नेपाळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नेपाळ
संघीय लोकतान्त्रिक गणतन्त्र नेपाल
Federal Democratic Republic of Nepal
नेपाळचे राजसत्ताक
नेपाळचा ध्वज नेपाळचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी।
('आई आणि मातृभूमि स्वर्गाहूनही श्रेष्ठ असते.')
राष्ट्रगीत: राष्ट्रीय गान
नेपाळचे स्थान
नेपाळचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
काठमांडू
अधिकृत भाषा नेपाळी
इतर प्रमुख भाषा -
सरकार
 - राष्ट्रप्रमुख डा॰ रामवरण यादव
 - सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश -
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस (एकत्रीकरण)
डिसेंबर २१, १७६८ 
क्षेत्रफळ
 - एकूण १,४७,१८१ किमी (९४वा क्रमांक)
 - पाणी (%) २.८
लोकसंख्या
 -एकूण २,७१,३३,००० (४२वा क्रमांक)
 - घनता १९६/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ४२.१७ अब्ज अमेरिकन डॉलर (८१वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न १,६७५ अमेरिकन डॉलर (१५२वा क्रमांक)
राष्ट्रीय चलन नेपाळी रुपया (NPR)
आंतरराष्ट्रीय कालविभाग नेपाळी प्रमाणवेळ (NPT) (यूटीसी +५:४५)
आंतरजाल प्रत्यय .np
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ++९७७
राष्ट्र_नकाशा


नेपाळ हा एक दक्षिण आशियाई देश आहे. नेपाळ हे जगातील तीन हिंदू राष्ट्रांपैकी एक आहे. नेपाळ हे हिमालय पर्वतराजीमध्ये वसलेला चारी बाजुंनी भूवेष्टित प्रदेश आहे. उत्तरेला चीन सीमा असून, इतर सर्व बाजूंना भारत देश आहे. नेपाळ क्षेत्रफळाच्या दृष्टिने जगात ९३ वा क्रमांक असून लोकसंख्येच्या दृष्टिने ४१ वा क्रमांक आहे.काठमांडू नेपाळची राजधानी असून देशातील सर्वात मोठे शहर आहे. काठमांडू भागात सुमारे ५० लाखांची वस्ती आहे. नेपाळ भौगोलिकदृष्ट्या संपन्न प्रदेश आहे. उत्तरेला हिमालय पर्वतरांगा असून जगातील सर्वोच्च दहा पर्वतशिखरांमधील आठ नेपाळमध्ये आहेत. जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट, (नेपाळी : सागरमाथा) नेपाळमध्ये आहे. समुद्रसपाटीपासून २०००० फूट (६०९६ मीटर) उंचीवरील सुमारे २४० पर्वतशिखरे आहेत. दक्षिण नेपाळमध्ये जमीन शेतीसाठी अतिशय सम्रुद्ध असल्याने दाट लोकवस्तीचा शहरी भाग अधिक आहे.

सुमारे ८०% लोक हिंदू असून टक्केवारीच्या दृष्टिने सर्वाधिक हिंदू लोकसंख्येचा देश आहे. बौद्ध धर्म जरी अल्पसंख्य असला तरी नेपाळशी त्याचे दृढ आणि अतूट नाते आहे. नेपाळमध्ये बहुतांश वेळा राजेशाही होती. १७६८ पासून शाह घराण्याची राजवट होती. राजा पृथ्वी नारायण शाह यांच्या राजवटीमध्ये अनेक छोट्या स्वतंत्र राज्यांना एकसंध नेपाळमध्ये समाविष्ट केले गेले. कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ (माओवादी) च्या नेत्तृत्वाखाली सुमारे दहा वर्ष चाललेल्या लोकचळवळीचा आणि नेपाळमधील प्रमुख राजकिय पक्षांनी सतत काही आठवडे केलेल्या संपानंतर अखेर २२ नोव्हेंबर, २००५ रोजी एक १२ कलमी मसुदा तयार करण्यात आला. २८ मे, २००८ रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये जनतेने मोठ्या प्रमाणात राजे ज्ञानेंद्र यांच्या विरोधात मतदान करून संघीय लोकतांत्रिक नेपाळची स्थापना केली. २३ जुलै, २००८ रोजी राम बरन यादव यांनी नेपाळचे पहिले राष्ट्र्पती म्हणून शपथ घेतली.

अनुक्रमणिका

[संपादन] इतिहास

[संपादन] नावाची व्युत्पत्ती

[संपादन] प्रागैतिहासिक कालखंड

[संपादन] अर्वाचीन कालखंड

[संपादन] २००६ची लोकक्रांती

[संपादन] भूगोल

[संपादन] चतु:सीमा

[संपादन] राजकीय विभाग

१४ अंचल विभाजित आहे-

  • मेची अंचल
  • कोशी अंचल
  • सगरमाथा अंचल
  • जनकपुर अंचल
  • बागमती अंचल
  • नारायणी अंचल
  • गंडकी अंचल
  • लुंबिनी अंचल
  • धवलागिरी अंचल
  • राप्ती अंचल
  • कर्णाली अंचल
  • भेरी अंचल
  • सेती अंचल
  • महाकाली अंचल

[संपादन] मोठी शहरे

  • काठमांडू
  • पोखरा
  • ललितपुर
  • भक्तपुर
  • बिराटनगर
  • वीरगंज
  • नेपालगंज
  • जनकपुर
  • धरान
  • बुटवल

[संपादन] समाजव्यवस्था

[संपादन] वस्तीविभागणी

[संपादन] धर्म

नेपाळ एक धर्म निरपेक्ष हिंदू धर्मावलंबी बाहुल देश आहे।

[संपादन] शिक्षण

[संपादन] संस्कृती

[संपादन] राजकारण

[संपादन] अर्थतंत्र


वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये