टांझानिया
| टांझानिया Jamhuri ya Muungano wa Tanzania United Republic of Tanzania टांझानियाचे संयुक्त प्रजासत्ताक |
|||||
|
|||||
| ब्रीद वाक्य: Uhuru na Umoja (स्वातंत्र्य व एकात्मता) | |||||
| टांझानियाचे जागतिक नकाशावरील स्थान | |||||
| राजधानी | डोडोमा |
||||
| सर्वात मोठे शहर | दार एस सलाम | ||||
| अधिकृत भाषा | स्वाहिली, इंग्लिश | ||||
| सरकार | |||||
| महत्त्वपूर्ण घटना | |||||
|---|---|---|---|---|---|
| - प्रजासत्ताक दिन | २६ एप्रिल १९६४ | ||||
| क्षेत्रफळ | |||||
| - एकूण | ९,४५,२०३ किमी२ (२७वा क्रमांक) | ||||
| - पाणी (%) | ६.२ | ||||
| लोकसंख्या | |||||
| -एकूण | ४,३७,३९,००० (३२वा क्रमांक) | ||||
| - घनता | ४६.३/किमी² | ||||
| वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी) | |||||
| - एकूण | ५३.७९ अब्ज अमेरिकन डॉलर | ||||
| - वार्षिक दरडोई उत्पन्न | १,३५३ अमेरिकन डॉलर | ||||
| आंतरजाल प्रत्यय | .tz | ||||
| आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | +२५५ | ||||
टांझानिया हा पूर्व आफ्रिकेतील एक देश आहे. डोडोमा ही टांझानियाची राजधानी आहे, आणि दार एस सलाम हे टांझानियातले सर्वांत मोठे शहर आहे. स्वाहिली ही ह्या देशाची राष्ट्रभाषा आहे.
टांझानियाच्या नागरिकांना आपल्या संस्कृतीबद्दल आणि आपल्या भाषेबद्दल अत्यंत अभिमान वाटतो.
पूर्व आफ्रिकेचा भारताशी प्रागैतिहासिक काळापासून व्यापारिक संबंध आहे. काही शतकांपूर्वी भारतात आलेल्या आफ्रिकी सरदाराना "सिद्दी" असे आणि आफ्रिकी नाविकांना व रक्षकांना "हबशी" असे महाराष्ट्रीय लोक म्हणत असत. आफ्रिकेतून आलेल्या जमातींची बहुसंख्या असलेली काही खेडी भारतात अजूनही आहेत. भारतीय सरकार त्या जमातींची आता अनुसूचित जाती-जमातींमध्ये वर्गवारी करते.
शीतयुद्धाच्या काळातल्या आंतर्राष्ट्रीय राजकारणात अलिप्त देशांच्या गटात सामील होऊन टांझानिआने भारताच्या बरोबरीने महत्त्वाची भूमिका बजावली होती. टांझानिआचे पूर्वराष्ट्राध्यक्ष स्व. म्वालीमु ज्युलिअस न्यरेरे आणि भारताच्या पूर्वपंतप्रधान स्व. इंदिरा गांधी ह्या दोघांमधे जवळचे राजकीय संबंध होते.
इ.स. १९६०च्या सुमाराला युगांडा देशातल्या इदी अमिन ह्या क्रूर हुकुमशहाने जेव्हा भारतीय मूळवंशी जनतेची त्या देशातून हकालपट्टी केली होती तेव्हा स्व. म्वालीमु जुलिअस न्यरेरे ह्यांनी त्या जनतेला टांझानिआत आसरा दिला होता.
डिसेंबर इ.स. २००५ मध्ये झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी (चामा चा मापिंदुझी-CCM) पक्षाचे श्री.जकाया किक्वेते राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत.
विसाव्या शतकाच्या सुरवातीपासून मराठी लोक टांझानिआत तुरळक प्रमाणात स्थायिक झाले आहेत. सध्या टांझानिआतली मराठी भाषिकांची संख्या १५०च्या आसपास आहे.
अनुक्रमणिका |
[संपादन] इतिहास
[संपादन] नावाची व्युत्पत्ती
[संपादन] प्रागैतिहासिक कालखंड
कित्येक शतकांपूर्वी ह्या देशावर प्रथम जर्मन लोकांनी अतिक्रमण केले होते.
[संपादन] भूगोल
[संपादन] चतु:सीमा
टांझानियाच्या उत्तरेस युगांडा, केन्या हे देश व लेक व्हिक्टोरिया हे सरोवर आहेत. पूर्वेस केन्या व हिंदी महासागर आहेत. दक्षिणेस मोझांबिक, मलावी व झांबिया हे देश व लेक न्यासा हे सरोवर आहेत. पश्चिमेस बुरुंडी, र्वांडा व काँगोचे प्रजासत्ताक हे देश व लेक टांजानिका हे सरोवर आहेत.
[संपादन] राजकीय विभाग
[संपादन] मोठी शहरे
[संपादन] समाजव्यवस्था
[संपादन] वस्तीविभागणी
[संपादन] धर्म
[संपादन] शिक्षण
[संपादन] संस्कृती
[संपादन] राजकारण
[संपादन] अर्थतंत्र
[संपादन] खेळ
[संपादन] बाह्य दुवे
- महाराष्ट्र मंडळ दार ए सलाम टांझानिआ
- महाराष्ट्र मंडळ दार ए सलाम टांझानिआ याहू ग्रूप
- मराठी - किस्वाहिली शब्दसंहिता