एप्रिल २०
Jump to navigation
Jump to search
एप्रिल २० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १०९ वा किंवा लीप वर्षात ११० वा दिवस असतो.
<< | एप्रिल २०२१ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | |||||
३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ | ९ |
१० | ११ | १२ | १३ | १४ | १५ | १६ |
१७ | १८ | १९ | २० | २१ | २२ | २३ |
२४ | २५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |
ठळक घटना आणि घडामोडी[संपादन]
सतरावे शतक[संपादन]
- १६५७ - न्यूयॉर्कमधील ज्यू व्यक्तिंना धर्मस्वातंत्र्य देण्यात आले.
अठरावे शतक[संपादन]
- १७४९: मराठा सत्तेचा ध्वज अटकेपार नेणार्या पेशव्यांचे श्रद्धास्थान असलेल्या देवदेवेश्वर मंदिराची नानासाहेब पेशवे यांनी पर्वतीवर स्थापना केली.
- १७७० - जेम्स कूकच्या तांड्याला सर्वप्रथम ऑस्ट्रेलियाचा किनारा दिसला.
- १७९२ - फ्रांसने ऑस्ट्रियाविरुद्ध युद्ध पुकारले.
एकोणिसावे शतक[संपादन]
- १८३६ - अमेरिकेत विस्कॉन्सिन प्रांताची निर्मिती.
- १८६१ - अमेरिकन यादवी युद्ध - उत्तरेच्या सेनापती रॉबर्ट ई. लीने राजीनामा देउन व्हर्जिनीयाचे सेनापतीपद घेतले.
- १८६२ - लुई पास्चर व क्लॉड बर्नार्डने पास्चरायझेशनचा प्रयोग केला.
- १८७६ - बल्गेरियात उठाव.
- १८८४ - पोप लिओ तेराव्याने ह्युमेनम जीनसचे प्रकाशन केले व त्याद्वारे मानवाचे पृथ्वीवरील वास्तव्याचे कारण समजावयाचा प्रयत्न केला.
विसावे शतक[संपादन]
- १९१४ - लडलोची कत्तल - अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यात संपकर्यांविरुद्ध सोडलेल्या गुंडांनी १७ स्त्री, पुरुष व मुलांना ठार केले.
- १९३९: अॅडॉल्फ हिटलरचा ५० वा वाढदिवस जर्मनीमध्ये सार्वजनिक सुटी देऊन साजरा करण्यात आला.
- १९३९ : मध्य प्रांतातील मराठी विभागाचे एकीकरण करून विदर्भ नावाचा नवीन प्रांत बनविण्याची शिफारस करणारा ठराव प्रांतिक कायदेमंडळात संमत झाला.
- १९४५ - दुसरे महायुद्ध - अमेरिकन सैन्याने जर्मनीचे लीपझीग शहर काबीज केले.
- १९४६: राष्ट्रसंघ ही संस्था बरखास्त करून पुढे याचेच संयुक्त राष्ट्रांच्या संघटनेमध्ये (United Nations) रूपांतर झाले.
- १९६७ - स्वित्झर्लंडचे विमान कॅनडाच्या टोरोंटो शहराजवळ कोसळले. १२६ ठार.
- १९६८ - साउथ आफ्रिकन एरवेझचे बोईंग ७०७ जातीचे विमान विंडहोक शहराजवळ कोसळले. १२२ ठार.
- १९६८ - पिएर त्रूदो कॅनडाच्या पंतप्रधानपदी.
- १९७२ - अंतराळयान अपोलो १६ चंद्रावर उतरले.
- १९७८ - सोवियेत संघाच्या लढाउ विमानांनी कोरियन एर फ्लाइट ९०२ या बोईंग ७०७ जातीच्या विमानावर क्षेपणास्त्रे सोडली. २ ठार. वैमानिकांनी कुशलतेने विमान गोठलेल्या तळ्यावर उतरवले.
- १९९२ : जी.एम.आर.टी.ची पहिली ॲंटेना पुणे जिल्ह्यातल्या खोडदमध्ये उभारली गेली. ही आशियातली सगळ्यात मोठी रेडिओ दुर्बिण आहे.
- १९९८ - एर फ्रांसचे बोईंग ७२७ जातीचे विमान कोलंबियाच्या बोगोटा विमानतळावरून उडल्यावर डोंगरावर कोसळले. ५३ ठार.
- १९९९ - कॉलोराडोच्या लिटलटन शहरात एरिक हॅरिस व डिलन क्लेबोल्डने आपल्या कोलंबाइन हायस्कूल या शाळेतील १२ विद्यार्थी व १ शिक्षकाला ठार मारले व नंतर आत्मह्त्या केली.
