बांगलादेश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बांगलादेश
গণপ্রজাতন্ত্রী বাংলাদেশ
गोणोप्रोजातोंत्री बांगलादेश
बांगलादेशाचे प्रजासत्ताक
बांगलादेशचा ध्वज बांगलादेशचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: -
राष्ट्रगीत: आमार शोनार बांगला
बांगलादेशचे स्थान
बांगलादेशचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
ढाका
अधिकृत भाषा बंगाली (बांगला)
इतर प्रमुख भाषा -
सरकार
 - राष्ट्रप्रमुख इयाजुद्दीन अहमद
 - पंतप्रधान खालेदा झिया
 - सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश -
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस (पाकिस्तानपासून)
मार्च २६, १९७१ 
 - प्रजासत्ताक दिन
क्षेत्रफळ
 - एकूण १,४३,९९८ किमी (९४वा क्रमांक)
 - पाणी (%) ७.०
लोकसंख्या
 -एकूण १४,७३,६५,००० (७वा क्रमांक)
 - घनता ९८५/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ३०५.६ अब्ज अमेरिकन डॉलर (३१वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न २,०११ अमेरिकन डॉलर (१४३वा क्रमांक)
राष्ट्रीय चलन बांगलादेशी टका (BDT)
आंतरराष्ट्रीय कालविभाग बांगलादेशी प्रमाणवेळ (BDT) (यूटीसी +६)
आंतरजाल प्रत्यय .bd
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ++८८०
राष्ट्र_नकाशा


बांगलादेश हे भारताच्या पूर्वेला असलेले बंगाली भाषिक मुस्लिम राष्ट्र आहे. १९४७ सालच्या अखंड भारताच्या फाळणीत पूर्व आणि पश्चिम अशा दोन भागात पाकिस्तानची निर्मिती झाली. त्यातला पूर्व भाग हा आजचा बांगलादेश म्हणून ओळखला जातो. तत्कालीन पूर्व पाकिस्तानाची भाषा बंगाली, तर पश्चिम पाकिस्तानात उर्दू वापरात होती. भाषा आणि इतर प्रश्नामुळे पूर्व पाकिस्तानातील जनतेचा असंतोष वाढत गेला. हा असंतोष मोडून काढण्यासाठी पाकिस्तान सरकारने लष्कर पाठविले व लष्करी कायदा लागू केला. पाकिस्तानी लषकराच्या मोहिमेमुळे आणि तणावाच्या परिस्थितीमुळे पूर्व पाकिस्तानातील नागरिकांचे भारतीय हद्दीत मोठ्या प्रमाणात स्थलांतर होऊ लागले. परिणामी भारताला या प्रकरणात लष्करी हस्तक्षेप करावा लागला. १९७१ मध्ये पूर्व पाकिस्तान वेगळे होऊन बांगलादेशाची निर्मिती झाली.

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये