आर्मेनिया
| आर्मेनिया Հայաստանի Հանրապետություն हायास्तानी हान्रापेतुत्यून आर्मेनियाचे प्रजासत्ताक |
|||||
|
|||||
| ब्रीद वाक्य: मेक आझ्ग, मेक मशकौईत (अर्थ: एक राष्ट्र, एक संस्कृती) | |||||
| राष्ट्रगीत: मेर हायरेनिक (अर्थ: आपली पितृभू) | |||||
| आर्मेनियाचे जागतिक नकाशावरील स्थान | |||||
| राजधानी (व सर्वात मोठे शहर) |
येरेवान | ||||
| अधिकृत भाषा | आर्मेनियन | ||||
| इतर प्रमुख भाषा | - | ||||
| सरकार | |||||
| - राष्ट्रप्रमुख | रॉबर्ट कोचारियन | ||||
| - पंतप्रधान | आंद्रानिक मार्गार्यान | ||||
| - सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश | - | ||||
| महत्त्वपूर्ण घटना | |||||
|---|---|---|---|---|---|
| - स्वातंत्र्य दिवस | (सोव्हिएत रशियापासून) ऑगस्ट २३, १९९० (घोषित) सप्टेंबर २१, १९९१ |
||||
| - प्रजासत्ताक दिन | - | ||||
| क्षेत्रफळ | |||||
| - एकूण | २९,८०० किमी२ (१४२वा क्रमांक) | ||||
| - पाणी (%) | ४.७१ | ||||
| लोकसंख्या | |||||
| -एकूण | ३२,१५,८०० (१३४वा क्रमांक) | ||||
| - घनता | १००/किमी² | ||||
| वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी) | |||||
| - एकूण | १३.६५ अब्ज अमेरिकन डॉलर (१२७वा क्रमांक) | ||||
| - वार्षिक दरडोई उत्पन्न | ४,६०० अमेरिकन डॉलर (११५वा क्रमांक) | ||||
| राष्ट्रीय चलन | आर्मेनियन द्राम | ||||
| आंतरराष्ट्रीय कालविभाग | - (यूटीसी +४/+५) | ||||
| आंतरजाल प्रत्यय | .am | ||||
| आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | ++३७४ | ||||
आर्मेनिया (अधिकृत नाव: मराठी: 'आर्मेनियाचे प्रजासत्ताक') हा काळा समुद्र व कास्पियन समुद्र यांमधील युरेशियाच्या दक्षिण कॉकेशस भागातील एक भूपरिवेष्ठित देश आहे. या देशाच्या पश्चिमेस तुर्कस्तान, उत्तरेस जॉर्जिया, पूर्वेस अझरबैजान, तर दक्षिणेस इराण व अझरबैजानाचा नाख्चिवान प्रांत आहेत. पूर्व युरोप व पश्चिम आशिया यांच्या उबरठ्यावरील या देशाचे ऐतिहासिक काळापासून युरोपाशी राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक लागेबांधे आहेत.
भूतपूर्व सोव्हिएत संघापैकी एक घटक प्रजासत्ताक असलेला आर्मेनिया आता बहुपक्षीय लोकशाहीवादी प्रजासत्ताक आहे. आर्मेनियाला प्राचीन सांस्कृतिक व राजकीय वारसादेखील लाभला आहे. इसवी सनाच्या चौथ्या शतकाच्या सुरुवातीला (सर्वसाधारण मान्यतेनुसार इ.स. ३०१) आर्मेनियाचे राज्य हे या ख्रिश्चन धर्म स्वीकारणारे या परिसरातील पहिले राज्य होते. आजही आर्मेनियातील बहुसंख्य जनता ख्रिश्चन धर्मीय असली तरीही आर्मेनियाचे प्रजासत्ताक घटनात्मक दृष्ट्या धर्मनिरपेक्ष राज्य आहे.
अनुक्रमणिका |
इतिहास[संपादन]
नावाची व्युत्पत्ती[संपादन]
आर्मेनियाचे स्थानिक भाषेतील नाव हय्क आहे. मध्ययुगात याला हयस्तान असे नाव होते. हय्क हा आर्मेनियन लोकांचा मूळ पुरुष मानला जातो. त्याच्या नावावरुन त्या देशाला हयस्तान हे नाव मिळाले. कोरेनच्या मोझेसनुसार हय्कने बाबिलोनियाचा राजा बेल ह्याला ख्रिस्तपूर्व २४९२ मध्ये युध्दात हरवले व अरारात ह्या भूभागावर आपले राज्य स्थापन केले.
प्राचीन फारसी कोरीव लेखात (इ.स.पू. ५१५) आर्मेनियाचा उल्लेख आर्मिना असा आढळतो. झेनोफोन या ग्रीकांच्या सेनापतीने आर्मेनियन लोकजीवन व आदरातिथ्याबद्दल लिहून ठेवले आहे. त्याच्या नोंदीनुसार आर्मेनियन लोक फारसी सदृश्य भाषा बोलतात.
प्रागैतिहासिक कालखंड[संपादन]
भूगोल[संपादन]
चतु:सीमा[संपादन]
आर्मेनिया युरेशियामधील दक्षिण कॉकेसस पर्वतांत काळा समुद्र व कॅस्पियन समुद्राच्या मध्ये असलेला देश आहे. आर्मेनियाच्या पश्चिमेस तुर्कस्तान, उत्तरेस जॉर्जिया, पूर्वेस अझरबैजान व दक्षिणेस नाख्चिवान हा अझरबैजानचा प्रदेश व इराण आहेत.
आर्मेनियाला खुल्या समुद्राचा किनारा नाही.
राजकीय विभाग[संपादन]
आर्मेनिया दहा प्रांतात (आर्मेनियन भाषेत "मार्झर"एकवचन "मार्झ") विभागला गेला असून येरेवान ह्या शहराला (आर्मेनियन कघाक)राजधानी म्हणून विशेष प्रशासकिय दर्जा देण्यात आला आहे.प्रत्येक प्रांताचा मुख्य कार्यकारी अधिकारी (मार्झपत)आर्मेनिया सरकार कडून नियुक्त केला जातो.येरेवानचा मुख्य कार्यकारी अधिकारी महापौर असून त्याची नेमणूक अध्यक्षांकडून केली जाते.
प्रत्येक प्रांतात स्वयंशासित असे विभाग (आर्मेनियन हमान्क्नेर/एकवचन हमान्क) येतात.प्रत्येक विभागात नागरी किंवा ग्रामिण वस्त्या असतात.२००७ मधील नोंदींनुसार आर्मेनियात ४९ नागरी भाग असून ८६६ ग्रामिण भाग आहेत.येरेवान या राजधानीच्या शहराचे १२ स्वायत्त विभाग आहेत.
मोठी शहरे[संपादन]
समाजव्यवस्था[संपादन]
वस्तीविभागणी[संपादन]
धर्म[संपादन]
शिक्षण[संपादन]
संस्कृती[संपादन]
राजकारण[संपादन]
अर्थतंत्र[संपादन]
संदर्भ[संपादन]
बाह्य दुवे[संपादन]
|
||||||||||||||||||||||
| विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |