तुर्कस्तान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

तुर्कस्तान
तुर्किये जुम्हुरियेती
तुर्कस्तानचे प्रजासत्ताक
Flag of Turkey.svg
Turkey coat of arms.png
LocationTurkey.svgजागतिक नकाशावरील स्थान
ब्रीदवाक्य युर्त्ता सुलह, जिहानदा सुलह (अर्थ: घरामध्ये शांती, जगात शांती)
राजधानी अंकारा
सर्वात मोठे शहर इस्तंबूल
राष्ट्रप्रमुख अहमेत नेज्देत सेझेर
पंतप्रधान रेजेप ताय्यिब एर्दोगान
राष्ट्रगीत इस्तिकलाल मार्सी
स्वातंत्र्यदिवस ऑगस्ट ३०, १९२२
प्रजासत्ताक दिन ऑक्टोबर २९, १९२३
राष्ट्रीय भाषा तुर्की
राष्ट्रीय चलन नवा तुर्की लिरा (TRY)
राष्ट्रीय प्राणी -
राष्ट्रीय पक्षी -
राष्ट्रीय फूल -
क्षेत्रफळ
एकूण–
पाणी–
३६वा क्रमांक

७,८०,५८० वर्ग किमी

१.३ %
लोकसंख्या
एकूण–
घनता
१७वा क्रमांक
७,३१,९३,०००
९० प्रती वर्ग किमी
आंतरराष्ट्रीय कालविभाग पूर्व युरोपीय प्रमाणवेळ (EET) (यूटीसी +२)
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +९०
आंतरजाल प्रत्यय .tr
वार्षिक सकल उत्पन्न
(GDP)
१९वा क्रमांक
६१० अब्ज अमेरिकन डॉलर
वार्षिक दरडोई उत्पन्न
(GDP per capita)
७५वा क्रमांक
८,३८५ अमेरिकन डॉलर

Tu-map.png
राष्ट्र नकाशा


तुर्कस्तान (तुर्की:Türkiye) तथा तुर्की हा मध्यपूर्वेतील एक मोठा देश आहे. हा देश दोन खंडामध्ये (युरोपआशिया) विस्तारित आहे.

अनुक्रमणिका

[संपादन] इतिहास

[संपादन] नावाची व्युत्पत्ती

[संपादन] प्रागैतिहासिक कालखंड

[संपादन] मध्यकालीन इतिहास

[संपादन] अर्वाचीन इतिहास

[संपादन] भूगोल

तुर्कस्तान नैऋत्य आशियातील अनातोलियाच्या द्वीपकल्पावर पसरलेला आहे. या देशाचा थोडासा भाग आग्नेय युरोपमध्येही आहे.

[संपादन] चतु:सीमा

तुर्कस्तानच्या वायव्येस बल्गेरिया, पश्चिमेस ग्रीस, ईशान्येस जॉर्जिया, आर्मेनियाअझरबैजान तर पूर्वेस इराण व आग्नेयेस इराकसिरीया हे देश आहेत. तुर्कस्तानच्या दक्षिणेस भूमध्य समुद्र, पश्चिमेस एजियन समुद्र व उत्तरेस काळा समुद्र आहे. मार्मराचा समुद्र तुर्कस्तानच्या आशियाई व युरोपीय भागांच्या मध्ये आहे.

[संपादन] राजकीय विभाग

तुर्कस्तानमध्ये ८१ प्रांत आहेत. प्रत्येक प्रांत अनेक जिल्ह्यांमध्ये विभागलेला आहे. तुर्कस्तानमध्ये असे एकूण ९२३ जिल्हे आहेत.

या ८१ प्रांतांची ७ विभागात विभागणी केलेली आहे परंतु हे विभाग फक्त जनगणनेच्या सोयीसाठी केलेले आहेत.

[संपादन] मोठी शहरे

शहर वस्ती
इस्तंबूल ९०,८५,५९९
अंकारा ३५,४०,५२२
इझ्मिर २७,३२,६६९
बर्सा १६,३०,९४०
अदना १३,९७,८५३
कोन्या १२,९४,८१७
गाझियान्टेप १०,०९,१२६
अंताल्या ९,३६,३३०

[संपादन] समाजव्यवस्था

[संपादन] वस्तीविभागणी

२००८च्या गणनेनुसार तुर्कस्तानची वस्ती ७ कोटी १५ लाख इतकी होती. याचा वृद्धीदर वार्षिक १.३१% इतका आहे. येथील लोकसंख्या घनता ९२ व्यक्ती प्रती किमी आहे. ७०.५% तुर्कस्तानी शहरांतून राहतात. तुर्कस्तानचे ६६.५% नागरिक १५-६४ वर्षे वयोगटात मोडतात तर २६.४% व्यक्ती ०-१४ वर्षे वयोगटात आहेत. ७.१% व्यक्ती ६५ किंवा अधिक वयाच्या आहेत.[१][२]

