इंडोनेशिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इंडोनेशिया
इंडोनेशियाचे प्रजासत्ताक
जागतिक नकाशावरील स्थान
ब्रीदवाक्य भिन्नेका तुंगल इका ('विविधतेत एकता')
राजधानी जकार्ता
सर्वात मोठे शहर जकार्ता
राष्ट्रप्रमुख सुसीलो बांबांग युधोयोनो
पंतप्रधान जुसुफ काल्ला
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश -
राष्ट्रगीत इंडोनेशिया राया ('महान इंडोनेशिया')
राष्ट्रगान -
स्वातंत्र्यदिवस (नेदरलँड्सपासून)
ऑगस्ट १७, १९४५ (घोषित)
डिसेंबर २७, १९४९ (मान्यता)
राष्ट्रीय भाषा बहासा इंडोनेशिया
इतर प्रमुख भाषा -
राष्ट्रीय चलन इंडोनेशियन रुपिया (IDR)
राष्ट्रीय प्राणी -
राष्ट्रीय पक्षी -
राष्ट्रीय फूल -
क्षेत्रफळ
एकूण–
पाणी–
१६वा क्रमांक

१९,०४,५६९ किमी²

४.८५ %
लोकसंख्या
एकूण–
घनता–
४वा क्रमांक
२२,२७,८१,०००
११७ प्रती किमी²
आंतरराष्ट्रीय कालविभाग - (यूटीसी +७ ते +९)
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +६२
आंतरजाल प्रत्यय .id
वार्षिक सकल उत्पन्न
(GDP)
१५वा क्रमांक
९७७.४ अब्ज अमेरिकन डॉलर
किंवा
इंडोनेशियन रुपिया (IDR)
वार्षिक दरडोई उत्पन्न
(GDP per capita)
११०वा क्रमांक
४,४५८ अमेरिकन डॉलर
किंवा
इंडोनेशियन रुपिया (IDR)


इंडोनेशिया (अधिकृत नाव: बहासा इंडोनेशिया: Republik Indonesia; मराठी: इंडोनेशियाचे प्रजासत्ताक) आग्नेय आशियातील एक देश आहे. याची लोक संख्या दोन कोटी चौतीस लाख आहे. हा देश साडेतीनशे वर्षे डच अधिपत्या खाली होता. मात्र दुसर्‍या महायुद्धानंतर इंडोनेशिया स्वतंत्र झाला. जकार्ता ही देशाची राजधानी आहे. येथील मुख्य भाषा बहासा इंडोनेशिया आहे. हिच्याखेरीज बासा जावा, बासा बाली, बासा सुंडा, बासा मादुरा इत्यादी अनेक भाषा येथे आहेत. येथे बासा कावी नावाची एक प्राचीन भाषा आहे. येथील प्रमुख साहित्यिक ग्रंथ याच भाषेत आहेत. कावि भाषेतील भिन्नेक तुंग्गल इक - विभिन्नतेत एकता - हे या देशाचे घोषवाक्य आहे. यातील जावा हे बेट सर्वात मोठे असून त्या बेटावरील लोकांचे देशावर प्रभुत्व आहे. इंडोनेशियामध्ये जगातली एक सर्वात मोठी जैविक विवीधता आहे.

अनुक्रमणिका

[संपादन] इतिहास

जीवाश्म अवशेषांवरून काढलेल्या निष्कर्षानुसार पहिला आदिमानव येथे पाच लाख वर्षांपुर्वीचा सापडतो. याला जावा पुरुष (इंग्रजी: java Man)म्हणून ओळखले जाते. असे मानणारा एक प्रवाह आहे की, सुमारे २००० वर्षापूर्वी येथे पूर्वेकडील देशांमधून म्हणजे तैवानमधून लोक आले व त्यांनी या भागाला आपल्या ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांनी भातशेती व इतर कला कौशल्य मिळवले. भारतचीन या दोन्ही देशांशी असलेल्या व्यापाराने या देशाची संस्कृतीला आकार दिला. सातव्या शतकात श्रीविजय या नाविक प्रबळ असलेल्या राजाने हिंदू तसेच बौद्ध धर्म यांना स्थान दिले. त्यानंतर शैलेंद्रमातारम यांनी अनुक्रमे बोरोबदूरप्रंबनन ही धार्मिक शहरे वसवली. मजापहीत हे हिंदू राजघराणे तेराव्या शतकात जावा बेटावर सत्तेत आले. हा काळ इंडोनेशियाच्या इतिहासातले सुवर्णयुग म्हणून ओळखला जातो. मात्र त्या नंतर मुसलमान व्यापारी व्यापाराच्या उद्देशाने येथे आले हळू हळू जम बसवत त्यांनी सुमात्रा बेटावर ठाणे वसवले. येथून इंडोनेशियाच्या मुसलमानीकरणाला सुरवात झाली. सोळाव्या शतका पर्यंत बहुतेक भाग मुसलमान झाले होते. इ.स. १५२१ मध्ये येथे पहिल्यांदा युरोप खंडातून पोर्तुगीज लोक आले. त्यांना येथील मसाल्याचे पदार्थ हवे होते. त्यानंतर ब्रिटिशडच आले. डच लोकांनी डच ईस्ट इंडिया कंपनी स्थापन करून येथे अंमल बसवला. इ.स. १८०० मध्ये त्यांनी इंडोनेशियाला आपली वसाहत म्हणून घोषित केले. दुसर्‍या महायुद्धात जपानी आक्रमण पाहिल्या नंतर स्वातंत्र्याच्या भावनेने येथे मूळ धरले. जपानच्या शरणागती नंतर इ.स. १९४५ मध्ये सुकार्नो यांनी अध्यक्ष म्हणून सूत्रे हाती घेतली. पण नेदरलँड्सने आपला अंमल बसवण्याची धडपड सोडली नाही. शेवटी डिसेंबर इ.स. १९४९ मध्य इंडोनेशियाने स्वातंत्र्य मिळवले.

