इस्रायल
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| इस्रायेल | ||||||
|
מדינת ישראל
मेदिनात यिस्राएल دولة إسرائيل दौलत इस्राइल इस्रायेलचे राज्य |
||||||
|
|
||||||
![]() |
||||||
| जागतिक नकाशावरील स्थान | ||||||
| ब्रीदवाक्य | - | |||||
| राजधानी | जेरुसलेम | |||||
| सर्वात मोठे शहर | जेरुसलेम | |||||
| राष्ट्रगीत | हातीक्वा | |||||
| राष्ट्रगान | - | |||||
| स्वातंत्र्यदिवस | (ब्रिटनपासून) मे १४, १९४८ (घोषित) |
|||||
| प्रजासत्ताक दिन | - | |||||
| राष्ट्रीय भाषा | हिब्रू, अरबी | |||||
| इतर प्रमुख भाषा | - | |||||
| राष्ट्रीय चलन | इस्रायेली नवा शेकेल | |||||
| राष्ट्रीय प्राणी | - | |||||
| राष्ट्रीय पक्षी | - | |||||
| राष्ट्रीय फूल | - | |||||
| क्षेत्रफळ एकूण– पाणी– |
१४९वा क्रमांक २२,१४५ किमी² |
|||||
| लोकसंख्या एकूण– घनता– |
९९वा क्रमांक ७०,२६,००० ३०४ प्रती किमी² |
|||||
| आंतरराष्ट्रीय कालविभाग | इस्रायेली प्रमाणवेळ (यूटीसी +२/+३) | |||||
| आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | +९७२ | |||||
| आंतरजाल प्रत्यय | .il | |||||
| वार्षिक सकल उत्पन्न (GDP) |
५३वा क्रमांक १६३.४५ अब्ज अमेरिकन डॉलर किंवा इस्रायेली नवा शेकेल |
|||||
| वार्षिक दरडोई उत्पन्न (GDP per capita) |
२८वा क्रमांक २३,४१६ अमेरिकन डॉलर किंवा इस्रायेली नवा शेकेल |
|||||
इस्रायल, अधिकृतरीत्या इस्रायल संघराज्य हा पश्चिम आशियातील भूमध्य सागराच्या किनार्याला लागून आग्नेयेस वसलेला एक देश आहे. जेरुसलेम ही इस्रायलची घोषित राजधानी आहे (जेरुसलेम ही इस्रायेलची राजधानी असण्यावरून वाद चालू आहे. त्यामुळे बर्याच राष्ट्रांनी आपले दूतावास तेल अवीवमध्ये ठेवले आहेत).[१]
इस्रायलमध्ये संसदीय लोकशाही असून ते जगातले एकमेव ज्यू राष्ट्र आहे. परंतु इस्रायलमध्ये अनेक धर्माचे आणि अनेक पंथाचे लोक आहेत (पहा इस्रायली लोक).
अनुक्रमणिका |
[संपादन] नाव
इस्रायल ह्या नावाचा उगम हिब्रू बायबलमध्ये आढळून येतो. ज्यात जेकबचे एका विचित्र शक्तिबरोबर मल्लयुद्ध झाल्यावर[२] त्याला इस्रायल हे नाव मिळाले. त्याच्या पितृछायेखाली वाढलेल्या लोकांना "इस्रायलची मुले" अथवा "इस्रायली" असे नाव पडले. सध्याच्या आधुनिक इस्रायलच्या लोकांना मराठीत "इस्रायली" असे संबोधतात.
जेनेसीस ३२:२८ च्या interlinear भाषांतरात "इस्रायल" ह्या शब्दाचा पहिला उल्लेख बायबलमध्ये पुढीलप्रमाणे आला आहे (इंग्रजी भाषांतर): "And-he-is-saying not Jacob he-shall-be-said further name-of-you but rather Israel (इस्रायल) that you-are-upright with Elohim and with mortals and-you-are-prevailing."[३] थोडक्यात ישראל चे शब्दशः भाषांतर "देवाला सन्मुख" असे आहे (ישר-אל; इश्र-अल).
