Jump to content

अनंत पै

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अनंत पै
जन्म १७ सप्टेंबर १९२९ (1929-09-17)

अनंत पै तथा अंकल पै (१७ सप्टेंबर, १९२९ - २४ फेब्रुवारी, २०११) हे भारतीय चित्रकार होते. त्यांना भारतीय चित्रकथांचे प्रणेते मानले जाते. त्यांनी भारतीय लोककथा, पौराणिक कथा तसेच ऐतिहासिक कथांनाअमर चित्र कथा श्रृंखलेद्वारे भारतात प्रसारित केली. या शिवाय त्यांनी टिंकल हे लहान मुलांसाठीच्या कथाही चित्रित केल्या.

पै यांचा जन्म ब्रिटिश भारताच्या मद्रास प्रेसीडेंसीमध्ये कारकला येथे कोकणी भाषिक गौड सारस्वत ब्राह्मण कुटुंबात व्यंकटराया आणि सुशीला पै यांच्या घरी झाला. [] वयाच्या दुसऱ्या वर्षी त्यांचे आई-वडील दोघेही मृत्यू पावल्यावर[] त्यांच्या आजोबांनी स्वतःच्या मृत्यूपर्यंत अनंत पै यांचे पालपोषण केले. त्यानंतर १९४४मध्ये ते मुंबईलागेले आणि ओरिएंट स्कूल, माहीममध्ये शिक्षण घेतले. इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (पूर्वीचे UDCT) येथे त्यांनी रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि रासायनिक अभियांत्रिकीचे उच्च शिक्षण घेतले. ते मुंबई विद्यापीठातून दुहेरी पदवीधारक होते. []

पै यांनी १९६१मध्ये, वयाच्या ३१व्या वर्षी ललिता यांच्याशी विवाह केला, त्या वेळी त्या २० वर्षांच्या होत्या. [] हे जोडपे निपुत्रिक होते. [] ते मुंबईतील प्रभादेवी येथे एका अपार्टमेंटमध्ये राहत असत. []

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b "Remembering Uncle Pai, the creator of our favourite Amar Chitra Katha and Tinkle". India Today (इंग्रजी भाषेत). 29 August 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2021-08-29 रोजी पाहिले.
  2. ^ Pal, Sanchari (2017-09-18). "Remembering Anant Pai, The Master Storyteller Who Created Amar Chitra Katha". The Better India (इंग्रजी भाषेत). 2021-01-19 रोजी पाहिले.
  3. ^ a b "Tales of Uncle Pai". Dnaindia.com. 21 March 2009. 8 March 2013 रोजी पाहिले.
  4. ^ Habib, Shahnaz (7 April 2011). "Anant Pai obituary". The Guardian. London. 8 March 2013 रोजी पाहिले.