पहिले महायुद्ध
पहिले महायुद्ध हे इ.स. १९१४ ते इ.स. १९१८ दरम्यान झालेले जागतिक युद्ध होते. हे युद्ध मुख्यतः युरोपातील दोस्त राष्ट्रे (फ्रान्स, रशियन साम्राज्य, युनायटेड किंग्डम व नंतर इटली व अमेरिकेची संयुक्त संस्थाने) व केंद्रवर्ती सत्ता (ऑस्ट्रिया-हंगेरी, प्रशिया (वर्तमान जर्मनी), बल्गेरिया, ओस्मानी साम्राज्य यांच्या दरम्यान झाले. यात दोस्त राष्ट्रांचा विजय झाला.
अनुक्रमणिका |
[संपादन] घटनानुक्रम
[संपादन] इ.स. १९१४
जून - आर्चड्युक फ्रान्झ फर्डिनान्ड याची सर्बियामध्ये हत्या झाली. हा ऑस्ट्रिया-हंगेरीचा वारसदार होता.
जुलै - ऑस्ट्रिया-हंगेरी ने याचा प्रतिकार म्हणून सर्बियावर हल्ला केला. फ्रान्स, प्रशिया व रशिया यांनी युद्धासाठी सैन्य सज्ज केले.
ऑगस्ट - प्रशियाने रशिया व फ्रान्सवर युद्धाची घोषणा केली. व बेल्जियमवर हल्ला केला. ब्रिटिश साम्राज्य यामुळे युद्धात ओढले गेले.
सप्टेंबर - मार्ने नदी येथे प्रशियाला ब्रिटिश व फ्रेंचांनी रोखले.
ऑक्टोबर - ओस्मानी साम्राज्य प्रशियाच्या बाजूने युद्धात उतरले.
[संपादन] इ.स. १९१५
एप्रिल - प्रशियाने य्प्रेस येथे प्रथमच विषारी वायूचा वापर केला. गल्लीपोल्ली द्वीपकल्पावर हल्ला करून दोस्त राष्ट्रांनी ओस्मानी साम्राज्याला युद्धाबाहेर काढण्याचा प्रयत्न केला.
मे - इटली दोस्त राष्ट्रांच्या बाजूने युद्धात उतरले.
[संपादन] इ.स. १९१६
फेब्रुवारी - प्रशियाने फ्रान्सचा वेर्डन हा किल्ला घेण्याचा प्रयत्न १० महिने युद्ध करून केला.
मे - जटलँड च्या युद्धात ब्रिटन व जर्मनीच्या नौका लढल्या.
जुलै ते नोव्हेंबर - सोमच्या युद्धात प्रथमच रणगाड्याचा वापर करण्यात आला.
[संपादन] इ.स. १९१७
एप्रिल - अमेरिका युद्धात दोस्त राष्ट्रांच्या बाजूने युद्धात उतरले.
जुलै ते नोव्हेंबर - पास्सकेन्नडायले चे युद्ध.
[संपादन] इ.स. १९१८
मार्च - प्रशिया व रशिया यांनी ब्रेस्ट-लिटोव्हस्क येथे युद्धबंदी केली. प्रशियाने पश्चिमेकडे जबरदस्त आघाडी घेतली.
जुलै - प्रशियाची घोडदौड थांबली.
ऑगस्ट - अमेरिकेच्या मदतीने दोस्त राष्ट्रे जर्मनीच्या सीमेपार गेली.
ऑक्टोबर - इटलीने ऑस्ट्रिया-हंगेरीला हरवले. ऑस्ट्रिया-हंगेरी व ओस्मानी साम्राज्याने शांततेची मागणी केली.
नोव्हेंबर - प्रशिया व दोस्त राष्ट्रे यांनी युद्धबंदी केली.
