एप्रिल ५

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
<< एप्रिल २०१८ >>
सो मं बु गु शु
१० ११ १२ १३ १४ १५ १६
१७ १८ १९ २० २१ २२ २३
२४ २५ २६ २७ २८ २९ ३०

एप्रिल ५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ९५ वा किंवा लीप वर्षात ९६ वा दिवस असतो.


ठळक घटना आणि घडामोडी[संपादन]

सतरावे शतक

  • १६६३:दहा हजार फौजेसह पुण्याच्या लाल महालात तळ देऊन राहिलेला मोगल सुभेदार शाहिस्तेखान याच्यावर शिवाजी महाराजांनी दोनशे स्वारांसह अकस्मात छापा घातला. शाहिस्तेखान खिडकीतुन पळून गेल्याने बचावला; मात्र पळुन जाण्याच्या प्रयत्‍नात त्याची तीन बोटे तुटली. या प्रसंगापासून मराठीत ’जिवावरचे बोटावर निभावले’ हा शब्दप्रयोग रुढ झाला.
  • १६७९:राजारामास पकडण्यासाठी झुल्फिकारखानाने रायगडास वेढा दिला असता राजाराम रायगडावरुन प्रतापगडास गेला. पुढे प्रतापगडासही शत्रूने वेढा दिल्यावर राजारामास पन्हाळगडावर जावे लागले. [चैत्र व. १०]

अठरावे शतक

  • १७९४ : फ्रेंच राज्यक्रांती : क्रांतीचा एक नेता जॉर्ज दाँतों यावर सरकार उलथवण्याच्या कटाचा आरोप ठेवून त्याचा गिलोटीनवर शिरच्छेद.

एकोणिसावे शतक[संपादन]

  • १८०४ : नोंद झालेला पहिला अशनी स्कॉटलंडमधे पडला.

विसावे शतक[संपादन]

  • १९२२ : अमेरीकन बर्थ कंट्रोल लीग (पुढे प्लॅन्ड पेरेंटहूड) ची सुरुवात.
  • १९३० :२४१ मैल प्रवास करुन महात्मा गांधी यांनी दांडीयात्रा संपविली.
  • १९४९ : भारतात स्काऊट गाईडची स्थापना.
  • १९५७ : भारतात कम्युनिस्टांचा प्रथम विजय, केरळ विधानसभेत बहुमत आणि इ. एम. एस. नंबुद्रीपाद मुख्यमंत्रीपदी.
  • १९७९ : भारतातल्या पहिल्या नाविक वस्तुसंग्रहालयाचे मुंबईत उद्घाटन

एकविसावे शतक[संपादन]

  • २०००:अभिनेत्री सुलोचना यांच्या हस्ते डी. डी. - १० या मराठी उपग्रह वाहिनीचे ’सह्याद्री’ असे नामकरण करण्यात आले.
  • २०००: जळगाव नगरपालिकेच्या १७ मजली इमारतीचे उद्घाटन.
  • २०१३ - ठाण्याजवळील मुंब्रा येथे अनिधिकृत इमारत कोसळून ६० ठार. पन्नासपेक्षा अधिक जखमी.

जन्म[संपादन]

मृत्यू[संपादन]

  • १९१७: स्वातंत्र्यशाहीर शंकरराव निकम.
  • १९२२: आर्य महिला समाज च्या संस्थापिका पंडिता रमाबाई
  • १९४०: इंग्लिश मिशनरी, महात्मा गांधींचे जवळचे मित्र, समाजसेवक आणि भारताच्या स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते चार्लस फ्रिअरी तथा दीनबंधू अ‍ॅन्ड्र्यूज
  • १९६४: नकलाकार गोपाळ विनायक भोंडे .
  • १९९३: हिन्दी, तामिळ आणि तेलगु चित्रपट अभिनेत्री दिव्या भारती
  • १९९६: बालगंधर्वांना पंधरा वर्षे साथ करणारे ऑर्गनवादक भालचंद्र नीळकंठ तथा बाबा पटवर्धन .
  • १९९८: चित्रपट व नाट्य अभिनेत्री रुही बेर्डे .
  • २००२: दुबईस्थित वादग्रस्त भारतीय उद्योगपती, जम्बो ग्रुपचे संचालक मनोहर राजाराम तथा मनू छाबरिया .
  • २००७ :लेखिका लीला मजुमदार,
  • २००७: साहित्यिक, लेखन, छायाचित्रकार, चित्रकार, पर्यावरणवादी पूर्णचंद्र तेजस्वी.

प्रतिवार्षिक पालन[संपादन]

  • राष्ट्रीय नौकानयन दिन
  • राष्ट्रीय समुद्र संपत्ती दिवस

बाह्य दुवे[संपादन]



एप्रिल ३ - एप्रिल ४ - एप्रिल ५ - एप्रिल ६ - एप्रिल ७ - (एप्रिल महिना)