Jump to content

हापूस आंबा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हापूस ही एक आंब्याची जात आहे. हापूस आंबा त्याच्या उत्तम चवीसाठी व अप्रतिम गोडीसाठी प्रसिद्ध आहे. रत्‍नागिरी आणि देवगड परिसरातील मिळणारा आंबा आहे.

नावाची व्युत्पत्ती

[संपादन]

अफोन्सो दि आल्बुकर्क या पोर्तुगीज दर्यावर्दी वरून या आंब्याला अल्फान्सो हे नाव मिळाले. याचा अपभ्रंश होऊन भारतीय भाषांमध्ये याला हापूस असे म्हणतात.

उत्पादक प्रदेश

[संपादन]

हापूसचे उत्पादन पश्चिम भारतात प्रामुख्याने कोकणात होते. याचा मोसम एप्रिलमे मध्ये असतो. महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग, रत्‍नागिरी येथील हापूस आंबे उत्तम मानले जातात.

पदार्थ

[संपादन]

हापूस पासून आंबापोळी, आंबावडी, आमरस, आम्रखंड, आंबा मोदक इत्यादी पदार्थ बनवले जातात.

भौगोलिक निर्देशांक

[संपादन]

हापूस आंब्याला भौगोलिक निर्देशांकासाठी तत्त्वता मान्यता मिळाली आहे. देवगड हापूस आंबा व रत्‍नागिरी हापूस आंबा असे दोन स्वतंत्र भौगोलिक निर्देशांक हापूस आंब्याला बहाल करण्यात आले आहे.