जुलै २२
Appearance
जुलै २२ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २०३ वा किंवा लीप वर्षात २०४ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]अठरावे शतक
[संपादन]- १७९३ - अलेक्झांडर मॅकेंझी मेक्सिको पार करून पॅसिफिक तटावर पोचणारा पहिला युरोपीय झाला.
एकोणिसावे शतक
[संपादन]- १८१२ - सालामांकाची लढाई - आर्थर वेलेस्ली, ड्यूक ऑफ वेलिंग्टनने सालामांका, स्पेन येथे फ्रेंच सैन्याला हरवले.
विसावे शतक
[संपादन]- १९१६ - सान फ्रांसिस्कोमध्ये ध्वजसंचलनाचे वेळी बॉम्बस्फोट. १० ठार, ४० जखमी.
- १९३३ - वायली पोस्टने ७ दिवस १८ तास ४५ मिनिटांत विमानातून सर्वप्रथम पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली.
- १९४२ - दुसरे महायुद्ध - अमेरिकेत पेट्रोलचे रेशनिंग सुरू करावे लागले.
- १९४२ - ज्यूंचे शिरकाण - वॉर्सोतून ज्यूंना तडीपार करणे सुरू झाले.
- १९४३ - दोस्त राष्ट्रांनी इटलीचे पालेर्मो शहर जिंकले.
- १९४६ - इर्गुन या दहशतवादी संघटनेने जेरुसलेममधील ब्रिटिश मुख्यालयावर बॉम्बहल्ला चढवला. ९० ठार.
एकविसावे शतक
[संपादन]- २००३ - अमेरिकन सैन्याच्या १०१व्या हवाई तुकडीने इराकमध्ये सद्दाम हुसेनची मुले उदय हुसेन व कुसे हुसेनना ठार मारले.
जन्म
[संपादन]- १८८७ - गुस्ताव लुडविग हेर्ट्झ, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
- १९१८ - गोपाळराव बळवंतराव कांबळे, मराठी चित्रकार.
- १९२१ - विल्यम रॉथ, अमेरिकेचा सेनेटर.
- १९२३ - मुकेश, पार्श्वगायक.
- १९२३ - बॉब डोल, अमेरिकेचा सेनेटर.
- १९३७ - वसंत रांजणे, भारताचा कसोटी क्रिकेट खेळाडू.
- १९७० - देवेंद्र गंगाधर फडणवीस, भारतीय जनता पक्षाचे आमदार व महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष.
मृत्यू
[संपादन]- १४६१ - चार्ल्स सातवा, फ्रांसचा राजा.
- १५४० - जॉन झापोल्या, हंगेरीचा राजा.
- १६७६ - पोप क्लेमेंट दहावा.
- १८२६ - ज्युसेप्पे पियाझी, इटालियन खगोलशास्त्रज्ञ.
- १८३२ - नेपोलियन दुसरा, फ्रांसचा राजा.
- १९१८ - ईंद्रलाल रॉय, भारतीय वैमानिक.
- १९५० - विल्यम ल्यॉन मॅकेन्झी किंग, कॅनडाचा १०वा पंतप्रधान.
- १९५८ - मिखाइल झोश्चेन्को, रशियन लेखक.
- २००३ - उदय हुसेन, सद्दाम हुसेनचा मुलगा.
- २००३ - कुसे हुसेन, सद्दाम हुसेनचा मुलगा.
प्रतिवार्षिक पालन
[संपादन]- पाय दिन. (२२/७ = पाय)
बाह्य दुवे
[संपादन]- बीबीसी न्यूजवर जुलै २२ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
जुलै २० - जुलै २१ - जुलै २२ - जुलै २३ - जुलै २४ - जुलै महिना