एप्रिल १६

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

एप्रिल १६ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १०६ वा किंवा लीप वर्षात १०७ वा दिवस असतो.


ठळक घटना आणि घडामोडी[संपादन]

एकोणविसावे शतक[संपादन]

  • १८५३ - भारतात पहिली प्रवासी रेल्वे सेवा बोरीबंदर ते ठाणे अशी सुरू झाली. ’ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे’ (GIP Railway) या कंपनीने ही सेवा सुरू केली.
  • १८६२ : Emancipation Act अन्वये वॉशिंग्टन डी.सी. येथील गुलामगिरीची प्रथा संपुष्टात आली.

विसावे शतक[संपादन]

  • १९१९ : म. गांधींनी जालियनवाला हत्याकांडाचा निषेध म्हणून एक दिवसाचा उपवास आणि प्रार्थना आयोजित केली.
  • १९२२: मुळशी सत्याग्रह सुरू झाला.
  • १९२२ : गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांनी शांतिनिकेतनात विश्वभारती विद्यापीठ सुरू केले.
  • १९४८: राष्ट्रीय छात्र संघाची (NCC) स्थापना झाली.
  • १९७२: केप कॅनव्हेरॉल, फ्लोरिडा येथून अपोलो-१६ या अंतराळयानाचे प्रक्षेपण करण्यात आले.
  • १९९५: भारताचे पहिले निवडणूक आयुक्त टी.एन. शेषन यांना ऑनेस्ट मॅन ऑफ इयर हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  • १९९९: चालकरहित निशांत विमान जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या त्रिशूल क्षेपणास्त्राची चंडीपूर येथे चाचणी करण्यात आली.

एकविसावे शतक[संपादन]

  • २००१ : भारत आणि बांग्लादेशात मेघालयाच्या काही भागावरून पाच दिवसांचा सीमाकलह.

जन्म[संपादन]

मृत्यू[संपादन]

  • १७५६: फ्रेंच खगोलशास्त्रज्ञ जॅक्स कॅसिनी
  • १८५०: मॅडम तूसॉं वॅक्स म्युझियमच्या संस्थापिका मेरी तूसॉं
  • १९६६: शांतीनिकेतन मधील जगविख्यात चित्रकार नंदलाल बोस
  • १९९५: अभिनेते आणि वकील रमेश टिळेकर
  • २०००: कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू तसेच शाहू महाराजांचे चरित्रकार अप्पासाहेब पवार

प्रतिवार्षिक पालन[संपादन]

  • World Voice Day

बाह्य दुवे[संपादन]



एप्रिल १४ - एप्रिल १५ - एप्रिल १६ - एप्रिल १७ - एप्रिल १८ - (एप्रिल महिना)