आल्बेनिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आल्बेनिया
Republika e Shqipërisë
रेपुब्लिका ए श्किपेरिया
आल्बेनियाचा ध्वज आल्बेनियाचे चिन्ह
ध्वज चिन्ह
आल्बेनियाचे स्थान
आल्बेनियाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
तिराना
अधिकृत भाषा आल्बेनियन
सरकार
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस नोव्हेंबर २८, इ.स. १९१२ (ऑटोमन साम्राज्यापासून
क्षेत्रफळ
 - एकूण २८,७४८ किमी (१३९वा क्रमांक)
 - पाणी (%) ४.७
लोकसंख्या
 -एकूण ३६,००,५२३ (२००८ चा अंदाज) (१३०वा क्रमांक)
 - घनता १३४/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण २१.१६० अब्ज अमेरिकन डॉलर (११२वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ६,६४९ अमेरिकन डॉलर (१००वा क्रमांक)
आंतरराष्ट्रीय कालविभाग मध्य युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी +१)
आंतरजाल प्रत्यय .al
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ++३५५
राष्ट्र_नकाशा


आल्बेनिया (अधिकृत नाव: आल्बेनियन: Republika e Shqipërisë, मराठी: आल्बेनियाचे प्रजासत्ताक) हा आग्नेय युरोपातील देश आहे. याच्या आग्नेयेस ग्रीस, उत्तरेस माँटेनिग्रो, ईशान्येस कोसोवो तर पूर्वेस मॅसिडोनिया आहे. या भूसीमांशिवाय याच्या सीमा पश्चिमेला एड्रियाटिक समुद्रास व नैऋत्येस आयोनियन समुद्रास भिडल्या आहेत.

आल्बेनियामध्ये संसदीय लोकशाही व्यवस्था आहे. याची राजधानी तिराना येथे असून, देशाच्या ३६,००,००० लोकसंख्येपैकी ६,००,००० लोकसंख्या तिराना शहरात राहते. साम्यवादी कालखंडानंतर आल्बेनियाने खुले आर्थिक धोरण स्वीकारल्यापासून दूरसंचार, वाहतूक, पायाभूत सुविधा इत्यादी क्षेत्रांसह एकंदरीत अर्थव्यवस्था लक्षणीय प्रगती करीत आहे.