कंबोडिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कंबोडिया
ព្រះរាជាណាចក្រកម្ពុជា
Kingdom of Cambodia
कंबोडियाचे राजतंत्र
कंबोडियाचा ध्वज कंबोडियाचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: देश, धर्म, राजा
राष्ट्रगीत: United States Navy Band - Nokoreach.ogg नाकोर रेच
नाकोर रेच
कंबोडियाचे स्थान
कंबोडियाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
फ्नोम पेन्ह
अधिकृत भाषा ख्मेर
सरकार
 - राष्ट्रप्रमुख नरोदोम सिहमोनी (राजा)
 - पंतप्रधान हुन सेन
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस नोव्हेंबर ९, १९५३ (फ्रान्सपासून
क्षेत्रफळ
 - एकूण १,८१,६६६ किमी (८८वा क्रमांक)
 - पाणी (%) २.५
लोकसंख्या
 - २००८ १,४२,४१,६४० (६३वा क्रमांक)
 - घनता ७८/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ३६.८२ अब्ज अमेरिकन डॉलर (८९वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न २,६०० अमेरिकन डॉलर (१३३वा क्रमांक)
राष्ट्रीय चलन कंबोडियन रिएल
आंतरराष्ट्रीय कालविभाग यूटीसी+७
आय.एस.ओ. ३१६६-१ KH
आंतरजाल प्रत्यय .kh
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ८५५
राष्ट्र_नकाशा


कंबोडिया (अधिकृत नाव: ख्मेर: 'KingdomofCambodia.svg', मराठी: 'कंबोडियाचे राजतंत्र') हा आग्नेय आशियातील एक देश आहे. इसवी सनाच्या अकराव्या शतकापासून चौदाव्या शतकापर्यंत बहुतांश इंडोचायना द्वीपकल्पावर राज्य गाजवणार्‍या सामर्थ्यवान हिंदू-बौद्ध ख्मेर साम्राज्याचे वारसदार राज्य म्हणजेच आजचा आधुनिक कंबोडिया म्हणता येईल. फ्नोम पेन्ह येथे आधुनिक कंबोडियाची राजधानी वसलेली आहे.
या देशाच्या पश्चिमेस व वायव्येस थायलंड, ईशान्येस लाओस, पूर्वेस व आग्नेयेस व्हिएतनाम हे देश असून दक्षिणेस थायलंडचे आखात आहे.
कंबोडियामध्ये घटनात्मक राजेशाही असून शासनाच्या सर्वोच्चपदी राजा असतो, तर पंतप्रधान कार्यकारी प्रशासकीय प्रमुख असतो.