एकविसावे शतक[संपादन]
- २००२ : वेस्ट इंडीजविरुद्ध झालेल्या दुस-या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा फलंदाज सचिन तेंडुलकर याने २९वे शतक काढून ऑस्ट्रेलियन फलंदाज डॉन ब्रॅडमन यांच्या विक्रमाशी बरोबरी केली.
- २००४ - युटिका, इलिनॉय शहरात एफ.३ टोर्नेडो. ८ ठार.
- २००४ - इराकच्या अबु गरीब तुरुंगावर हल्ला. २२ कैदी ठार. ९२ जखमी.
- २००८: डॅनिका पॅट्रिक ह्या इंडी कार रेस जिंकण्याच्या पहिल्या महिला चालक झाल्या.
- २०१२ : ५००० किमीपर्यंत माऱ्याची क्षमता असणाऱ्या 'अग्नि-५' क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी.
- २०१३ : फुकुशिमा दाईची अणूऊर्जा प्रकल्पातला शेवटचा रिॲक्टर बंद.
- २०१३ :राष्ट्रपती प्रणब मुकर्जी यांनी पद्म पुरस्कारांचे वितरण केले: पद्मभूषण – कविवर्य मंगेश पाडगावकर, उद्योजक आदी गोदरेज, शास्त्रीय गायक उस्ताद अब्दुल राशिद खॉं, शास्त्रज्ञ ए. एस. पिल्लई, विनोदी कलाकार जसपाल भट्टी (मरणोत्तर), अभिनेते राजेश खन्ना (मरणोत्तर) पद्मश्री – नाना पाटेकर, दिग्दर्शक रमेश सिप्पी, डिझायनर रितू कुमार, ऑलिम्पीक पदक विजेते योगेश्वर दत्त आणि विजयकुमार
जन्म[संपादन]
- ७८८: आदि शंकराचार्य
- १६३३ - गो-कोम्यो, जपानी सम्राट.
- १८०८ - नेपोलियन तिसरा, फ्रांसचा सम्राट.
- १८८९ - एडॉल्फ हिटलर जर्मन हुकुमशहा.
- १८९६: सार्थ ज्ञानेश्वरी चे लेखक प्रा. ह. भ. प. शंकर वामन उर्फ सोनोपंत (मामासाहेब) दांडेकर
- १९१४ - गोपीनाथ मोहांती, उडिया लेखक.
- १९३९ - ग्रो हार्लेम ब्रुंड्टलॅंड नॉर्वेचा पंतप्रधान.
- १९३९: ध्रुपद गायक सईदुद्दीन डागर
- १९४९ - मासिमो दालेमा इटलीचा पंतप्रधान.
- १९५० - एन. चंद्रबाबू नायडू आंध्र प्रदेशचा मुख्यमंत्री.
- १९८०: भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक अरीन पॉल
मृत्यू[संपादन]
- १३१४ - पोप क्लेमेंट चौथा.
- १५२१ - झेंगडे, चीनी सम्राट.
- १९१८: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ कार्ल ब्राऊन
- १९३८: ’भारताचार्य’ न्यायाधीश व कायदेपंडित लेखक, आणि इंग्रजी व संस्कृतचे जाणकार. महाभारताच्या मराठी भाषांतराचा समारोप म्हणून त्यांनी लिहिलेल्या ‘महाभारताचा उपसंहार‘ या ग्रंथामुळे लोकमान्यांनी त्यांना ‘भारताचार्य‘ ही पदवी दिली. चिंतामणराव वैद्य
- १९४७ - क्रिस्चियन दहावा, डेन्मार्कचा राजा.
- १९५१ - इव्हानो बोनोमी इटलीचा पंतप्रधान.
- १९६०: बासरीवादक संगीतकार पन्नालाल घोष
- १९६८-'दुर्दैवी रंगू' ह्या ऐतिहासिक कादंबरीचे लेखक व भारतीय साहित्य आणि संस्कृतीचे अभ्यासक भारताचार्य चिंतामणराव विनायक वैद्य
- १९७०: गीतकार आणि शायर शकील बदायूॅंनी
- १९९९: रुचिरा पुस्तकाच्या लेखिका कमलाबाई कृष्णाजी ओगले
- २०१७- ज्येष्ठ मराठी लेखक, संशोधक प्रा. रामनाथ चव्हाण.दलित साहित्य व सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीतील महत्त्वाचे लेखक म्हणून यांचा उल्लेख केला जात होता.
प्रतिवार्षिक पालन[संपादन]
- आंतरराष्ट्रीय गांजा संस्कृती दिवस.
बाह्य दुवे[संपादन]
- बीबीसी न्यूजवर एप्रिल २० च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
एप्रिल १८ - एप्रिल १९ - एप्रिल २० - एप्रिल २१ - एप्रिल २२ - (एप्रिल महिना)