[संपादन] धर्म

[संपादन] शिक्षण

[संपादन] संस्कृती

[संपादन] राजकारण

[संपादन] अर्थतंत्र

[संपादन] पर्यटन

गेल्या काही वर्षात तुर्कस्तान पर्यटनासाठी प्रसिद्ध होत आहे. देशाला लाभलेला प्राचीन इतिहास व त्याच्याशी निगडीत ऐतिहासीक स्थळे या देशात आहेत. इस्तंबूल शहराला सर्वात जास्त पर्यटक भेट देतात. प्राचीन ग्रीक-रोमन, सुरुवातीचे ख्रिस्ती समाज, बायझंटाईन ख्रिस्ती, ऑटोमन इस्लामी व आधुनिक कमाल अतातुर्क यांचा नवा आधुनिक तुर्की यांची सरमिसळ झालेली संस्कृती येथे पहावयास मिळते. तसेच अत्यंत वैविध्यपूर्ण भौगोलिक परिस्थितीमुळे अनेक भौगोलिक प्रेक्षणीय स्थळेही या देशात आहेत. वैविध्यपूर्ण भूमध्यसमुद्रीय हवामानामुळे युरोपातील असंख्य पर्यटकांना तुर्कस्तानचे आकर्षण असते.

इस्तंबूल हे सर्वाधिक पर्यटकांचे भेट देण्याचे शहर आहे. इस्तंबूल शहर हे प्राचीन कॉन्स्टंटिनोपल या नावाने ओळखले जात व दोन हजार वर्षांपेक्षा जास्ती इतिहास या शहराला लाभलेला आहे. हे शहर १००० वर्षे बायझंटाईन साम्राज्याची राजधानी व नंतर ऑटोमन साम्राज्याची राजधानी होते. त्यामुळे बायझंटाईन व इस्लामी स्थापत्याची सरमिसळ येथे दिसून येते. अय्यासोफिया, निळी मशीद, शाही बाझार व टोपकापीचा राजवाडा ही येथील प्रमुख आकर्षणे आहेत.

इफेसूस मधील सेल्सुजचे ग्रंथालय

तुर्कस्तानचा पश्चिम किनारा हा प्राचीन काळी प्रामुख्याने ग्रीक अधिपत्याखाली होता. त्यामुळे अनेक प्राचीन ग्रीक शहरे या किनार्‍यालगत आहेत. ट्रॉयच्या लढाईमुळे इतिहासात अजरामर झालेल्या ट्रॉय शहराच्या खाणाखूणा आजही दिसतात. पुरातत्व खात्याने शोधलेली अनेक शहरे आज पर्यटकांचे प्रमुख आकर्षण बनली आहेत. कुसादासी शहरा जवळील प्राचीन इफेसूस हे प्राचीन शहर हे सर्वात मोठे आकर्षण आहे. प्राचीन जगतातील एक आश्चर्य आर्टेमिस च्या देवळाचे भग्नावशेष या शहराजवळ पहायला मिळतात. इफेसूसचे प्राचीन शहर हे सेल्सुजच्या ग्रंथालयासाठी व प्रचंड मोठ्या ग्रीक थिएटरसाठी तसेच येशू ख्रिस्ताची आईच्या उत्तर आयुष्यातील निवासस्थानासाठी प्रसिद्ध आहे. तुर्कस्तानच्या पश्चिम किनार्‍यावरील इतर प्रसिद्ध स्थळांमध्ये पेरॉगमन, डिडिमा, अन्तंल्या इत्यादी प्रसिद्ध स्थळे आहे.

अंकारा हे देशाची राजधानी पर्यटनाच्या दृष्टीने फारसे प्रसिद्ध नाही.परंतु मध्य व पूर्व तुर्की मधील स्थळांकडे जाण्यास येथूनच जावे लागते. त्यामुळे पर्यटक येथे भेट देतात. कमाल अतातुर्क यांनी एका छोट्या शहराला राजधानी बनवून महत्व वाढवले.

[संपादन] संदर्भ आणि नोंदी

  1. Turkish Statistical Institute (2008). 2007 Census, population statistics in 2007. Turkish Statistical Institute. बघितले 2008-01-21 ला.
  2. Intute (2006-07). Turkey - Population and Demographics. Intute. बघितले 2006-12-10 ला.

इतर भाषांमध्ये