श्रीलंका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
श्रीलंका
இலங்கை சனநாயக சோஷலிசக் குடியரசு
Democratic Socialist Republic of Sri Lanka
श्रीलंकेचे समाजवादी लोकशाही प्रजासत्ताक
(Democratic Socialist Republic of Sri Lanka)
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाचे चिन्ह
ध्वज चिन्ह
राष्ट्रगीत: श्रीलंका माता
श्रीलंकाचे स्थान
श्रीलंकाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी श्री जयवर्धनेपुरा
सर्वात मोठे शहर कोलंबो
अधिकृत भाषा सिंहला, तमिळ
सरकार
 - राष्ट्रप्रमुख महिंद राजपक्ष
 - पंतप्रधान रत्नसिरी विक्रमनायके
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस फेब्रुवारी ४, १९४८
(ब्रिटनकडून) 
क्षेत्रफळ
 - एकूण ६५,६१० किमी (१२२वा क्रमांक)
 - पाणी (%) ४.४
लोकसंख्या
 -एकूण २,०७,४३,००० (५२वा क्रमांक)
 - घनता ३१६/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ८६.७२ अब्ज अमेरिकन डॉलर (६१वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ४३०० अमेरिकन डॉलर (१११वा क्रमांक)
राष्ट्रीय चलन श्रीलंकी रूपया (LKR)
आंतरराष्ट्रीय कालविभाग यूटीसी +५.३०
आय.एस.ओ. ३१६६-१ LK
आंतरजाल प्रत्यय .lk
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +९४
राष्ट्र_नकाशा


श्रीलंका (सिंहला: ශ්‍රී ලංකා; तमिळ: இலங்கை ;), अधिकृत नाव श्रीलंकेचे समाजवादी लोकशाही प्रजासत्ताक, हा हिंदी महासागरात भारतीय उपखंडाच्या दक्षिणेस वसलेला द्वीप-देश आहे. श्रीलंका व भारताच्या दक्षिण किनाऱ्यादरम्यान ३१ कि.मी. रुंदीची पाल्कची सामुद्रधुनी पसरली आहे. चहा, कॉफी, नारळ, रबर व मुळातील श्रीलंकेतील असलेली दालचिनी या पदार्थांच्या निर्यातीसाठी श्रीलंकेची ख्याती आहे. उष्णकटिबंधीय वने, समुद्रकिनारे यांमुळे लाभलेले निसर्गसौंदर्य हे पर्यटनाच्या दृष्टीने श्रीलंकेचे आकर्षण आहे. येथे नैसर्गिक खड्यांच्या खाणी आढळतात. सम्राट अशोकाने पाठवलेले बौद्ध भिक्षु दूत येथे आले व त्यांनी येथे बौद्ध धर्माची सुरुवात केली. त्यांचे अस्तित्व अनुराधापूर,श्रीलंका ह्या उत्तर पश्चिमेच्या भागात स्पष्ट दिसते.

मोठी शहरे[संपादन]

श्री जयवर्धनेपुरा कोट ही श्रीलंकेची राजधानी आहे. कोलंबो ही श्रीलंकेची पुर्वीची राजधानी होती व सध्या देशातील सर्वात मोठे शहर आहे.

बाह्य दुवे[संपादन]