[संपादन] इ.स. १९१९
[संपादन] युद्धमान पक्ष
[संपादन] दोस्त राष्ट्रे
कंसात राष्ट्रे युद्धात सहभागी झाली तो दिवस
- बेल्जियम (४ ऑगस्ट १९१४)
- ब्राझिल (२६ ऑक्टोबर १९१७)
- ब्रिटिश साम्राज्य (४ ऑगस्ट १९१४)
- चीन (१४ ऑगस्ट १९१४)
- कोस्टा रिका (२३ मे १९१८)
- क्युबा (७ एप्रिल १९१७)
- फ्रान्स (३ ऑगस्ट १९१४)
- ग्रीस (२ जुलै १९१७)
- ग्वातेमाला (२३ एप्रिल १९१८)
- हैती (१२ जुलै १९१८)
- होंडुरास (१९ जुलै १९१८)
- इटली (२३ मे १९१५)
- जपान (२३ ऑगस्ट १९१४)
- लायबेरिया (४ ऑगस्ट १९१७)
- मोंटेनेग्रो (५ ऑगस्ट १९१४)
- निकाराग्वा (८ मे १९१८)
- पनामा (७ एप्रिल १९१७)
- पोर्तुगल (९ मार्च १९१६)
- रोमानिया (२७ ऑगस्ट १९१६)
- रशिया (१ ऑगस्ट १९१४)
- सान मारिनो (३ जून १९१५)
- सर्बिया (२८ जुलै १९१४)
- सयाम (थायलंड) (२२ जुलै १९१७)
- अमेरिकेची संयुक्त संस्थाने (६ एप्रिल १९१७)
[संपादन] केंद्रवर्ती सत्ता
- ऑस्ट्रिया-हंगेरी (२८ जुलै १९१४)
- बल्गेरीया (१४ ऑक्टोबर १९१५)
- प्रशिया (१ ऑगस्ट १९१४)
- ओस्मानी साम्राज्य (३१ ऑक्टोबर १९१४)
[संपादन] पार्श्वभूमी
२८ जून, इ.स. १९१४ रोजी ऑस्ट्रियाच्या राजपदाचा वारस फ्रांत्स फेर्डिनांन्ड याची सर्बियात हत्या झाली. या खुनाच्या कारस्थानासाठी सर्बियास जबाबदार ठरवण्यात आले व ऑस्ट्रिया-हंगेरीने सर्बियावर आक्रमण केले. तेव्हा रशियन साम्राज्य सर्बियाच्या मदतीस धावून आले. प्रशियाने ऑस्ट्रियाचा पक्ष घेतला आणि बेल्जियम व फ्रान्सवर हल्ला केला. यामुळे ब्रिटिश साम्राज्याने प्रशियाविरुद्ध युद्ध पुकारले.
[संपादन] युरोपाच्या पश्चिम आघाडीवरील युद्ध
प्रशियाला बेल्जियम जिंकून फ्रान्समध्ये घुसायचे होते व त्यानंतर पॅरिस जिंकून फ्रान्सचा पाडाव करायचा होता. पण मार्ने नदीच्या युद्धात फ्रान्सने प्रशियाला रोखले.
[संपादन] सोमची लढाई
१ जुलै, इ.स. १९१६ रोजी दोस्त राष्ट्रांनी सोम येथे प्रशियाशी लढून प्रशियन सीमा ओलांडण्याचा प्रयत्न केला. चार महिन्यांच्या युद्धानंतर दोस्तांचे सैन्य केवळ ८ किलोमीटर खोल पोचू शकले. या लढाईत १० लाख बळी पडले.
[संपादन] पासंडालेची लढाई
जुलै इ.स. १९१७मध्ये दोस्त राष्ट्रांनी पासंडाले, बेल्जियम येथे प्रशियाशी लढून प्रशियन सीमा ओलांडण्याचा पुन्हा यत्न केला. या खेपेस ३ लाख सैनिक मृत्युमुखी पडले. परंतु या लढाईतून दोस्तांच्या पदरी फारसे काहीही पडले नाही.