[संपादन] इतिहास
[संपादन] इतिहासाची पाळेमुळे
- हे सुद्धा पहा: जुडिया आणि प्राचीन इस्रायलचा इतिहास
इस्रायल ह्या शब्दाचा लिखित वापर प्रथम इजिप्तच्या स्टेलने (Merneptah Stele) कनानवरील लष्करी स्वार्यांचे वर्णन टिपताना केला. जरी स्टेलने ह्याचा वापर लोकांच्या समूहासाठी (राष्ट्राच्या संकल्पनेचा त्यात अभाव होता) ई.पू. १२११ साली केला, [४] तरी ज्यू परंपरेनुसार इस्रायलची भूमी ही ३००० वर्षांपासून ज्यू लोकांसाठी पवित्र भूमी व वचन भूमी आहे. इस्रायलची भूमी ज्यू लोकांसाठी धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्चाची आहे. कारण तिथे ज्यू लोकांची अनेक पवित्र धर्मस्थळे आहेत, ज्यामध्ये ज्यूंचा राजा सोलोमनच्या पहिल्या व दुसरया मंदिराचे अवशेष आहेत. ह्या दोन मंदिरांशी संलग्न असलेल्या ज्यूंच्या अनेक महत्त्वाच्या चालीरिती आहेत ज्या आधुनिक ज्युडीसमच्या मूळ समजल्या जातात.[५] ई. स. पूर्व ११ व्या शतकापासून ज्यू राज्यांच्या समूहाने इस्रायलच्या भूमीवर अधिपत्य केले, जे साधारण एका सहस्त्रकाहून अधिक काळ टिकले.
नंतर असिरीयन, बॅबिलोनियन, पर्शियन, ग्रीक, रोमन, बॅझंटाईन आणि काही काळापुरते सास्सानियन राज्यांच्या प्रभावामुळे व समूहांनी विस्थापन झाल्यांमुळे त्या विभागातील ज्यूंचा प्रभाव कमीकमी होत गेला. विशेषकरुन ई. स. १३२ साली रोमन साम्राज्याविरुद्ध केलेल्या बार खोबाच्या बंडाला आलेल्या अपयशामुळे मोठ्या प्रमाणावर ज्यूंची हाकालपट्टी झाली. ह्याच काळात रोमन लोकांनी ह्या भूभागाला सिरीया पॅलेस्टीना असे नाव देऊन ह्या भूमीशी ज्यूंचे असलेले नाते तोडुन टाकण्याचा प्रयत्न केला.[६] मिस्नाह आणि जेरुसलेम तालमुद हे दोन ज्युडीसमचे सर्वात महत्त्वाचे धर्मग्रंथ ह्याच काळात ह्या भूमीवर लिहीले गेले. त्यानंतर मुसलमानांनी हा प्रांत बॅझंटाईन साम्राज्याकडुन ६३८ साली जिंकून घेतला. त्यानंतर (क्रुसेडरांच्या स्वारयांचा काळ सोडल्यास) १५१७ पर्यंत ह्या भागावर विविध मुसलमान राज्यांचे अधिपत्य होते. १५१७ साली हा प्रांत ओट्टोमन साम्राज्याच्या अधिपत्याखाली गेला.
[संपादन] झीयोनिजम आणि देशांतर
इस्रायलमध्ये देशांतराची पहिली लाट अथवा अलियाह (עלייה) १८८१ साली सुरु झाली. ह्याचे कारण ज्यूंचा होणारा छ्ळ किंवा समाजवादी मोसेस हेससह इतरांच्या "इस्रायलच्या भूमीची मुक्तता" करण्याच्या झियोनिस्ट विचारांचा प्रभाव हे होते. ज्यूंनी ओट्टोमन आणि अरब जमीनदारांकडुन जमीनी विकत घेतल्या. जेव्हा ज्यूंनी तिथे शेती करण्यास सुरुवात केली तेव्हा तेथील अरब आणि ज्यूंमध्ये तणाव वाढू लागला.
ऑस्ट्रीयन ज्यू असलेल्या थियोडर हर्झने (१८६०-१९०४) झीयोनिस्ट चळवळीचा पाया घातला. १८९६ साली त्याने डर ज्यूडेन्स्टॅट (Der Judenstaat अथवा ज्यू राज्य) प्रकाशित केले ज्यामध्ये त्याने ज्यू राष्ट्राची मागणी केली. पुढच्याच वर्षी त्याने जागतिक झीयोनिस्ट कॉंग्रेसची सभा भरवण्यास मदत केली.
झीयोनिसमच्या स्थापनेमुळे दुसरे अलियाह (१९०४-१९१४) घडण्यास मदत केली ज्यामध्ये साधारण ४०००० ज्यूंनी इस्रायलमध्ये स्थलांतर केले. १९१७ साली, ब्रिटीश परराष्ट्र्मंत्री आर्थर जे. बलफोर (Arthur Balfour) यांनी काढलेल्या बेलफोर घोषपत्रात पॅलेस्टाईनमधील ज्यूंची वसाहत हा ज्यूंचा अधिकार आहे असा दृष्टीकोन स्विकारला गेला. १९२० साली पॅलेस्टाईनचा समावेश ब्रिटीशांच्या अखत्यारीतील राष्ट्रांच्या गटात (League of Nations mandate administered by Britain) करण्यात आला.
प्रथम विश्वयुद्धानंतर पून्हा ज्यू लोकांचा देशांतराचा ओघ तिसर्या आणि चौथ्या लाटांमध्ये झाला. १९२९ साली अरबांनी ज्यूंच्या केलेल्या कत्तलीत १३३ ज्यू बळी पडले, ज्यामधील ६७ हेब्रॉनमध्ये बळी पडले.
१९३३ साली झालेल्या नाझीवादाच्या उदयाची परिणती अलियाहच्या पाचव्या लाटेत झाली. अशाप्रकारे त्याप्रांतातील ज्यूंचे प्रमाण १९२२ साली असलेल्या ११% ने वाढून १९४० पर्यंत ३०% वर जाउन पोचले[संदर्भ द्या]. इस्रयलचा दक्षिण भूभाग हा मुख्यत्वेकरून पडीक व मोकळे असलेल्या नेगेव वाळवंटाने व्यापलेला आहे. त्यानंतर युरोपमध्ये झालेल्या सर्वनाशाच्या पार्श्वभूमीवर युरोपाच्या इतर भागांमधून अजून देशांतर झाले. द्वितिय विश्वयुद्धाच्या अंतानंतर पॅलेस्टाईनमधील ज्यूंची संख्या सुमारे ६,००,००० होती.
१९३९ साली इंग्रजांनी अरबांच्या लाक्षणिक विरोधाला (१९३६-३९) बळी पडुन १९३९चे श्वेतपत्र काढले, ज्यायोगे युद्धाच्या दरम्यान ज्यूंचे देशांतर ७५००० वर नियंत्रित केले व ज्यूंच्या जमीनी खरेदी करण्यावर निर्बंध आणले. हे श्वेतपत्र बेलफोर घोषपत्राशी विसंगत असल्यामुळे ते ज्यूंनी त्याच्याकडे एक दगा म्हणूनच पाहिले. अरबांना ज्यूंचे देशांतर पूर्णपणे थांबवायचे असल्यामुळे त्यांचेही ह्या श्वेतपत्राने विशेष समाधान झाले नाही. तरीसुद्धा इंग्रजांनी आपली राजवट तिथे असेपर्यंत हेच श्वेतपत्र प्रमाण म्हणून धरले. ह्याचा परिणाम म्हणजे नाझीच्या छळाला आणि सर्वनाशाला घाबरून पॅलेस्टाईनला पळून येणार्या बर्याच ज्यूंना इंग्रजांनी पकडुन युरोपात परत पाठवले. ह्या धोरणाचे अगदी ठळक उदाहरण म्हणजे स्ट्रुमा आणि एक्सोडस ही जहाजे. [1] हे धोरण जुगारुन युरोपमधून पळण्याच्या ह्या प्रयत्नांना अलियाह बेथ असे संबोधले गेले.
