रत्‍नागिरी तालुका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
  ?रत्‍नागिरी तालुका
महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
महाराष्ट्रराज्य
महाराष्ट्रराज्य
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
भाषा मराठी
तहसील रत्‍नागिरी तालुका
पंचायत समिती रत्‍नागिरी तालुका


रत्‍नागिरी तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रत्‍नागिरी जिल्ह्याचा एक तालुका आहे. याच तालुक्यात रत्‍नागिरी शहर आहे.

पर्यटन वैशिष्ट्ये[संपादन]

गणपतीपुळे हे प्रसिद्ध गणपतीचे मंदिर याच तालुक्यात आहे. पावस येथे श्री स्वरूपानंद स्वामींची समाधी आहे. रत्नागिरी शहरातील टिळक आळी येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे जन्मस्थळ आहे. जगद्गुरु स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचे जन्मस्थान असलेले नाणीज हे गाव याच तालुक्यात आहे.

उद्योगधंदे[संपादन]

रनपार गावी फिनोलेक्स कंपनीचा कारखाना आहे.

गट आणि गण[संपादन]

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी गावांचे गट पाडले जातात्त. साधारणपणे ३० ते ३५ हजार लोकसंख्येसाठी एक गट आणि एका गटात दोन गण म्हणजे प्रत्येकी पंधरा हजार लोकसंख्येचा एक गण असतो. एका गणात किंवा गटात अनेक खेडी येऊ शकतात.


रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी पाडलेले गावांचे गट (एकूण ८)-

१. वाटद

२. करबुडे

३. कोतवडे

४. शिरगाव

५. हातखंबा

६. नाचणे

७. गोळप

८. पावस


रत्नागिरी तालुक्यातील पंचायत समितीच्या निवडणुकीसाठीचे गण (एकूण १६)-

१. वाटद

२. मालगुंड

३. करबुडे

४. देऊड

५. कोतवडे

६. कासारवेली

७. शिरगाव

८. मिरजोळे

९. हातखंबा

१०. पाली

११. नाचणे

१२. कार्ला

१३. गोळप

१४. हरचेरी

१५. पावस

१६. गावखडी


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

साचा:रत्नागिरी जिल्ह्यातील तालुके