[संपादन] वेर्डनची लढाई
वेर्डनची लढाई ही पहिल्या महायुद्धातील एक मोठी लढाई होती. प्रशिया व फ्रान्सच्या सैन्यांमध्ये ही लढाई झाली. २१ फेब्रुवारी ते १८ डिसेंबर १९१६ या कालावधीत ही लढाई झाली. वेर्डन शहराच्या उत्तरेला टेकड्यामध्ये ही लढाई झाली.
[संपादन] विमी ब्रिजची लढाई
विमी ब्रिजची लढाई फ्रान्सच्या नोर-पा-द-कॅले या प्रदेशात लढली गेली. ब्रिटन व प्रशियामध्ये ही लढाई झाली. ९ ते १२ एप्रिल १९१७ या कालावधीत ही लढाई झाली.
[संपादन] लष्करभरती
युद्ध सुरू झाले तेव्हा नेहमीच्या सैनिकांना युद्धावर पाठवण्यात आले. पण सैनिकांचा मृत्युदर वाढल्यावर सक्तीची लष्करभरती करण्यात आली.
| देश | सैनिकांची संख्या |
|---|---|
| १,२०,००,००० | |
| १,१०,००,००० | |
| ८९,०४,४६७ | |
| ८४,१०,००० | |
| साचा:देश माहिती ऑस्ट्रिया-हंगेरी | ७८,००,००० |
| ४३,५५,००० |
[संपादन] युरोपाच्या पूर्व आघाडीवरील युद्ध
युरोपाच्या पूर्व आघाडीवरील युद्ध मुख्यतः प्रशिया, ऑस्ट्रिया-हंगेरी व रशिया या देशांमध्ये झाले. हे युद्ध पश्चिम आघाडीकडील युद्धापेक्षा भयानक होते. येथील युद्ध मुख्यतः उघड्या मैदानात खेळले गेले. इ.स. १९१४ साली ओस्मानी साम्राज्याने रशियावर हल्ला केल्यानंतर युद्ध आशिया खंडापर्यंत पोहोचले. ओस्मानी साम्राज्याने सीरिया व पॅलेस्टाईनवर हल्ला चढवण्याची धमकी दिली, तेव्हा ब्रिटिश साम्राज्याने इजिप्तमधील आपले सैन्य सीरिया व पॅलेस्टाईन भूप्रदेशांत उतरवले.
[संपादन] टानेन्नबर्गची लढाई
मुख्य लेख:टानेन्नबर्गची लढाई
युद्धाच्या सुरुवातीला प्रशिया व रशियन साम्राज्य यांमध्ये ही लढाई झाली. २६ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट १९१४ यांदरम्यान ही लढाई झाली. यात रशियाचे ४,१६,००० सैन्य मृत्युमुखी पडले व प्रशियाचा विजय झाला.
[संपादन] मासुरीयन तलावाची लढाई
मुख्य लेख:मासुरीयन तलावाची पहिली लढाई, मासुरीयन तलावाची दुसरी लढाई
- मासुरीयन तलावाची पहिली लढाई
प्रशियाने ही लढाई सुरू केली होती. यामुळे रशियाचे सैन्य माघार घेऊ लागले.
- मासुरीयन तलावाची दुसरी लढाई
केंद्रवर्ती सत्तांनी ही लढाई सुरू केली होती. यामुळे रशिया युद्धाबाहेर गेली.
[संपादन] रशियन क्रांती
मुख्य लेख:रशियन क्रांती (१९०७)
१९१६ साली ब्रुसिलोव्हमध्ये विजय मिळवूनही रशियात सरकार विरोधी असंतोष वाढत होता. झारची राजवट नावापुरती होती. खरी सत्ता महाराणी अलेक्झांड्रा हिच्या व ग्रिगोरी रास्पुतिन याच्या हातात होती. असंतोष वाढत गेल्यावर ग्रिगोरी रास्पुतिन याचा १९१६ च्या अखेरीस खून करण्यात आला.
मार्च १९१७ साली, पेट्रोग्राडमध्ये झारविरुद्ध निदर्शने करण्यात आली. यामुळे झारने सिंहासनाचा त्याग केला व एक कमकुवत हंगामी सरकार स्थापण्यात आले. या गोंधळात आघाडीवरचे लष्कर निकामी ठरले.
