ब्रुनेई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ब्रुनेई
Negara Brunei Darussalam
بروني دارالسلام
ब्रुनेईचे राज्य
Flag of Brunei.svg
Coat of arms of Brunei.svg
LocationBrunei.svgजागतिक नकाशावरील स्थान
राजधानी बंदर सेरी बेगवान
राष्ट्रप्रमुख हसनल बोल्किया अथवा सुलतान हसनल बोलकेह (सुलतान)
राष्ट्रगीत अल्ला पेलिहराकन सुलतान
स्वातंत्र्यदिवस जानेवारी १, १९८४ (ब्रिटिश नियंत्रणातून)
राष्ट्रीय भाषा ब्रुनेई मलाय
राष्ट्रीय चलन ब्रुनेई डॉलर (BND)
क्षेत्रफळ
एकूण–
पाणी–
१७२वा क्रमांक

५,७६५ वर्ग किमी

८.६ %
लोकसंख्या
एकूण–
घनता
वा क्रमांक
३,८१,३७१ (जुलै २००८, अंदाज)
६६ प्रती वर्ग किमी
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +६७३
आंतरजाल प्रत्यय .bn
वार्षिक सकल उत्पन्न
(GDP)
१३८वा क्रमांक
१०.१९९ अब्ज अमेरिकन डॉलर
वार्षिक दरडोई उत्पन्न
(GDP per capita)
२६वा क्रमांक
२४,८२६ अमेरिकन डॉलर

Brunei-CIA WFB Map.png
राष्ट्र नकाशा


ब्रुनेई दारुस्सलाम (अधिकृत नाव: मलाय:Negara Brunei Darussalam) हा आग्नेय आशियातील बोर्निओ बेटाच्या उत्तर किनार्‍यास वसलेला देश आहे. दक्षिण चिनी समुद्राकडेने असणार्‍या समुद्रकिनारपट्टीखेरीज इअतर सर्व बाजूंनी हा देश मलेशियाच्या सारावाक राज्याने वेढलेला आहे. किंबहुना सारावाक राज्यामधील लिंबांग प्रदेशामुळे ब्रुनेई भूराजकीयदृष्ट्या दोन भागांमध्ये विभागला गेला आहे.

[संपादन] इतिहास

इ.स. ५१८ पासूनच ब्रुनाईचे चिनी व्यापाऱ्यांशी संबंध होते. ७ व्या ते १३ व्या शतकांच्या दरम्यान सुमात्राबेटाच्या श्रीविजय राजघराण्याची आणि जावा बेटातील मजापहित राजघराण्याची सत्ता ब्रुनाईवर होती. १५ व्या शतकात या राजघराण्यांचा अस्त झाला. ब्रुनाईचं मोठय़ा प्रमाणावर इस्लामीकरण होत गेलं, सुलतानशाही स्थापन झाली आणि युरोपिय सत्ता येईपर्यंत ती टिकून राहिली.

[संपादन] युरोपीय सत्ता

पोर्तुगीज, डच, स्पॅनिश येथे आले. त्यांनी केलेल्या आक्रमणांमुळे एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी सुलतानाची सत्ता सारायाक लगतच्या काही भागापुरतीच मर्यादित राहिली. इ.स. १८९८ ते इ.स. १९५९ या ६० वर्षांत सुलतानाचं स्थान दुय्यम बनले. इ.स. १९३१ च्या सुमारास या डोंगराळ भूप्रदेशात खनिज तेल उत्पादनास सुरुवात झाली. पाठोपाठ दुसरे महायुद्ध झाले. या भूप्रदेशावर जपानने विजय मिळवला. युद्ध संपताच या भूप्रदेशावर ऑस्ट्रेलियाने ताबा घेतला. ब्रिटिश नागरी प्रशासनाची सुरुवात झाली. परंतु इ.स. १९५९ च्या सुमारास पुन्हा सुलतानाचं निर्विवाद वर्चस्व इथे प्रस्थापित झाले.

[संपादन] सांप्रत स्थिती

४ जिल्हे आणि ३८ तालुके ही इथली प्रशासकीय रचना आहे.



इतर भाषांमध्ये