इजिप्त

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इजिप्त
جمهورية مصر العربية
जूम्हुरीया मेस्सर अल अरबीयाह
इजिप्तचे अरब प्रजासत्ताक
Flag of Egypt.svg
Coat of arms of Egypt.svg
LocationEgypt.pngजागतिक नकाशावरील स्थान
राजधानी कैरो
सर्वात मोठे शहर कैरो
राष्ट्रप्रमुख होस्नी मुबारक
पंतप्रधान अहमद नझीफ
राष्ट्रगीत बिलादी, बिलादी, बिलादी
स्वातंत्र्यदिवस फेब्रुवारी २८, १९२२
प्रजासत्ताक दिन जून १८, १९५३
राष्ट्रीय भाषा अरबी
राष्ट्रीय चलन इजिप्शियन पाऊंड(EGP)
क्षेत्रफळ
एकूण–
पाणी–
३०वा क्रमांक

१०,०१,४५० वर्ग किमी

०.६ %
लोकसंख्या
एकूण–
घनता
१६वा क्रमांक
७,६०,००,०००
७७ प्रती वर्ग किमी
आंतरराष्ट्रीय कालविभाग पूर्व युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी +२)
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +२०
आंतरजाल प्रत्यय .eg
वार्षिक सकल उत्पन्न
(GDP)
३२वा क्रमांक
३३९.२ अब्ज अमेरिकन डॉलर
वार्षिक दरडोई उत्पन्न
(GDP per capita)
११२वा क्रमांक
४,०७२ अमेरिकन डॉलर

Eg-map.png
राष्ट्र नकाशा


इजिप्त (IPA: ˈiː.dʒɪpt; इजिप्शियन: केमेत (Kemet); कॉप्टिक: Ⲭⲏⲙⲓ (कीमि); अरबी: مصر‎ (मिस्र); इजिप्शियन अरबी: Máṣr (मास्र); हिब्रु: מִצְרַיִם (मित्झ्रायिम); ग्रीक: Χημία (खेमिया)); अधिकृत नाव इजिप्तचे अरब गणराज्य हे एक उत्तर आफ्रिकेतील गणराज्य आहे. या देशाचा बहुतेक भाग आफ्रिकेमध्ये असून केवळ सिनाई द्वीपकल्प हा सुवेझ कालव्याच्या पूर्वेकडील भाग आशियामध्ये आहे. यामुळे इजिप्त हा देश मध्यपूर्वेशी संबंधित मानला जातो.

इजिप्तचे क्षेत्रफळ अंदाजे १०,२०,००० वर्ग किलोमीटर आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने इजिप्त हा जगात पंधराव्या क्रमांकाचा देश आहे. इजिप्तच्या ७.७ कोटी लोकसंख्येपैकी (२००५चा अंदाज) बहुतेक लोक नाइल नदीच्या जवळ राहतात. या भागातच शेतीयोग्य जमीन आहे. इजिप्तचा इतर बराच प्रदेश हा सहारा वाळवंटाचा भाग आहे. या भागात फार कमी लोक राहतात. आजकालच्या इजिप्तमधील बहुसंख्य लोक शहरी असून ते अरब लोकसंख्याबहुल अश्या कैरोअलेक्झांड्रिया या शहरांजवळ राहतात. इजिप्त हा देश त्याच्या प्राचीन संस्कृतीकरिता प्रसिद्ध आहे. गीझा येथील पिरॅमिड, कर्णाकचे मंदिर, राजांची दरी यासारखी जगातील प्रसिद्ध आश्चर्ये इजिप्तमध्ये आहेत. आजचे इजिप्त हे अरब व मध्यपूर्व भागाचे महत्वाचे राजकीय व सांस्कृतिक केंद्र समजले जाते.

इतर भाषांमध्ये