आमसूल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
आमसूल
रातांब्याची फळे

आमसूल यालाच कोकम किंवा रातांबा असेही म्हणतात. आमसूल हे भारतीय भाषांमधून खालील वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते -

  • संस्कृत-अत्यम्ला, तिंतिडीकम्‌
  • हिंदी-कोकम
  • बंगाली-महादा, तेंतुल
  • कानडी-मुलगला
  • गुजराती-कोकम
  • मल्याळम-पुनमचुली
  • इंग्रजी-Kokam Butter tree/Wild Mangostein
  • लॅटिन-Garcinia Indica

वर्णन[संपादन]

हा एक छोटा व झुकलेल्या फांद्यांचा वृक्ष असतो. याची पाने २.५ ते ३.५ इंच लांब व गडद हिरव्या रंगाची असतात.

लागवडीचे प्रदेेश[संपादन]

कोकण, गोवा, कर्नाटक, पश्चिम घाट

उपयोग[संपादन]

आयुर्वेदानुसार - अर्श, शूल, उदरकृमी, अरुची, पित्त इ. रोगांत. आमसुलापासून तेलही निघते. ते व्रणरोपक व तळपायांच्या भेगांवर उपयोगी आहे.

इतर उपयोग - स्वयंपाकात-आंबटपणासाठी, उन्हाळ्यात सरबत म्हणून. आमसुलाचे सार करतात, त्याला कोकमसार म्हणतात. अन्‍नपचनासाठी हे जेवताना अधूनमधून पितात.

हे सुद्धा पहा[संपादन]