Jump to content

ग्रीन पार्क

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ग्रीन पार्क स्टेडियम
मैदान माहिती
स्थान कानपूर, भारत
गुणक 26°28′55″N 80°20′52″E / 26.48194°N 80.34778°E / 26.48194; 80.34778गुणक: 26°28′55″N 80°20′52″E / 26.48194°N 80.34778°E / 26.48194; 80.34778
स्थापना १९४५
आसनक्षमता ३३,०००[१]
मालक उत्तर प्रदेश सरकार
प्रचालक उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशन

आंतरराष्ट्रीय माहिती
प्रथम क.सा. १२-१४ जानेवारी १९५२:
भारत  वि. इंग्लंड
अंतिम क.सा. २२-२६ सप्टेंबर २०१६:
भारत  वि. न्यूझीलंड
प्रथम ए.सा. २४ डिसेंबर १९८६:
भारत वि. श्रीलंका
अंतिम ए.सा. ११ ऑक्टोबर २०१५:
भारत वि. दक्षिण आफ्रिका
एकमेव २०-२० २६ जानेवारी २०१७:
भारत वि. इंग्लंड
यजमान संघ माहिती
उत्तर प्रदेश क्रिकट असोसिएशन (२००९-सद्य)
शेवटचा बदल ३ नोव्हेंबर २०१६
स्रोत: क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर)

उत्तर प्रदेश क्रिकेट संघाचे होम ग्राउंड असलेले आणि प्रकाशझोताची सुविधा असलेले भारतातील कानपूर शहरामध्ये वसलेल्या ग्रीन पार्क स्टेडियम ह्या बहुउपयोगी मैदानाची आसनक्षमता ३३,००० इतकी आहे. [२] सदर मैदान उत्तर प्रदेश क्रीडा विभागाच्या नियंत्रणात आहे. उत्तर प्रदेशतील ह्या एकमेव आंतरराष्ट्रीय मैदानावर अनेक आंतरराष्ट्रीय कसोटी आणि एकदिवसीय सामने खेळवले गेले आहेत. त्याशिवाय विवो आयपीएलचे २ सामने १९ आणि २१ मे २०१६ रोजी येथे खेळवले गेले होते. जगातील सर्वात मोठा हाताने बदलावा लागणारा धावफलक ह्या मैदानावर आहे. गंगा नदी जवळ वसलेले हे मैदान भारतातील दुसरे सर्वात मोठे मैदान आहे. मैदानाचे नाव हे येथे घोडदौडीला येणारी ब्रिटिश महिला मॅडम ग्रीनच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. ह्या मैदानाचे टोपण नाव 'बिलियर्ड्स टेबल' असे आहे. मैदाना समोर असलेल्या मॅकरॉबर्ट हॉस्पिटलमध्ये जन्मलेला दिवंगत क्रिकेट खेळाडू आणि प्रशिक्षक बॉब वूल्मरच्या आठवणीत सदर मैदानाला वूल्मर्स टर्फ असेही संबोधले जाते.

इतिहास

[संपादन]
ग्रीन पार्क मैदान, कानपूर येथे फलंदाजीसाठी उतरताना महेंद्र शुक्ला

१९४० च्या दशकात घोडदौडीचा सराव करणाऱ्या मॅडम ग्रीनच्या नावावरून ह्या मैदानाचे नाव ग्रीन पार्क असे पडले. मैदानाच्या मागून वाहणाऱ्या गंगा नदीच्या किनाऱ्याजवळ कानपूर शहराच्या इशान्येकडील सिव्हिल लाईन्स येथे हे मैदान वसलेले आहे. भारतातील हे एकमेव मैदान आहे जेथे विद्यार्थ्यांसाठी एक गॅलरी उपलब्ध आहे. ग्रीन पार्क वर जगातील सर्वात मोठा हाताने बदलावा लागणारा धावफलक आहे. [३] त्याशिवाय मैदानामध्ये आंतरराष्ट्रीय सामन्यांदरम्यान वापरल्या जाणाऱ्या दोन व्हिडियो स्क्रीन सुद्धा आहेत.

भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला कसोटी विजय डिसेंबर १९५९ मध्ये येथे नोंदवला होता. टर्फवर खेळवला गेलेला हा पहिलाच सामना होता [४] ऑफ-स्पिनर जसु पटेल ह्यांची १४ बळींची कामगिरी भारताला विजय मिळवून देण्यात मोलाची ठरली.

१९५८/५९ मध्ये सुभाष गुप्तेने वेस्ट इंडीजचे १०२ धावांमध्ये ९ गडी बाद केले, यष्टिरक्षक नरेन ताम्हाणेने झेल सोडल्यामुळे तो केवळ लान्स गिब्सला बाद करु शकला नाही.