हंगामी सरकारबद्दलचा असंतोष वाढत असतानाच व्लादिमिर इलिच लेनिनच्या बोलशेव्हिक पक्षाची ताकद व लोकप्रियता वाढत होती. लेनिनने सरकारला युद्ध थांबवण्याची मागणी केली. बोल्शेव्हिकांनी केलेला सशस्त्र उठाव यशस्वी ठरला. लेनिनने लगेच प्रशियाला युद्ध थांबवण्याची मागणी केली. ही मागणी प्रशियाला पटली नाही. नंतर ब्रेस्ट-लिटोव्हस्क चा तह झाला. यानुसार फिनलँड, बाल्टिक देश, पोलंड व युक्रेन केंद्रवर्ती सत्तांना देण्यात आले.
[संपादन] आफ्रिकेतील युद्ध
आफ्रिका खंडात प्रशिया, फ्रान्स व युनायटेड किंग्डम इत्यादी युरोपीय देशांच्या वसाहती होत्या. पहिल्या महायुद्धात या वसाहतींमध्ये लढाया होत असत. ७ ऑगस्ट, इ.स. १९१४ रोजी फ्रान्स व ब्रिटनने प्रशियाच्या आधिपत्याखालील टोगोलँड जिंकून घेतले. १० ऑगस्ट, इ.स. १९१४ रोजी जर्मन नैर्ऋत्य आफ्रिकेतील प्रशियाचे सैन्य दक्षिण आफ्रिकेत शिरले.
[संपादन] आशिया व प्रशांत महासागर क्षेत्रातील युद्ध
न्यू झीलंडने जर्मन सामोआ (वर्तमान सामोआ) ३० ऑगस्ट, इ.स. १९१४ रोजी जिंकून घेतले. ११ सप्टेंबर, इ.स. १९१४ रोजी ऑस्ट्रेलियाने जर्मन न्यू गिनीच्या न्यू ब्रिटन बेटावर हल्ला केला.
[संपादन] दक्षिणेकडील युद्ध
[संपादन] बाल्कन युद्ध
रशियाविरुद्ध लढत असल्यामुळे ऑस्ट्रीया-हंगेरीने स्वतःचे एक तृतीयांश सैन्य सर्बियात घुसवले व सर्बियाची राजधानी बेलग्रेड जिंकुन घेतली. कोलुबाराच्या लढाईत सर्बियाने यशस्वीपणे ऑस्ट्रीया-हंगेरीला हरवले. यामुळे १९१४ च्या शेवटी ऑस्ट्रीया-हंगेरीचे सैन्य सर्बियातून परतले.
[संपादन] नवीन डावपेच
पहिल्या महायुद्धाआधीचे सैनिकी डावपेच व युद्धतंत्रे पहिल्या महायुद्धात निष्फळ ठरली. यामुळे नवीन डावपेच शोधणे आवश्यक ठरले. कुंपणासाठीच्या काटेरी तारा, आधुनिक तोफखाना, मशीन गन यांमुळे खुल्या मैदानात लढणे कठीण झाले. प्रशियाने प्रथमच विषारी वायू वापरला, व या घटनेनंतर सर्वच राष्ट्रांची सैन्ये विषारी वायूंचा वापर करू लागली.
युद्धकाळात नवीन शस्त्रे व युद्धसाहित्य शोधण्याकडे दोन्ही बाजूंचा कल होता. रणगाडे हे यांतील ठळक उदाहरण होय. ब्रिटन व फ्रान्स या राष्ट्रांनी प्रथमच रणगाडे वापरले. प्रशियाने दोस्त सैन्यांकडून जप्त केलेले रणगाडे व स्वतःचे काही रणगाडे, यांचा वापर युद्धात केला.