[संपादन] नावाची व्युत्पत्ती

इंडिया व एशिया यांचा संगम येथे होतो म्हणून इंडोनेशिया. यास पुर्वी इंडोचायना असेही म्हणत.

[संपादन] प्राचीन राजे, वंश व साम्राज्य कालखंड

[संपादन] भूगोल

हा हिंदी महासागरातील १७५०८ बेटांचा समुह आहे.

[संपादन] चतु:सीमा

या देशाचे इस्ट तिमोर, मलेशियापापुआ न्युगिनी हे शेजारी देश आहेत. तसेच भारत(अंदमान निकोबार बेटे), फिलिपाइंस, ऑस्ट्रेलियासिंगापूर हे ही शेजारी देश आहेत.

[संपादन] राजकीय विभाग

[संपादन] मोठी शहरे

[संपादन] समाजव्यवस्था

[संपादन] वस्तीविभागणी

बहुसंख्य बेटे मुसलमान, बाली बेट हिंदु

[संपादन] धर्म

मुसलमान, हिंदु

[संपादन] शिक्षण

उच्च शिक्षणाची व्यवस्था आहे पण तरीही अनेक धनवान विद्यार्थी अमेरिकाऑस्ट्रेलिया येथे उच्च शिक्षणासाठी जातात.

[संपादन] संस्कृती

भारतीयचिनी संस्कृतीचा मिलाफ येथे दिसून येतो. या देशाचा भारताशी पुरातन संबंध आहे. भारतातल्या पुराणांमध्ये याचा उल्लेख दीपांतर भारत म्हणजेच समुद्रापारचा भारत असा आढळतो. दीपांतर हे नाव इंडोनेशिया मध्ये अजूनही प्रचलित आहे. सुमारे पाचशे वर्षांपूर्वी हा देश एक हिंदू देश होता. परंतु नंतर त्यातले बहुसंख्य लोकांना धर्मांतराने मुसलमान करण्यात आले व हा देश मुसलमान गणला जायला लागला. आजही इंडोनेशियाच्या बाली नावाच्या बेटावर सुमारे ९०% लोक हिंदू आहेत. हिंदू धर्माला येथे आगम हिंदू धर्म या नावाने ओळखतात. येथे अनेक प्राचीन मंदिरे आहेत, बहुतेक मंदिरे चंडी देवीच्या उपासनेसाठी स्थापन करण्यात आली होती. त्यामुळे या मंदिरांनादेखील चंडी नावाने ओळखले जाते.

[संपादन] राजकारण

फुटीरतावादी शक्ती येथे कार्यरत आहेत. आचे बंडा हा मुस्लीम भाग स्वतंत्र होण्यासाठी मागणी करतो आहे. तिमोर प्रांत फुटून इस्ट तिमोर हा ख्रिश्चन बहुल भाग फुटून वेगळा निघाला आहे.

[संपादन] अर्थतंत्र

इ.स. १९९८ मधील आर्थीक धक्क्यातून हा देश सावरण्याचा प्रयत्न करतो आहे. या मंदी मध्ये जागतिक बँक यांचा सल्ला घेणे अडचणीचे ठरले होते. मात्र त्सुनामीलाटाभुकंपप्रवण क्षेत्र असल्याने अर्थव्यवस्थेवर नैसर्गिक आपत्तींचा ताण आहे.


वैयक्‍तिक साधने
इतर भाषांमध्ये