स्टीव जॉब्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
स्टीव्ह जॉब्स
जन्म स्टीव्हन पॉल जॉब्स
फेब्रुवारी २४, इ.स. १९५५
सान फ्रान्सिस्को, कॅलिफोर्निया
मृत्यू ५ ऑक्टोबर, २०११ (वय ५६)
पालो आल्टो, कॅलिफोर्निया
राष्ट्रीयत्व अमेरिकन
वांशिकत्व अमेरिकन
नागरिकत्व अमेरिकन
शिक्षण कॉलेजचे एक सत्र
प्रशिक्षणसंस्था रीड कॉलेज
पेशा ॲपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी
कारकिर्दीचा काळ १९७४- २०११
प्रसिद्ध कामे ॲपल- व्यक्तिगत संगणक ,मॅकीन्टोश,आय पॉड, आय फोन ,आय पॅड ,आय ट्युन्स
निव्वळ मालमत्ता ८.३ अब्ज अमेरिकन डॉलर (मृत्युसमयी)
धर्म बौद्ध धर्म
जोडीदार लोरेन पॉवेल जॉब्स
अपत्ये रिड ,लिसा,एरिन ,इव्ह
वडील अब्दुल जॉन जंदाली,पॉल जॉब्स (दत्तक)
आई जॉन कॅरोल शिबल,क्लारा जॉब्स (दत्तक)
नातेवाईक मोना सिम्पसन (बहीण)

स्टीव्ह जॉब्स (इंग्लिश: Steve Jobs) (फेब्रुवारी २४, इ.स. १९५५; सान फ्रान्सिस्को, कॅलिफोर्निया, अमेरिका - ऑक्टोबर ५, इ.स. २०११; पालो आल्टो, कॅलिफोर्निया, अमेरिका) हा एक अमेरिकन व्यवसायिक होता आणि तो ॲपल ह्या अमेरिकन कंपनीचा सहसंस्थापक व मुख्याधिकारी होता. जॉब्स हा काही काळ पिक्सार अ‍ॅनिमेशन स्टुडिओज‎चा मुख्य व्यवस्थापक होता आणि नंतर तो वॉल्ट डिस्ने कंपनीचा संचालक सदस्य होता. इ.स. १९७० मध्ये जॉब्स याने स्टीव्ह वॉझनियाक, माइक मारक्कुला आणि इतर (ॲपल कंपनीचे सर्व सदस्य) यांच्या समवेत व्यक्तिगत संगणक तयार केला. ॲपल-२ या मलिकेअंतर्गत मॅकिंटॉश नावाची प्रचालन यंत्रणा तयार केली. इ.स. १९८५ मध्ये कंपनीच्या सदस्यांसमावेत झालेल्या वादामुळे त्याने राजीनामा दिला आणि नेक्स्ट या नावाने व्यवहारात आणि उच्च शिक्षणात उपयोगी होईल अशी संगणकीय यंत्रणा (संगणकाचा वापर) किंवा प्रणाली तयार करणारी कंपनी स्थापन केली. इ.स. १९९७ साली 'नेक्स्ट'चे 'ॲप्पल'मध्ये विलीनीकरण झाले, त्याला पुन्हा 'ॲपल'मध्ये म्हणून स्थान मिळाले. यावेळी त्याच्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी सोपवण्यात आली.

जॉब्स याला व्यवहारिक जगाच्या इतिहासात एक सणकी, कलंदर, सिलिकॉन व्हॅलीचे ठेकेदार म्हणून ओळखले जाते.[ संदर्भ हवा ] त्याला सौंदर्यपूर्ण वस्तू बनवण्याची व वापरण्याची आवड असून याच कामासाठी त्याने वाहून घेतले आहे. त्याने प्रकृतिअस्वास्थ्य व अन्य वैयक्तिक कारणांसाठी २९ जून, इ.स. २००९ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा राजीनामा दिला. आयफोन, 'आयपॉड', 'आयपॅड' हे लोकप्रिय, बहूपयोगी उत्पादने त्याच्यामुळेच बाजारात आले[ संदर्भ हवा ].

स्टीव जॉब्सला उपभोक्ता संगणकक्षेत्रातील नवीनतेचा व अविष्कारचा जनक म्हणून संबोधले जाते. मृत्यू स्टिव जॉब्सचा कर्क रोगामुळे मृत्यू झाला. भारत भेटीनंतर, सुप्रसिद्ध बहुराष्ट्रीय तंत्रज्ञान कंपनी 'ऍपल' चे निर्माते, स्टीव्ह जॉब्स यांच्यावर बौद्ध धर्माचा खूप प्रभाव पडला. व त्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला.

स्टीव्ह जॉब्स यांचे 10 विचार जे तुमचे जीवन बदलू शकतात.[संपादन]

स्टीव्ह जॉब्स म्हणजे एक अचाट असा माणूस, आज जरी तो नसला तरी त्याचे विचार त्याचा रूपाने जिवंत आहेत. चला तर बघूया त्याचे काही मस्त विचार

  1. उत्कटता असलेले लोकच जगाला बदलून आणखी चांगले बनवतात.
  2. शिकण्याची भूख बाळगा. काही तरी करून दाखवायला वेड्या सारखं धडपडा.
  3. कधी कधी आयुष्य तुमच्या डोक्यावर जोरदार प्रहार करेल तरीही, स्वतः वरचा विश्वास ढळू देऊ नका.
  4. इतरांच्या मतांच्या आवाजामध्ये तुमचा आतला आवाज दबू देऊ नका.
  5. तुमच्याकडे वेळ फार कमी आहे तेव्हा कोणा दुसऱ्याचे आयुष्य जगणे सोडून दया.
  6. मी रोज सकाळी स्वःला आरशात पाहून विचारतो की ‘जर आजचा दिवस माझा जीवनाचा शेवटचा दिवस असेल तर मी तेच कारेन का ? जे आज करणार आहे’. जर या प्रश्नाचं उत्तर सलग काही दिवस ‘नाही’असे मिळाले तर मला कळते काही तरी चुकतंय आणि मला ते बदलायला हवं.
  7. या लोकांना असा वेडा विश्वास असतो की ते जगही बदलू शकतात ते तेच जग बदलतात.
  8. स्मशाना मधील सर्वात श्रीमंत व्यक्ति म्हणून मरणे यात मला आजीबात रस नाही पण रात्री झोपत असताना आपण आज काही अदभुत केलं आहे ही जाणीवच खूप महत्त्वाची आहे.
  9. नवीन शोधच एक लीडर आणि एक अनुयायी या मध्ये अंतर दाखवते.
  10. महान कार्य करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आपण जे करतो त्यावर प्रेम करणे. आपणास अद्याप ते सापडले नाही तर त्यास शोधत रहा.

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]