१९५७ नंतर ह्या मैदानावर भारताने आजवर फक्त दोन कसोटी सामने गमावले आहेत ते वेस्ट इंडीज विरुद्ध. १९५८ मधील सुभाष गुप्तेची स्वप्नवत कामगिरी वेस हॉलच्या १० बळींमुळे झाकोळून गेली आणि भारताच्या १९८३ च्या विश्वचषक विजयाचा आनंद माल्कम मार्शलच्या भीतीदायक गोलंदाजीने हिरावून घेतला. ह्या मैदानावर सर्वात जास्त कसोटी धावा करण्याचा विक्रम गुंडप्पा विश्वनाथच्या (७७६ धावा) नावावर आहे. ज्यामागोमाग सुनील गावस्कर (६२९ धावा) आणि मोहम्मद अझरुद्दीन (५४३ धावा) ह्यांचा क्रमांक लागतो. कसोटी क्रिकेटमध्य कपिल देवने मैदानावर सर्वात जास्त २१ गडी बाद केले आहेत आणि त्यामागोमाग हरभजनसिंगने २० गड्यांना तंबूत धाडले आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरने ह्या मैदानावर सर्वाधिक ३४२ धावा केल्या आहेत, त्यान तर विनोद कांबळीने २१७ तर सौरभ गांगुलीने २०८ धावा फटकावल्या आहेत. सर्वात जास्त ९ एकदिवसीय बळी जवागल श्रीनाथ आणि त्यानंतर अजित आगरकरच्या (८ बळी) नावावर आहेत.

सुविधा

[संपादन]
ग्रीन पार्क मैदानावरील खेळपट्टी

एंड्स

मैदानाजवळ असलेल्या एल्गिन मिल आणि डीएव्ही कॉलेजमुळे येथील एंडला मिल एंड आणि होस्टेल एंड अशी नावे दिली गेली आहेत.

खेळपट्टी

मैदानाची खेळपट्टी नेहमीच फिरकी गोलंदाजांना मदत करत असलेली आहे. जसु पटेल, सुभाष गुप्ते आदींनी याचा फायदा घेतला.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांची यादी

[संपादन]

कसोटी सामने

[संपादन]

ह्या मैदानांवर खेळवल्य गेलेल्या कसोटी सामन्यांची यादी खालीलप्रमाणे आहे.[५]

दिनांक यजमान संघ विरोधी संघ निकाल फरक धावफलक
१२–१४ जानेवारी १९५२ भारतचा ध्वज भारत इंग्लंडचा ध्वज इंग्लंड पराभूत ८ गडी राखून धावफलक
१२–१७ डिसेंबर १९५८ भारतचा ध्वज भारत वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज पराभूत २०३ धावा धावफलक
१९–२४ डिसेंबर १९५९ भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया विजयी ११९ धावा धावफलक
१६–२१ डिसेंबर १९६० भारतचा ध्वज भारत पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान अनिर्णित - धावफलक
१–६ डिसेंबर १९६१ भारतचा ध्वज भारत इंग्लंडचा ध्वज इंग्लंड अनिर्णित - धावफलक
१५–२० फेब्रुवारी १९६४ भारतचा ध्वज भारत इंग्लंडचा ध्वज इंग्लंड अनिर्णित - धावफलक
१५–२० नोव्हेंबर १९६९ भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया अनिर्णित - धावफलक
२५–३० जानेवारी १९७३ भारतचा ध्वज भारत इंग्लंडचा ध्वज इंग्लंड अनिर्णित - धावफलक
१८–२३ नोव्हेंबर १९७६ भारतचा ध्वज भारत न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड अनिर्णित - धावफलक
२–८ फेब्रुवारी १९७९ भारतचा ध्वज भारत वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज अनिर्णित - धावफलक
२–७ ऑक्टोबर १९७९ भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया विजयी २५३ धावा धावफलक
२५–३० डिसेंबर १९७९ भारतचा ध्वज भारत पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान अनिर्णित - धावफलक
३० जानेवारी – ४ फेब्रुवारी १९८२ भारतचा ध्वज भारत इंग्लंडचा ध्वज इंग्लंड अनिर्णित - धावफलक
२१–२५ ऑक्टोबर १९८३ भारतचा ध्वज भारत वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज पराभूत १ डाव आणि ८३ धावा धावफलक
३१ जानेवारी – ५ फेब्रुवारी १९८५ भारतचा ध्वज भारत इंग्लंडचा ध्वज इंग्लंड अनिर्णित - धावफलक
१७–२२ डिसेंबर १९८६ भारतचा ध्वज भारत श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका अनिर्णित - धावफलक
८–१२ डिसेंबर १९९६ भारतचा ध्वज भारत दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका विजयी २८० धावा धावफलक
२२–२५ ऑक्टोबर १९९९ भारतचा ध्वज भारत न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड विजयी ८ गडी धावफलक
२०–२४ नोव्हेंबर २००४ भारतचा ध्वज भारत दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका अनिर्णित - धावफलक
११–१३ एप्रिल २००८ भारतचा ध्वज भारत दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका विजयी ८ गडी धावफलक
२४–२७ नोव्हेंबर २००९ भारतचा ध्वज भारत श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका विजयी १ डाव आणि १४४ धावा धावफलक
२२–२६ सप्टेंबर २०१६ भारतचा ध्वज भारत न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड विजयी १९७ धावांनी धावफलक

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय

[संपादन]

ह्या मैदानांवर खेळवल्या गेलेल्या कसोटी सामन्यांची यादी खालीलप्रमाणे आहे.[६]

दिनांक स्पर्धा संघ १ संघ २ विजेते फरक धावफलक नोंदी
बुधवार, २४ डिसेंबर १९८६ द्विदेशीय मालिका भारतचा ध्वज भारत श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका श्रीलंका ११७ धावा धावफलक
बुधवार, २१ ऑक्टोबर १९८७ रिलायन्स विश्वचषक श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज वेस्ट इंडीज २५ धावा धावफलक
बुधवार, २५ ऑक्टोबर १९८९ नेहरु चषक भारतचा ध्वज भारत इंग्लंडचा ध्वज इंग्लंड भारत ६ गडी धावफलक
रविवार, ७ नोव्हेंबर १९९३ हिरो चषक भारतचा ध्वज भारत श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका भारत ७ गडी धावफलक जवागल श्रीनाथ २४-५
रविवार, ३० ऑक्टोबर १९९४ विल्स विश्व मालिका भारतचा ध्वज भारत वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज वेस्ट इंडीज ४६ धावा धावफलक
बुधवार, ६ मार्च १९९६ विल्स विश्वचषक भारतचा ध्वज भारत झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे भारत ४० धावा धावफलक
मंगळवार, ७ एप्रिल १९९८ पेप्सी त्रिकोणी मालिका भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया भारत ६ गडी धावफलक
सोमवार, ११ डिसेंबर २००० द्विदेशीय मालिका भारतचा ध्वज भारत झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे भारत ९ गडी धावफलक
सोमवार, २८ जानेवारी २००२ द्विदेशीय मालिका भारतचा ध्वज भारत इंग्लंडचा ध्वज इंग्लंड भारत ८ गडी धावफलक
शुक्रवार, १५ एप्रिल २००५ द्विदेशीय मालिका भारतचा ध्वज भारत पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान पाकिस्तान ५ गडी धावफलक
रविवार, ११ नोव्हेंबर २००७ द्विदेशीय मालिका भारतचा ध्वज भारत पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान भारत ४६ धावा धावफलक
गुरुवार, २० नोव्हेंबर २००८ द्विदेशीय मालिका भारतचा ध्वज भारत इंग्लंडचा ध्वज इंग्लंड भारत १६ धावांनी धावफलक
बुधवार, २७ नोव्हेंबर २०१३ द्विदेशीय मालिका भारतचा ध्वज भारत वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज भारत ५ गडी धावफलक
रविवार, ११ ऑक्टोबर २०१५ गांधी-मंडेला मालिका भारतचा ध्वज भारत दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका ५ धावा धावफलक द.आ. ३०३/५; रोहित शर्मा १५० (१३३)

आंतरराष्ट्रीय टी२०

[संपादन]

ह्या मैदानांवर खेळवल्या गेलेल्या टी२० सामन्यांची यादी खालीलप्रमाणे आहे.[७]

दिनांक संघ १ संघ २ निकाल फरक धावफलक
२६ जानेवारी २०१७ भारतचा ध्वज भारत इंग्लंडचा ध्वज इंग्लंड इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ५ धावा धावफलक

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "कानपूरमध्ये आयपीएलचा ज्वर" (इंग्रजी भाषेत). ३ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  2. ^ "ग्रीन पार्क कानपूर टिकेट्स प्रेडिक्शन हायलाईट्स शेड्यूल" (इंग्रजी भाषेत). 2017-12-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ३ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  3. ^ "कानपूर बोस्ट्स वर्ल्ड्स लार्जेस्ट मॅन्युएली ऑपरेटेड स्कोअरबोर्ड". इंडिया टीव्ही (इंग्रजी भाषेत). ३ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  4. ^ ग्रीन पार्कने मिळवून दिला भारताला ऑस्ट्रेलियावर पहिला विजय
  5. ^ ग्रीन पार्क, कानपूर / नोंदी / कसोटी सामने / निकाल
  6. ^ ग्रीन पार्क, कानपूर / नोंदी / आंतरराष्ट्रीय एकदिवसीय / निकाल
  7. ^ ग्रीन पार्क, कानपूर / नोंदी / आंतरराष्ट्रीय टी२० / निकाल