संगमेश्वर तालुका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
  ?देवरुख तालुका
संगमेश्वर तालुका
महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
महाराष्ट्र राज्य
महाराष्ट्र राज्य
गुणक: (शोधा गुणक)
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
मोठे शहर देवरुख
जवळचे शहर रत्नागिरी
प्रांत महाराष्ट्र
विभाग कोकण
जिल्हा रत्नागिरी
भाषा मराठी
तहसील संगमेश्वर तालुका
पंचायत समिती संगमेश्वर तालुका
कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• +०२३५४
• MH ०८


वर्णन[संपादन]

संगमेश्वर तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रत्‍नागिरी जिल्ह्याचा एक तालुका आहे. संगमेश्वर तालुक्याच्या उत्तरेला चिपळूण, दक्षिणेला लांजा, पश्चिमेला रत्नागिरी व वायव्येला गुहागर हे तालुके आहेत. पूर्वेला सातारा, सांगली व कोल्हापूर हे जिल्हे आहेत.

संगमेश्वर तालुक्याचे क्षेत्रफळ सुमारे ५७६ मैल आहे. तसेच या तालुक्यात सुमारे १९० गावे आहेत.

मुख्यालय[संपादन]

पूर्वी संगमेश्वर तालुक्याचे मुख्यालय हे संगमेश्वर गावातच होते. पण १८७८ साली तिथे भीषण आग लागली आणि सर्व सरकारी इमारती जळाल्या. तेव्हा संगमेश्वर तालुक्याचे मुख्यालय देवरुख या गावात हलविले आणि तालुक्याचे मुख्य ठिकाण देवरुख हे झाले. संगमेश्वर तालुक्याचे पंचायत समिती कार्यालय हे देवरुखला आहे.

जिल्हापरिषद गट[संपादन]

संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी जिल्हा परिषदेचे गट -

१. कडवई

२. धामपूर संगमेश्वर

३. कसबा संगमेश्वर

४. नावडी

५. साडवली

६. देवरुख

७. ओझरे खुर्द

८. दाभोळे

पंचायत समिती गट[संपादन]

संगमेश्वर पंचायत समिती गट-

१. कडवई

२. धामणी

३. आरवली

४. धामापूर संगमेश्वर

५. कळंबस्ते

६. कसबा

७. आंबेड बुद्रुक

८. नावडी

९. मुचरी

१०. साडवली

११. निवे खुर्द

१२. देवरुख

१३. ओझरे खुर्द

१४. मोर्डे

१५. दाभोळे

१६. कोंडगाव