मार्च २८
Appearance
<< | मार्च २०२५ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ | २९ | ३० | ३१ |
मार्च २८ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ८७ वा किंवा लीप वर्षात ८८ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]नववे शतक
[संपादन]- ८४५ - व्हायकिंग सरदार राग्नार लोडब्रोकने पॅरिस शहर लुटले.
अठरावे शतक
[संपादन]- १७७६ - हुआन बॉतिस्ता दि आन्झाने सान फ्रांसिस्कोचा किल्ला बांधायला सुरुवात केली.
एकोणिसावे शतक
[संपादन]- १८५४ - क्रिमियन युद्ध - फ्रान्सने रशियाविरुद्ध युद्ध पुकारले.
- १८६२ - अमेरिकन यादवी युद्ध-ग्लोरियेटा पासची लढाई - उत्तरेच्या सैन्याने दक्षिणेचे न्यू मेक्सिकोवरील आक्रमण रोखले.
विसावे शतक
[संपादन]- १९३० - तुर्कस्तानमधील कॉॅंस्टेन्टिनोपल व अंगोरा शहरांनी आपली नावे बदलून अनुक्रमे इस्तंबूल व अंकारा अशी ठेवली.
- १९३९ - स्पॅनिश गृहयुद्ध - जनरलास्सिमो फ्रांसिस्को फ्रॅंकोनो माद्रिद शहर जिंकले.
- १९४१ - दुसरे महायुद्ध-केप माटापानची लढाई - ॲन्ड्ऱ्यू ब्राऊन कनिंगहॅमच्या नेतृत्वाखाली रॉयल नेव्हीने तीन इटालियन युद्धनौका व दोन विनाशिकांचा धुव्वा उडवला.
- १९७९ - अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया राज्यातील थ्री माइल आयलंड अणुशक्ती केंद्रातील शीतक बंद पडला व त्यामुळे किरणोत्सर्गी पाणी वाफरुपे हवेतून पसरले.
- १९७९ - युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधान जेम्स कॅलाहानविरुद्ध अविश्वासाचा ठराव एका मताने मान्य झाल्यावर सरकार कोसळले व संसद विसर्जित केली गेली.
- १९९२ - भारतीय उद्योगाचे अध्वर्यू जे.आर.डी. टाटा यांना भारतरत्न हा सर्वोच्च भारतीय सन्मान तत्कालीन राष्ट्रपती रामस्वामी वेंकटरमण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
- १९९८ - भारतीय कंपनी सी-डॅकने पूर्णपणे स्वदेशी बनावटीचा परम १०००० हा महासंगणक देशाला अर्पण केला.
एकविसावे शतक
[संपादन]- २००५ - सुमात्रा बेटावर रिश्टर मापनपद्धतीनुसार ८.७ तीव्रतेचा भूकंप.
- २००६ - फ्रान्समधील नवीन कामगार कायद्याविरुद्ध १०,००,००पेक्षा अधिक युनियन सदस्यांचे अनेक शहरात मोर्चे.
- २००८ - भारतीय फलंदाज वीरेंद्र सेहवागने दक्षिण आफ्रिकाविरुद्ध कसोटी क्रिकेट सामन्यात ३०९ धावांची नाबाद खेळी केली व सर डॉन ब्रॅडमन व ब्रायन लारानंतर दोन त्रिशतके फटकावणारा तिसरा फलंदाज झाला. चार वर्षांपूर्वी मार्च २९ला सेहवागने पाकिस्तानविरुद्ध ३०९ धावांची खेळी केली होती.
जन्म
[संपादन]- १६०९ - फ्रेडरिक तिसरा, डेन्मार्कचा राजा.
- १८५१ - बर्नार्दिनो माचादो, पोर्तुगालचा राष्ट्राध्यक्ष.
- १८६८ - मॅक्झिम गॉर्की, वर्ग:रशियन लेखक.
- १८९२ - कार्नेली हेमन्स, फ्रेंच-बेल्जियन शरीरशास्त्रज्ञ आणि नोबेल पुरस्कार विजेता.
- १९१० - इंग्रीड, डेन्मार्कची राणी.
- १९३० - जेरोम फ्रीडमन, अमेरिकन वर्ग:भौतिकशास्त्रज्ञ.
- १९४६ - अलेहांद्रो टोलेडो, पेरूचा राष्ट्राध्यक्ष.
- १९५३ - मेल्चियोर न्डाडाये, बुरुंडीचा राष्ट्राध्यक्ष.
- १९६० - होजे मरिया नीव्ह्स, केप व्हर्देचा पंतप्रधान.
- १९६८ - नासीर हुसेन, वर्ग:इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
[संपादन]- १९३ - पर्टिनॅक्स, रोमन सम्राट.
- १२३९ - गो-तोबा, जपानी सम्राट.
- १२८५ - पोप मार्टिन चौथा.
- १९४१ - व्हर्जिनिया वूल्फ, इंग्लिश लेखिका.
- १९४२ - मिगेल हर्नान्देझ, स्पॅनिश कवी.
- १९६९ - ड्वाइट डी. आयझेनहॉवर, अमेरिकेचा ३४वा राष्ट्राध्यक्ष.
- १९९२ - आचार्य आनंद ऋषीजी, स्थानकवासी जैन धर्मगुरू.
- २००० - शांताराम द्वारकानाथ देशमुख उर्फ राम द्वारकानाथ देशमुख, नामवंत अर्थतज्ज्ञ आणि लेखक.
- २००६ - पीटर उस्तिनोव, ब्रिटिश अभिनेता.
- २०१७ - थेम्प्टन रुस्तमजी अंध्यारुजिना, भारतीय वकील आणि घटनातज्ज्ञ.
प्रतिवार्षिक पालन
[संपादन]- शिक्षक दिन - चेक प्रजासत्ताक, स्लोव्हेकिया.
बाह्य दुवे
[संपादन]- बीबीसी न्यूजवर मार्च २८ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
मार्च २६ - मार्च २७ - मार्च २८ - मार्च २९ - मार्च ३० - (मार्च महिना)