[संपादन] ज्यूंचे भूमिगत गट
ज्यू आणि अरब समाजातील तणाव वाढू लागल्यावर व इंग्रज अंमलदारांकडून फारशी मदत मिळणार नाही असे दिसल्यावर ज्यूंनी स्वसंरक्षणासाठी स्वयंपूर्ण होण्यास सुरुवात केली.
बेलफोर घोषणापत्र, इंग्रज अंमलदार व ज्यू देशवासीयांचे विरोधक असणार्या काही अरब देशवासीयांनी जेरुसलेम, हेब्रॉन, जाफा आणि हैफा इत्यादी शहरांमध्ये ज्यूंविरुद्ध जातियवादी दंगे भडकविले. १९२१ सालच्या अरबांच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हगानाह नावाची ज्यू संघटना ज्यूंच्या वसाहतींचे रक्षण करण्यासाठी स्थापन करण्यात आली. हगानाह्चे स्वरूप मुख्यत्वेकरून बचावात्मक होते. ज्याचा आणि इतर अनेक गोष्टींचा परीणाम म्हणून अनेक सदस्य त्यातुन फुटुन निघाले व त्यांनी इरगुन (ज्याला सुरुवातीला हगानाह बेट असे संबोधले गेले) नावाचा दहशतवादी गट १९३१ साली स्थापन केला. इरगुनने बरीच आक्रमक भूमिका घेतली, ज्यामध्ये हल्ले करणे तसेच इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढा देणे जसे इंग्रजांचे लष्करी मुख्यालय असलेल्या किंग डेव्हीड हॉटेलवर हल्ला ज्यात ९१ लोक मारले गेले इत्यादींचा समावेश होता. ह्गानाने याउलट संयमी भूमिका घेतली. अवराहम स्टर्नने इरगुन सोडुन लेही गट (ज्याला स्टर्न गॅंग असेही ओळखले जात असे) स्थापन करुन (जिच्या कामाची पद्धत इरगुनपेक्षाही जहाल होती) इरगुनमध्ये अजून फूट पाडली. त्यांनी इरगुनपासून अजून फारकत घेऊन द्वितिय विश्वयुद्धाच्या वेळेस इंग्रजांना कोणत्याही प्रकारची मदत करण्यास नकार दिला व याउपर त्यांनी नाझींबरोबर संधान बांधण्याचा प्रयत्न करुन युरोपातील ज्यूंना इस्रायलमध्ये आणण्याची व्यवस्था केली.
ह्या गटांचे १९४८च्या अरब-इस्रायली युद्धाच्या आधीच्या घटनांवर दूरगामी आणि व्यापक परीणाम झाले, जसे अलियाह बेथ--युरोपातून ज्यूंचे देशांतर, इस्रायली बचाव दलाची स्थापना आणि इंग्रजांची माघार व इस्रायली राजकीय पक्षांचा पाया जे सध्या इस्रायलमध्ये अस्तित्वात आहेत.
