एप्रिल १

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
<< एप्रिल २०१८ >>
सो मं बु गु शु
१० ११ १२ १३ १४ १५ १६
१७ १८ १९ २० २१ २२ २३
२४ २५ २६ २७ २८ २९ ३०

एप्रिल १ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ९१ वा किंवा लीप वर्षात ९२ वा दिवस असतो.


एप्रिल महिन्यात भारतात (बहुधा) कडक उन्हाळा असतो. त्या काळात चैत्र-वैशाख हे हिंदू महिने असतात.

ठळक घटना आणि घडामोडी[संपादन]

सहावे शतक[संपादन]

सतरावे शतक[संपादन]

१६६९ -उत्तर भारतातील देवालये तोडण्यासाठी औरंगजेब याने विशेष फौज तैनात केली.

एकोणिसावे शतक[संपादन]

१८२६ : इंटर्नल कंबस्टन इंजिनासाठी सॅम्युएल मोरी याला पेटंट.

१८६९ : भारतात नवा घटस्फोटाचा कायदा लागू.

१८८७ : मुंबई अग्निशमन दलाची स्थापना झाली.

विसावे शतक[संपादन]

१९१२ : भारताची राजधानी कलकत्ता येथून दिल्लीला हलवणार अशी अधिकृत सूचना जारी.

१९२२ : भारतात इन्कम टॅक्स कार्यान्वित.

१९२८ : पुणे वेधशाळेच्या कामकाजास प्रारंभ झाला. यापूर्वी हवामानखात्याचे कामकाज सिमला येथून चालत असे. त्यामुळे पुण्यातील या वेधशाळेला ’सिमला ऑफिस’ असे म्ह्टले जाते.

१९३३ : भारतीय हवाईदलाच्या पहिल्या विमानाचे कराची येथे औपचारिक उड्डाण

  • १९३५ - भारतीय रिझर्व बँकेची स्थापना.
  • १९३६ : ओरिसा राज्याची स्थापना झाली. १९५४ : भारतातल्या फ्रेंच वसाहती भारताच्या नियंत्रणाखाली आल्या. १९५५ : गीतरामायणातील पहिले गाणे पुणे आकाशवाणीवरुन प्रसारित झाले. या दिवशी रामनवमी होती. १९५७ : भारतात दशमान पद्धतीची नाणी-नोटा प्रमाणित (१ रुपया =१०० नवे पैसे). त्यानुसार पोस्टाची तिकीटेही जारी. १९५७ : बीबीसीने स्पगेटीच्या झाडाची अफवा प्रसारित केली. १९६९ : भारताचे पहिले अणुउर्जा केंद्र तारापूर येथे सुरू झाले. १९७३ : कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये ’प्रोजेक्ट टायगर’ची सुरुवात झाली. १९९० : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ’भारतरत्‍न’ १९९७ : हेल-बॉप धूमकेतू सूर्याच्या सगळ्यात जवळ.

एकविसावे शतक[संपादन]

जन्म[संपादन]

मृत्यू[संपादन]

  • १०८५ - शेन्झॉँग, चीनी सम्राट.
  • १२०४ - एक्विटेनची एलिनोर, इंग्लंडचा राजा हेन्री दुसरा याची पत्नी.
  • १९८४: पं नारायणराव व्यास – ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक
  • १९८९:श्रीधर महादेव तथा एस. एम. जोशी – समाजवादी, कामगार नेते, पत्रकार, संयूक्त महाराष्ट्र चळवळीचे अध्वर्यू
  • १९९९:श्रीराम भिकाजी वेलणकर – भारतीय टपालखात्याच्या ’पिन कोड’ प्रणालीचे जनक, संस्कृत व पाली भाषेचे गाढे अभ्यासक
  • २०००:संजीवनी मराठे – कवयित्री
  • २००३:प्रकाश घांग्रेकर – गायक व नट
  • २००६:राजा मंगळवेढेकर – बालसाहित्यकार
  • २०१२:एन. के. पी. साळवे – भारतीय राजकारणी, केंद्रीय मंत्री व बी. सी. सी. आय. चे अध्यक्ष

प्रतिवार्षिक पालन[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]




मार्च ३० - मार्च ३१ - एप्रिल १ - एप्रिल २ - एप्रिल ३ - (एप्रिल महिना)