यू
[संपादन]- ५३५ - अंकन, जपानी सम्राट.
- ११८७ - पोप ग्रेगोरी आठवा.
- १९०७ - लियोपोल्ड दुसरा, बेल्जियमचा राजा.
- १९२९ - मनुएल गोम्स दा कॉस्टा, पोर्तुगालचा ९६वा पंतप्रधान आणि १०वा राष्ट्राध्यक्ष.
- १९६४ - व्हिक्टर फ्रांझ हेस, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.
- १९६७ - हॅरोल्ड होल्ट, ऑस्ट्रेलियाचा पंतप्रधान.
प्रतिवार्षिक पालन
[संपादन]
बाह्य दुवे
[संपादन]- बीबीसी न्यूजवर डिसेंबर १७ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
संदर्भ
[संपादन]- ^ ई-पेपर, लोकमत नागपूर,हॅलो नागपूर पुरवणी,दि. १५/१२/२०१३ Archived 2016-03-14 at the Wayback Machine. मथळा:राष्ट्रीय सेवानिवृत्त दिनानिमित्त जाहीर सभा
डिसेंबर १५ - डिसेंबर १६ - डिसेंबर १७ - डिसेंबर १८ - डिसेंबर १९ - डिसेंबर महिना