[संपादन] राष्ट्राची स्थापना
हिंसाचाराच्या वाढत्या घटनांच्या व ज्यू आणि अरब वसाहतींमध्ये समेट घडवून आणण्यात आलेल्या अपयशाच्या पार्श्वभूमीवर १९४७ साली ईंग्रज सरकारने पॅलेस्टाईन अंमलमधून आपला सहभाग काढून घेण्याचा निर्णय घेतला. संयुक्त राष्ट्रसंघाच्या परिषदेने १९४७ ची फाळणी योजना संमत केली ज्यामध्ये भूभागाचे दोन तुकडे करण्यात आले. ह्या फाळणीत ज्यूंना साधारण ५५% तर अरबांना ४५% भूभाग दिला. जेरुसलेमच्या अधिकाराबाबतीतला वाद टाळण्यासाठी त्याला संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वेक्षणाखाली असलेल्या भूभागाचा दर्जा देण्यात आला.
संयुक्त राष्ट्रसंघाने फाळणीचा ठराव नोव्हेंबर २९, १९४७ साली पास केल्यानंतर लगेचच डेव्हीड बेन-गुरीयनने फाळणीला मान्यता दिली, परंतु अरबांनी ह्या ठरावाला मान्यता दिली नाही. दोन्ही वसाहतींमधील अनेक ठिकाणी होणार्या चकमकींचे पर्यावसान लगेचच युद्धात झाले ज्याला १९४८ च्या स्वातंत्र्ययुद्धाचा पहिला टप्पा असे संबोधण्यात येते.
इस्रायल राष्ट्राची घोषणा पॅलेस्टाईन अंमल संपण्याच्या एक दिवस अगोदर म्हणजे मे १४, १९४८ला करण्यात आली.
इस्रायलला संयुक्त राष्ट्रांचे सदस्यत्त्व मे ११, १९४९ला मिळाले.
[संपादन] स्वातंत्र्ययुद्ध आणि देशांतर
इस्रायल राष्ट्राच्या स्थापनेनंतर लगेचच इजिप्त, सिरीया, जॉर्डन, लेबेनॉन आणि इराकची सैन्ये युद्धात उतरली आणि अशाप्रकारे १९४८च्या अरब-इस्रायली युद्धाचा दुसरा टप्पा सुरू झाला. उत्तरेकडून येणार्या सिरीया, लेबेनॉन आणि इराकच्या सैन्याला सीमारेषेजवळ थोपवण्यात आले. जॉर्डनच्या सैन्याने पूर्वेकडून आक्रमण करून पूर्व जेरुसलेम काबिज केले व शहराच्या पश्चिम भागाला वेढा दिला. परंतु हगानाच्या फौजांनी जवळजवळ सगळ्याच घुसलेल्या शत्रूच्या फौजांना मागे रेटले व इरगुनच्या फौजेने दक्षिणेकडून होणारे इजिप्तचे अधिक्रमण रोखले. जूनच्या सुरुवातीला संयुक्त राष्ट्रसंघाने एक महिन्याची युद्धबंदी जाहीर केली व ह्या काळात इस्रायली बचाव दलाची अधिकृतपणे स्थापना करण्यात आली. अनेक महिन्यांच्या युद्धानंतर १९४९ साली युद्धबंदी जाहीर करण्यात आली व एक तात्पुरती सीमारेषा आखली गेली, ज्याला हरितरेषा असे संबोधले गेले. ह्या युद्धानंतर इस्रायलला मूळ फाळणीच्या ठरावात संमत झालेल्या भूभागापेक्षा २६% अधिक भूभाग (जॉर्डन नदीच्या पश्चिमेला) मिळाला. जॉर्डनला ज्यूडीया आणि समारीया परिसरातील दोंगराळ प्रदेश मिळाला ज्याला वेस्ट बॅंक असे नाव पडले. इजिप्तने किनार्यालगत असलेल्या एका चिंचोळ्या भूभागाचा कब्जा घेतला ज्याला गाझा स्ट्रीप असे नाव पडले.