मार्ने नदीच्या पहिल्या लढाईनंतर दोस्त राष्ट्रांच्या व केंद्रवर्ती सत्तांच्या सैन्यांनी मोठ्या प्रमाणावर युद्धाभ्यास सुरू केला.
[संपादन] नवीन शस्त्रे
[संपादन] रणगाडा
ब्रिटिशांनी या युद्धात रणगाड्याचा शोध लावला. रणगाड्याचा शोध खंदकापलिकडे जाण्यासाठी लावला गेला. रणगाड्यात बसलेले सैन्य मशीन गनने शत्रुवर हल्ला करत असे व शत्रूसैन्यापलिकडे जात असे.
[संपादन] विमान
विमानाचा युद्धात वापर पहिल्या महायुद्धात करण्यात आला. तत्कालिन विमानांमध्ये एक वैमानिक व एक बंदुकधारी सैनिक बसु शके. बंदुकधाऱ्याचे काम शत्रुवर मशीन गनने गोळीबार करणे व बॉम्बगोळ्याचा भडिमार करणे हे होते.
[संपादन] मशीन गन
मशीन गनमुळे पहिले महायुद्ध इतर युद्धांपेक्षा प्राणघातक ठरले. या बंदुकीमुळे सतत गोळ्या झाडणे शक्य होते.
[संपादन] आरमारी युद्ध
युद्धाच्या सुरुवातीच्या काळात प्रशियाने जगभरातील समुद्रांत क्रुझर नौका तैनात केल्या होत्या. यांतील काही क्रुझर नौका दोस्त राष्ट्रांच्या व्यापारी जहाजांना उपद्रव देऊ लागल्या. यामुळे ब्रिटनच्या रॉयल नेव्हीने पद्धतशीरपणे क्रुझर नौकांचे पारिपत्य केले.
युद्ध सुरू झाल्यानंतर ब्रिटनने प्रशियाची नाविक नाकेबंदी केली. हे तंत्र भलतेच परिणामकारक ठरले, यामुळे प्रशियाची सैनिकी नाकेबंदी झाली. आंतरराष्ट्रीय नियमांनुसार हे डावपेच चुकीचे होते. ब्रिटनने समुद्रात पाणसुरुंग पेरून ठेवले पण त्यामुळे शत्रुनौकांसह तटस्थांच्या नौकांसही हानी पोचे.
इ.स. १९१६ साली झालेली जुटलँडची लढाई पहिल्या युद्धातील सर्वांत मोठी लढाई होती. ही लढाई ३१ मे, इ.स. १९१६ ते १ जून, इ.स. १९१६ या कालखंडात उत्तर समुद्रात लढली गेली.
[संपादन] युद्धाचे परिणाम
[संपादन] आरोग्य व आर्थिक परिणाम
इतर कोणत्याही युद्धाचे परिणाम या युद्धाएवढे मोठे नव्हते. या युद्धामुळे प्रशियन साम्राज्य ऑस्ट्रिया-हंगेरीयन साम्राज्य ओस्मानी साम्राज्य व रशियन साम्राज्य ही साम्राज्ये नामशेष झाली. बेल्जियम व सर्बिया ही राष्ट्रांना भरपूर हानी पोहोचली होती. फ्रान्सचे १४ लाख सैनिक या युद्धात मृत्युमुखी पडले, रशिया व प्रशियाचे जवळपास एवढेच सैन्य मरण पावले.
१९१४ ते १९१८ या काळात ८० लाख सैनिक युद्धात मृत्यू पावले, ७० लाख कायमचे जायबंदी झाले, तर १.५ कोटी सैनिक जखमी झाले. प्रशियातील १५.१%, ऑस्ट्रिया-हंगेरीतील १७.१% व फ्रान्समधील १०.५% पुरुष मृत्युमुखी पडले. ७,५०,००० प्रशियन नागरिक ब्रिटनने केलेल्या नाकाबंदीत उपासमारीने मेले. युद्धसमाप्तीच्या काळात १ लाख नागरिक लेबेनानमध्ये दुष्काळामुळे मृत्युमुखी पडले होते.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |