मेक्सिको
| मेक्सिको Estados Unidos Mexicanos United Mexican States मेक्सिकोची संयुक्त संस्थाने |
|||||
|
|||||
| राष्ट्रगीत: मेक्सिकानोस, अल् ग्रितो दे ग्वेरा | |||||
| मेक्सिकोचे जागतिक नकाशावरील स्थान | |||||
| राजधानी (व सर्वात मोठे शहर) |
मेक्सिको सिटी |
||||
| अधिकृत भाषा | स्पॅनिश | ||||
| सरकार | |||||
| - राष्ट्रप्रमुख | एन्रिक पेन्या नियेतो | ||||
| महत्त्वपूर्ण घटना | |||||
|---|---|---|---|---|---|
| - स्वातंत्र्य दिवस | सप्टेंबर १५,१८१० | ||||
| क्षेत्रफळ | |||||
| - एकूण | १९,७२,५५० किमी२ (१५वा क्रमांक) | ||||
| - पाणी (%) | २.५ | ||||
| लोकसंख्या | |||||
| -एकूण | ११,१२,११,७८९ (११वा क्रमांक) | ||||
| - घनता | ५५/किमी² | ||||
| वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी) | |||||
| - एकूण | १,१४३ अब्ज अमेरिकन डॉलर | ||||
| - वार्षिक दरडोई उत्पन्न | |||||
| राष्ट्रीय चलन | मेक्सिकन पेसो(MXN) | ||||
| आंतरजाल प्रत्यय | .mx | ||||
| आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | +५२ | ||||
मेक्सिको किंवा मेक्सिकोची संयुक्त संस्थाने (स्पॅनिशमध्ये एस्तादोस युनिदोस मेक्सिकानोस) हा उत्तर अमेरिकेतील एक देश आहे. मेक्सिको जगातील सर्वांत जास्त स्पॅनिशभाषक असलेला देश आहे. मेक्सिकोला लॅटिन अमेरिकेचा एक भाग समजले जाते.
अनुक्रमणिका |
इतिहास [संपादन]
नावाची व्युत्पत्ती [संपादन]
प्रागैतिहासिक कालखंड [संपादन]
स्पॅनिश कालखंड [संपादन]
स्वतंत्र मेक्सिको [संपादन]
भूगोल [संपादन]
मेक्सिको उत्तर अमेरिकेच्या ईशान्य भागात असून त्याचा आकार साधारणत: त्रिकोणी आहे. वायव्येपासून ईशान्य टोकापर्यंतची लांबी अंदाजे ३,००० कि.मी. व रुंदी उत्तरसीमेवर २,००० कि.मी. तर तेहुआन्तेपेकच्या सामुद्रधुनीजवळ २२० कि.मी. इतकी आहे. मेक्सिकोचा मध्य भाग एक उंच पठार आहे. पठाराच्या पूर्व-पश्चिमेस पर्वतरांगा असून त्यापलिकडे तटीय प्रदेश आहेत. मेक्सिकोचे दोन द्वीपकल्प, पश्चिमेस बाहा कॅलिफोर्निया व पूर्वेस युकातन यांची भौगोलिक रचना वेगळीच आहे. १,२५० कि.मी. लांबीचा बाहा कॅलिफोर्निया पॅसिफिक महासागर व कॅलिफोर्नियाच्या अखाताच्या मधली चिंचोळी पट्टी आहे तर युकातन मेक्सिकोचा अखात व काम्पीचीच्या अखातामधील भूभाग आहे.
मेक्सिकोच्या भौगोलिक रचना व हवामान यात वैविध्य आहे. सोनोराच्या दगड-धोंड्यांचा वाळवंटापासून सिनालोआच्या घनदाट जंगलापर्यंत सगळ्याप्रकारचे हवामान येथे आढळते.
उत्तर सीमेवरील रियो ब्राव्हो देल नोर्ते (रियो ग्रान्दे), दक्षिण सीमेवरील उसुमासिन्ता व ग्रिहाल्वा, बाल्सास, पानुको, याक्वी वगैरे मक्सिकोतील प्रमुख नद्या आहेत.
चतु:सीमा [संपादन]
- उत्तरेला अमेरिकेची संयुक्त संस्थाने
- पश्चिम व दक्षिणेला पॅसिफिक महासागर
- अग्न्येला बेलीझ व ग्वाटेमाला हे देश
- पूर्वेला मेक्सिकोचा अखात
विभाग [संपादन]
मेक्सिको ३१ राज्य व १ केंद्रशासित प्रदेशात विभागलेले आहे.
प्रत्येक राज्याचे स्वतंत्र संविधान असून विधिमंडळ आहे. राज्याचे नागरिक राज्यपाल व विधायक निवडतात.
मेक्सिको सिटीचा केंद्रशासित प्रदेश वगळता राज्ये पुढीलप्रमाणे -
- अग्वासकाल्येंतेस
- बाहा कॅलिफोर्निया
- बाहा कॅलिफोर्निया सुर
- काम्पीची
- चियापास
- शिवावा
- क्वाह्विला
- कोलिमा
- ड्युरॅंगो
- ग्वानाहुआतो
- ग्वेरेरो
- इदाल्गो
- शालिस्को
- मेक्सिको
- मिचोआकान
- मोरेलोस
- नयारित
- नुएव्हो लिओन
- ओवाहाका
- पेब्ला
- क्वेरेतारो
- किंताना रू
- सान लुइस पोतोसी
- सिनालोआ
- सोनोरा
- टबॅस्को
- तामौलिपास
- त्लाह्काला
- व्हेराक्रुझ
- युकातन
- झाकातेकास
मोठी शहरे [संपादन]
| नाव | राज्य | वस्ती |
|---|---|---|
| मेक्सिको सिटी | केंद्रशासित प्रदेश | २,२०,००,००० |
| ग्वादालाहारा | शालिस्को | ४७,००,००० |
| मोन्तेरे, मेक्सिको | नुएव्हो लिओन | ३६,००,००० |
| पेब्ला | पेब्ला राज्य | २६,००,००० |
| तिहुआना | बाहा कॅलिफोर्निया | १५,००,००० |
| लिओन | ग्वानाहुआतो | १२,००,००० |
| तोलुका | मेक्सिको | १२,००,००० |
| सिउदाद हुआरेझ | शिवावा | ११,००,००० |
| तोरेओन | क्वाह्विला | ११,००,००० |
| सान लुइस पोतोसी | सान लुइस पोतोसी | ८,००,००० |
समाजव्यवस्था [संपादन]
वस्तीविभागणी [संपादन]
अलिकडच्या जनगणनेनुसार मेक्सिकोची लोकसंख्या १० कोटी ३० लाख आहे. जगातील स्पॅनिश बोलणार्या देशांपैकी सगळ्यात जास्त लोकसंख्या मेक्सिकोची आहे.[१]
धर्म [संपादन]
शिक्षण [संपादन]
संस्कृती [संपादन]
राजकारण [संपादन]
अर्थतंत्र [संपादन]
संदर्भ व नोंदी [संपादन]
- ↑ स्पॅनिश भाषा इतिहास. Today Translations. 2007-10-01 रोजी पाहिले.