बाबर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बाबर


बाबर
पहिला मुघल संस्थापक
अधिकारकाळ एप्रिल ३०, १५२६ - डिसेंबर २६, १५३०
राजधानी आग्रा
पूर्ण नाव जहिरुद्दिन मुहम्मद बाबर
जन्म फेब्रुवारी १४, इ.स. १४८३
अंदिजान,उझबेकिस्तान
मृत्यू डिसेंबर २६, १५३०
काबुल
उत्तराधिकारी हुमायून
वडील उमर शेख मिर्झा (दुसरे)
आई कुत्ल्लुघ निगार खानुम
पत्नी आयेशा सुलतान बेगम,
झायनाब सुलतान बेगम,
मासुमा बेगम,
दिलदार आघा बेगम
गुल्नुर आघ्रचा
मुबारिका यौसेफ्झाई
नार्गुल आघ्रचा
साहिला सुलतान बेगम
राजघराणे मुघल

जहिरुद्दिन मोहम्मद बाबर (जन्म : १४ फेब्रुवारी १४८३; - २६ डिसेंबर १५३०) हा भारतातील मुघल साम्राज्याचा संस्थापक होता. बाबराने तुर्की भाषेमध्ये तुझुक-ए-बाबरी हे स्वतःचे आत्मचरित्र लिहिले आहे. बाबराने भारतामध्ये मुघल सत्तेचा पाया रोवला. इब्राहिमखान लोधीला पानिपतच्या पहिल्या लढाईत (१५२६) पराभूत करून सल्तनत सत्तेचा शेवट केला व भारतामध्ये मुघल सत्तेचा पाया घातला.

बालपण[संपादन]

बाबरचा जन्म १४ फेब्रुवारी १४८३ रोजी मध्य आशियातील फरगाना खोऱ्यामधील (वर्तमानकालीन उझबेकिस्तानातील) आंदिजान शहरात झाला. बाबरच्या वडिलांचे नाव उमरशेख मिर्झा होते. उमरशेख मिर्झा हा पराक्रमी तुर्क सम्राट तैमूरलंग याचा पाचवा वारस होता. बाबराच्या आईचे नाव कुल्लघ निगार खानुम होते. बाबरची आई ही मंगोलियन सम्राट चंगीझ खान याच्या वंशातील चौदावी वारस होती. उमरशेख मिर्झा हे फरगाणा प्रांताचे शासक होते. बाबरचे आई व वडील हे दोघेही मध्य आशियातील कर्तबगार कुळातील होते. बाबराला तीन भाऊ व पाच बहिणी होत्या. मुलांमधे बाबर हा सर्वात मोठा होता. बाबराचे मूळ नाव झहिरुद्दीन होते. किचकट नावामुळे त्याने नाव बदलून बाबर केले.

फरगाणा प्रांताचे राजपद[संपादन]

बाबराचे वडील उमरशेख मिर्झा याचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर वंशपरंपरेच्या पद्धतीनुसार फरगाणा प्रांताचे राजपद बाबरास मिळाले. बाबराचे वय तेव्हा बारा वर्षाचे होते. बाबर अगदी लहान वयातच महात्त्वाकांक्षी होता.

इ.स. १४९७ मध्ये त्यालासमरकंद जिंकून घेण्यात यश मिळाले.[१]

बाबरने लढलेली प्रमुख युद्धे :

  1. पानिपतची लढाई -१५२६
  2. खानवाची लढाई -१५२७
  3. चंदेरीची लढाई -१५२८
  4. घाघराची लढाई -१५२९

बाबरावरील मराठी पुस्तके[संपादन]

  • मोगल साम्राज्य : बाबर, रेडर्स फ्रॉम द नॉर्थ (मूळ इंग्रजी लेखक - ॲलेक्स रुदरफोर्ड; मराठी अनुवादक - डाॅ. मुक्ता महाजन)
  • मोहम्मद जहिरूद्दीन बाबर (लेखक - प्रा. प्रभाकर गद्रे - मंगेश प्रकाशन, नागपूर)

संदर्भ[संपादन]

  1. ^ मोगलकालीन भारताचा इतिहास (इ.स.१५२६ ते १७०७) प्राचार्य डॉ.एस.एस.गाठाळ. कैलाश पब्लिकेशन्स. औरंगाबाद. (पृ.क्र.३६ ते ६०)

[१]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
  1. ^ babar, moghal. histrory.