लीप वर्ष

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार ज्या वर्षातील फेब्रुवारी महिन्यात २८ च्या ऐवजी २९ दिवस असतात अश्या वर्षाला लीप वर्ष असे म्हणले जाते.

साधारणतः लीप वर्ष दर चार वर्षांनी येते.

लीप वर्ष ठरवण्यासाठी खालील तीन नियम वापरण्यात येतात -

  • जर एखाद्या वर्षाच्या आकड्यातील शेवटच्या दोन आकड्यांची संख्या चारने पूर्णतः भागली गेली तर ते वर्ष लीप वर्ष असते.
    • १०९२, १९७२, इ.
  • त्यातून जर शेवटचे दोन आकडे ०० असे असतील तर ते वर्ष लीप वर्ष नसते.
    • १००, ९००, १९००, इ.
  • त्यापरीस, अशा 'शतकी' वर्षाच्या शेवटून तिसऱ्या व चौथ्या आकड्यांनी होणारी संख्या चारने पूर्णतः भागता आली तर ते वर्ष लीप वर्ष असते.
    • ४००, १२००, २०००इ.