युद्धाच्या दरम्यान आणि युद्धानंतर तत्कालिन पंतप्रधान डेव्हीड बेन-गुरीयननी कायदा व सुव्यवस्था आणण्यासाठी पालमाच (Palmach) खालसा केले व इरगुन, लेही यासारख्या भूमिगत संस्था बरखास्त केल्या. स्विडीश डीप्लोमॅट फोल्क बेर्नॅडोटच्या (Folke Bernadotte) हत्येनंतर ह्या संघटनांना दहशतवादी संघटनांच्या यादीत टाकण्यात आले.
ह्या पॅलेस्टीनियन एक्सोडसच्या दरम्यान बर्याच अरब लोकांनी ज्यू राष्ट्रामधून पलायन केले. ह्या घटनेला बर्याच पॅलेस्टीनी संघटनांनी व लोकांनी नक्बा (अरबीमध्ये النكبة) असे संबोधले ज्याचा अर्थ "आपत्ती" अथवा "सर्वनाश" होतो. बर्याच इतिहासकारांनी असे सुचवले आहे की पॅलेस्टीनी लोक अरब नेत्यांच्या आदेशाप्रमाणे पळाले. बर्याच पॅलेस्टीनींना असे वाटले की ह्या युद्धा अरब सैन्याचा विजय होईल आणि त्यांना परतण्याची संधी मिळेल.[७] शिवाय इस्रायलने आपल्या — इस्रायलच्या स्थापनेचे घोषणापत्रामध्ये — इस्रायलमधील सर्व अरब लोकांना इस्त्रायलचे पूर्ण आणि समान नागरीकत्व व योग्य ते प्रतिनिधित्व देण्याचा प्रस्ताव ठेवला पण अनेकांनी तो झिडकारला.
निर्वासित लोकसंख्येचा आकडा सुमारे ६,००,००० ते ९,००,००० दरम्यान होता. संयुक्त राष्ट्रसंघाच्या अधिकृत माहितीनुसार हा आकडा ७,११,००० इतका होता.[८] इस्रायल आणि अरब राष्ट्रांमधील सततच्या तंट्यांमुळे मोठ्या प्रमाणावर लोकांचे स्थलांतर झाले जो प्रश्न अजूनही सुटू शकलेला नाही.
नाझींच्या छळापासून वाचलेल्या ज्यूंमुळे आणि अरबी भूमीतून येण्यारया ज्यू निर्वासितांच्या लोंढ्यामुळे स्वातंत्र्य मिळाल्यावर एका वर्षाच्या आतच इस्त्रायलची लोकसंख्या दुप्पट झाली. त्यानंतरच्या वर्षांमध्ये साधारण ८,५०,००० सेफार्दी आणि मिराझी ज्यू अभोवतालच्या अरब प्रांतांमधून व इराणमधून हाकलले गेले अथवा पळून आले. त्यापैकी साधारण ६,००,००० इस्रायलमध्ये स्थायिक झाले तर उरलेले युरोप व अमेरीकेत गेले. पहा: अरब प्रांतातून ज्यूंची हाकालपट्टी
[संपादन] १९५० आणि १९६०ची दशके
इ.स. १९५४ आणि १९५५ च्या दरम्यान, मोश शॅरेट पंतप्रधान असताना, लॅवनकांडाने (ज्यात इजिप्तमधील काही स्थळे बॉम्बस्फोटाने उडविण्याचा असफल प्रयत्न झाला) इस्रायलमध्ये राजकीय नाचक्की झाली. ह्यातच भरीस भर म्हणजे १९५६ साली इंग्लंड आणि फ्रांसच्या हल्ल्यांना न जुमानता इजिप्तने सुवेझ कालव्याचे राष्ट्रीयीकरण केले. ह्या घटनेनंतर आणि फिदायीन हल्ल्यांच्या मालिकेनंतर इस्रायलने वरील दोन युरोपीय शक्तींबरोबर गुप्त लष्करी संधान बांधले आणि इजिप्तबरोबर युद्धाची घोषणा केली. सुवेझच्या पेचप्रसंगानंतर, ह्या त्रिकुटाला बरीच आंतरराष्ट्रीय टीका आणि मानहानी सहन करावी लागली आणि इस्रायलला सिनाई भूशिरातून आपले सैन्य मागे घ्यावे लागले.
