२०१६ उन्हाळी ऑलिंपिक
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| २०१६ उन्हाळी ऑलिंपिक XXXI ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा |
|
|---|---|
| यजमान शहर | रियो दि जानेरो |
| स्पर्धा | ३०४, २८ खेळात |
| समारंभ | |
| उद्घाटन | ऑगस्ट ५ |
| सांगता | ऑगस्ट २१ |
| मैदान | माराकान्या |
| ◄◄ २०१२ |
|
२०१६ उन्हाळी ऑलिंपिक ही उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेची ३१वी आवृत्ती दक्षिण अमेरिकेच्या ब्राझिल देशामधील रियो दि जानेरो ह्या शहरामध्ये ऑगस्ट २०१६ मध्ये खेळवण्यात येईल. २ ऑक्टोबर २००९ रोजी डेन्मार्कच्या कोपनहेगन शहरात झालेल्या आय.ओ.सी.च्या १२१व्या अधिवेशनादरम्यान रियोची यजमान शहरपदी निवड करण्यात आली. ह्या स्पर्धेसाठी शिकागो, टोकियो व माद्रिद ही इतर शहरे देखील यजमानपदाच्या घोडदौडीत होती. परंतु सर्वाधिक मते मिळवून ह्या स्पर्धा पटकावणारे रियो हे दक्षिण अमेरिकेमधील पहिले शहर ठरले.
बाह्य दुवे [संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत
- Rio de Janeiro 2016 आयओसीच्या संकेतस्थळावर
- Rio de Janeiro 2016 अधिकृत संकेतस्थळ
- Rio de Janeiro 2016 अधिकृत संकेतस्थळ
|
||||||||||||||