पूर्व तिमोर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पूर्व तिमोर
Repúblika Demokrátika Timór Lorosa'e
República Democrática de Timor-Leste
Democratic Republic of Timor-Leste
तिमोर-लेस्तेचे लोकशाही प्रजासत्ताक
पूर्व तिमोरचा ध्वज पूर्व तिमोरचे चिन्ह
ध्वज चिन्ह
राष्ट्रगीत: पॅट्रिया
पूर्व तिमोरचे स्थान
पूर्व तिमोरचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
दिली
अधिकृत भाषा पोर्तुगीज
सरकार
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस २८ नोव्हेंबर १९७५ 
 - प्रजासत्ताक दिन २० मे २००२ 
क्षेत्रफळ
 - एकूण १४,८७४ किमी (१५९वा क्रमांक)
लोकसंख्या
 -एकूण ११,१५,००० (१५५वा क्रमांक)
 - घनता ६४/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण २.५१८ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न  
राष्ट्रीय चलन अमेरिकन डॉलर, पूर्व तिमोर सेंतावो नाणी
आय.एस.ओ. ३१६६-१ TL
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +670
राष्ट्र_नकाशा


पूर्व तिमोर (किंवा तिमोर-लेस्ते) हा प्रशांत महासागरातील एक देश आहे. भौगोलिकदृष्ट्या पूर्व तिमोर आग्नेय आशियामेलनेशिया ह्या दोन्ही भागांत गणला जातो.

पूर्व तिमोर हा २१व्या शतकामध्ये स्वातंत्र्य मिळालेला पहिला देश आहे. १९७५ साली पूर्व तिमोरने पोर्तुगालपासुन स्वातंत्र्याची घोषणा केली, पण त्याच वर्षी इंडोनेशियाने पूर्व तिमोरवर लष्करी कारवाई करून कब्जा मिळवला व पूर्व तिमोर आपल्या देशाचे २७वे राज्य असल्याचे जाहीर केले. १९९९ साली इंडोनेशियाने माघार घेतल्यानंतर २० मे २००२ रोजी स्वतंत्र पूर्व तिमोर देशाला मान्यता देण्यात आली.

अनेक वर्षे चाललेल्या स्वातंत्र्यलढ्यामुळे पूर्व तिमोरची आर्थिक स्थिती हलाखीची बनली आहे. पूर्व तिमोरचा मानवी विकास सूचक आशियातील देशांमध्ये सर्वात खालच्या स्थानावर आहे.