१९५५ साली बेन-गुरीयन परत एकदा पंतप्रधान म्हणून निवडून आले आणि १९६३ साली शेवटचा राजिनामा देईपर्यंत ते ह्या पदावर राहीले. बेन-गुरीयननी राजिनामा दिल्यावर लेवी इश्कोल (Levi Eshkol) ह्या पदावर नियुक्त झाले.
१९६१ साली नाझींचा युद्धगुन्हेगार अडोल्फ इचमॅनला (Adolf Eichmann) आर्जेन्टीनामधील बोयनोस एर्स येथे जेरबंद करुन इस्रायेलमध्ये सुनावणीसाठी आणण्यात आले. युरोपमधील ज्यूंच्या नाशाला कारणीभूत असलेल्या फायनल सोल्यूशनचा (Final Solution) तो मुख्य सूत्रधार होता. इचमॅन हा इस्रायली न्यायालयाने देहांत शासनाची शिक्षा दिलेला एकमेव माणूस ठरला.
१९६७ साली इस्रायल आणि शेजारी देशांमधील तणाव परत वाढला. सिरीया, जॉर्डन आणि इजिप्त युद्धाचे इशारे देत होते आणि इजिप्तने संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतिसेनेला गाझा पट्टीतून हाकलून दिले. जेव्हा इजिप्तने इस्रायलच्या जहाजांना तिरानच्या आखातातून जाण्यास मज्जाव केला तेव्हा इस्रायलने ह्या घटनेमुळे युद्धाशिवाय पर्याय नाही असे गृहित धरून ५ जूनला इजिप्तवर आक्रमण केले. आपल्या अरब शेजारयांशी सहा दिवस युद्ध लढल्यावर इस्रायलची सरशी झाली. इस्रायलने ह्या युद्धात तीन बड्या अरब राष्ट्रांच्या सैन्याला धूळ चारली व त्यांचे हवाईदल नेस्तनाबूत केले. क्षेत्राच्या भाषेत सांगावयाचे झाल्यास इस्त्रायलने वेस्ट बॅंक, गाझा पट्टी, सिनाई भूशिर आणि गोलन टेकड्या असा परिसर जिंकला. १९४९ ची हरीतरेषा ही कामकाज्याच्या दृष्टीने इस्रायलचा मुख्य भाग आणि इस्रायलव्याप्त भागामधील (ज्याला वादग्रस्त प्रदेश असेही संबोधले जाते) सीमारेषा ठरली. परंतु इस्रायलने आपला प्रभाव नंतर गोलन टेकड्या व पूर्व जेरुसलेमपर्यंत वाढवला. सिनाईचा भूभाग मात्र इजिप्तबरोबरील शांतिकरारानंतर इजिप्तला परत करण्यात आला. १९६७ साली इस्रायलच्या विमानाने यू.एस.एस. लिबर्टीवर हल्ला केला ज्यात ३४ अमेरीकन नौकासदस्य मारले गेले. अमेरीकन आणि इस्रायली तपासानंतर असे निष्पन्न झाले की लिबर्टीची ओळख पटण्यातील गोंधळामुळे हा दुर्दैवी अपघात झाला. १९६९ साली गोल्डा मीरची (Golda Meir) इस्रायलची पहिली आणि एकमेव महिला पंतप्रधान म्हणून निवड झाली.
