मलेशिया
| मलेशिया Malaysia |
|||||
|
|||||
| ब्रीद वाक्य: Bersekutu Bertambah Mutu (एकी हेच बळ) |
|||||
| राष्ट्रगीत: नगाराकू (माझा देश) |
|||||
| मलेशियाचे जागतिक नकाशावरील स्थान | |||||
| राजधानी | पुत्रजय, क्वालालंपूर |
||||
| सर्वात मोठे शहर | क्वालालंपूर | ||||
| अधिकृत भाषा | मलाय | ||||
| सरकार | संविधानिक एकाधिकारशाही व सांसदीय लोकशाही | ||||
| - राष्ट्रप्रमुख | मिझान झैनल अबिदीन | ||||
| - पंतप्रधान | अब्दुल्ला अहमद बदावी | ||||
| महत्त्वपूर्ण घटना | |||||
|---|---|---|---|---|---|
| - स्वातंत्र्य दिवस | ऑगस्ट ३१, इ.स. १९५७ (युनायटेड किंग्डमपासून) सप्टेंबर १६, इ.स. १९६३(सबा, सारावाक, सिंगापूर यांसमवेतच्या संघराज्यापासून) |
||||
| क्षेत्रफळ | |||||
| - एकूण | ३२९,८५४ किमी२ (६७वा क्रमांक) | ||||
| - पाणी (%) | ०.३ | ||||
| लोकसंख्या | |||||
| - २००९ | २,८३,१०,००० (४३वा क्रमांक) | ||||
| - घनता | ८५.८/किमी² | ||||
| वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी) | |||||
| - एकूण | ३५७.९ अब्ज अमेरिकन डॉलर (२९वा क्रमांक) | ||||
| - वार्षिक दरडोई उत्पन्न | १४,४०० अमेरिकन डॉलर (५७वा क्रमांक) | ||||
| मानवी विकास निर्देशांक (२००७) | ▲ ०.८२९[१] (उच्च) (६६ वा) | ||||
| राष्ट्रीय चलन | मलेशियन रिंगिट (MYR) | ||||
| आंतरराष्ट्रीय कालविभाग | मलेशियन प्रमाणवेळ (MST) (यूटीसी +८) | ||||
| आंतरजाल प्रत्यय | .my | ||||
| आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | +६० | ||||
मलेशिया हा तेरा राज्ये आणि तीन संघराज्यीय प्रदेशांनी बनलेला आग्नेय आशियामधील एक देश आहे. मलेशियाची राजधानी क्वालालंपूर असून पुत्रजय येथे संघराज्य शासनाचे मुख्य केंद्र आहे. ३,२९,८४७ वर्ग कि.मी. क्षेत्रफळाचा विस्तार असलेल्या या देशाचे दक्षिण चिनी समुद्राने विभागलेले द्वीपकल्पीय मलेशिया आणि मलेशियन बोर्निओ हे प्रमुख दोन भाग आहेत. थायलंड, इंडोनेशिया, सिंगापूर, ब्रुनेई आणि फिलिपाइन्स या देशांना लागून मलेशियाच्या सीमा आहेत. हा देश विषुववृत्ताजवळ वसलेला असल्यामुळे येथील हवामान विषुववृत्तीय हवामानप्रकारानुसार आहे. मलेशियामध्ये वेस्टमिन्स्टर धर्तीवरील संसदीय लोकशाही असून सत्तेच्या सर्वोच्चपदी यांग दी-पेर्तुआन आगोंग (राजा) व कार्यकारी प्रमुखपदी पंतप्रधान असतात.
अनुक्रमणिका |
धर्म [संपादन]
मलेशिया हा मुस्लिम देश आहे परंतु सहिष्णुता धोरणानुसार येथे हिंदु मंदिरे असण्यासाठी परवानगी आहे.
भूगोल [संपादन]
जमिनीच्या क्षेत्रफळानुसार ३,२९,८४७ वर्ग कि.मी. क्षेत्रपफळाचा मलेशिया जगात ६६ व्या क्रमांकाचा मोठा देश असून २.८ कोटी लोकसंख्येसह जगाला ४३ व्या क्रमांकावर आहे. याच्या पश्चिमेस थायलंड, पूर्वेस इंडोनेशिया व ब्रुनेई हे देश असून दक्षिणेस जोहोर सामुद्रधुनीवरील पुलाने जोडला गेलेला सिंगापूर आहे. व्हिएतनाम व फिलिपिन्स या देशांशी मलेशियाच्या सागरी हद्दी भिडल्या आहेत.
राजकीय विभाग [संपादन]
मलेशियात १३ राज्ये व ३ संघशासित प्रदेश आहेत.
मोठी शहरे [संपादन]
संदर्भ [संपादन]
- ↑ मानवी विकास अहवाल - २००९. मानवी विकास निर्देशांकाचे कल : सारणी 'ग'. संयुक्त राष्ट्रे. ५ ऑक्टोबर, इ.स. २००९ रोजी पाहिले. (इंग्लिश मजकूर)
बाह्य दुवे [संपादन]
| विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- अधिकृत शासकीय संकेतस्थळ (भासा मलायू व इंग्लिश मजकूर)
- पंतप्रधान कार्यालयाचे संकेतस्थळ (भासा मलायू व इंग्लिश मजकूर)
|
||||||||||||||||||||||
|
|||||||||||