काजळी नदी
Appearance
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
काजळी नदी | |
---|---|
कोंडगाव येथील काजळी नदीचे पात्र | |
इतर नावे | गड नदी, केव नदी |
उगम | सह्याद्री डोंगर, रत्नागिरी जिल्हा, महाराष्ट्र |
मुख | भाटे, रत्नागिरी |
ह्या नदीस मिळते | काजळी नदी |
उपनद्या | गड नदी, केव नदी |
काजळी नदी ही रत्नागिरी जिल्ह्यातील एक नदी आहे. जिल्ह्यातील संगमेश्वर, लांजा व रत्नागिरी या तीन तालुक्यांतून ती वाहते.
नदीचा उगम आणि संगम
[संपादन]केव नदी व गड नदी यांचा संगम होऊन ती काजळी या नावाने पुढे ओळखली जाते. केव नदीचा उगम सह्याद्री डोंगर रांगात आंबा घाटाजवळ तर देवडे या विशाळगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या गावाजवळ गड नदीचा उगम होतो व तिथून किरबेट,भोंवडे आणि भडकंबा या गावातून प्रवाह करत थेट कोंडगाव मध्ये येऊन केव नदीला साखरपा येथे गड नदी येऊन मिळते. काजळी नदी पश्चिम वाहिनी असून रत्नागिरीजवळ भाट्ये या गावाजवळ ती अरबी समुद्राला जाऊन मिळते व तेथे भाट्याची खाडी तयार होते.