- हे सुद्धा पहा: जेरुसलेमवरील नियंत्रणा, जेरुसलेमचे कायदे, गोलन टेकड्या, आणि इस्रायलव्याप्त प्रदेश
[संपादन] १९७०चे दशक
१९६८ आणि ७२ च्या दरम्यान इस्रायल आणि सिरीया व इस्रायल आणि इजिप्त दरम्यान सीमेजवळ अनेक चामकी झडल्या. ह्या युद्धाला War of Attrition असे संबोधले जाते. त्यातच भरीसभर म्हणून पॅलेस्टीनियन संघटनांनी इस्रायल आणि इतर देशातील ज्यू वसाहतींवर हल्ल्यांचे सत्र आरंभले. ह्या हल्ल्यांची परिसीमा १९७९च्या म्युनिच ऑलंपिक खेळांदरंयान गाठली गेली, ज्यावेळी पॅलेस्टीनियन दहशतवाद्यांनी म्युनिच हत्याकांडामध्ये इस्रायलच्या चमूस ओलिस धरले व नंतर त्यांची हत्या केली. इस्रायलने ह्याला ऑपरेशन दैवी कोप (Operation Wrath of God) च्यायोगे प्रत्युत्तर दिले ज्यामध्ये मोसादच्या सभासदांनी हत्याकांडामध्ये सामील असलेल्या जवळ जवळ सर्वांची हत्या केली.
शेवटी ६ ऑक्टोबर १९७३ रोजी, ज्यूंचा पवित्र Yom Kippur नावाचा उपवासाचा दिवस असताना, सिरीया आणि इजिप्तच्या सैन्याने इस्रायलवर अकस्मात हल्ला केला. परंतु, तयारीत नसलेल्या इस्रायली सैन्यावर काही ठिकाणी मात करुनही सिरीया आणि इजिप्तला १९६७ च्या युद्धात गमावलेला आपला सगळा प्रदेश परत मिळविता आला नाही. तरीसुद्धा ह्या युद्धानंतर तुलनात्मकदृष्ट्या ह्या प्रदेशात शांतता प्रस्थापित झाली ज्यायोगे इस्रायल आणि इजिप्त दरम्यान शांतता संधी करण्यास खतपाणी मिळाले.
१९७४ ला, मीरने राजीनामा दिल्यावर, यित्झाक राबिन (Yitzak Rabin) हे इस्रायलचे पाचवे पंतप्रधान झाले. नंतर, १९७७च्या नेसेट (Knesset) निवडणुकीत, १९४८ पासून सत्तेवर असलेल्या माराच (Ma'arach) पक्षाने सत्तेतून बाहेर पडुन खळबळ उडविली व मेनाचेम बेगीन (Menachem Begin) अध्यक्ष असलेला नवीन लिकुड (Likud) पक्ष अत्तेवर आला.
नंतर त्याच वर्षी नोव्हेंबर महिन्यामधे, तत्कालिन इजिप्तचे राष्ट्रपती असलेल्या अन्वर सदातनी इस्रायला ऎतिहासिक भेट दिली, व नेसेटसमोर भाषण दिले. अरब शेजार्यांनी इस्रायलला मान्य्ता देण्याची ही पहिली वेअ होती. ह्या भेटीची परिणीती दोन्ही देशांनी Camp David Accords करारावर सह्या करण्यात झाली. १९७९ साली अन्वर आणि बेगीन ह्यांनी इस्रायल-इजिप्त शांतता करारावर वॉशिंग्टन डी. सी. मध्ये स्वाक्षर्या केल्या. कराराप्रमाणे, इस्रायलने आपले सैन्य सिनाई भूशिरातून मागे घेतले व १९७० च्या दरम्यानच्या आप्ल्या वसाहती तेथून उठविल्या. तसेच हरितरेषेपलिकडील राहणार्या पॅलेश्तीनिंना सार्वभौमत्व देण्याचे दोन्ही पक्षांनी मान्य केले.
- हे सुद्धा पहा: War of Attrition, म्युनिच हत्याकांड, योम किप्पूर युद्ध, अन्वर सादात, आणि इस्रायल-इजिप्त शांतता करार
[संपादन] १९८०चे दशक
७ जुलै १९८१ साली इस्रायली हवाई दलाने इराकच्या
