Jump to content

राजापूर तालुका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

  ?राजापूर

महाराष्ट्र  भारत
  तालुका  
Map

१६° ४०′ १२″ N, ७३° ३१′ १२″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
भाषा मराठी
तहसील राजापूर
पंचायत समिती राजापूर


राजापूर तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रत्‍नागिरी जिल्ह्याचा एक तालुका आहे.

हवामान

[संपादन]

तालुक्यात मे महिन्यात सरासरीपेक्षा जास्त तापमान असेल.उष्णतेच्या लाटा नेहमीप्रमाणे असतील.[]

ऐतिहासिक माहिती

[संपादन]

राजापूर हे ऐतिहासिक काळात कोकणातील उत्तम बाजारपेठेचे ठिकाण होते. अर्जुना नदी ज्या ठिकाणी सागराला मिळते त्याठिकाणी निर्माण झालेल्या खाडीवर हे बंदर असल्याने कोकणातील इतर बंदरापेक्षा हे बंदर अधिक सुरक्षित होते. राजापुरात इंग्रजांची वखारही होती, त्याचे अवशेष आजही नदीच्या काठावर पडक्या इमारतीच्या रूपात पहावयास मिळतात. धूतपापेश्वर हे देवस्थान राजापुरातच आहे. शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने हे शहर पावन झालेले आहे. जुन्या काळातच एक महत्त्वाची धर्मसभाही या ठिकाणी झाल्याची इतिहासात नोंद आहे.

राजापूरची गंगा

[संपादन]

राजापूरची गंगा ही तर ऐतिहासिक काळापासून प्रसिद्ध आहे. एका उंच टेकडीवरील जमिनीला लागून असलेल्या १४ कुंड अचानक पाण्याने भरून जातात. साधारण तीन वर्षांतून एकदा हा निसर्ग चमत्कार पहायला मिळतो. या वाहत्या पाण्याला राजापूरची गंगा म्हणतात. ही गंगा उगम पावते आणि साधारणपणे तीन महिने रहाते.

उन्हाळे येथील गरम पाण्याचे झरे

[संपादन]

उन्हाळे- गरम पाण्याचे झरे. सदा सर्वदा अतिशय गरम असलेले हे पाण्याचे झरे इथे आहेत. या पाण्यात आंघोळ केल्याने बारीक-सारीक त्वचा रोग बरे होतात. त्यामुळे सदैव इथे गर्दी असते.

सर्वसामान्य माहिती

[संपादन]

राजापूरचा आंबा प्रसिद्ध आहे. राजापुरी भल्या मोठ्या कैऱ्या लोणच्यासाठी आणि पन्ह्यासाठी उत्तम असतात.

तालुक्यातील गावे

[संपादन]

हे सुद्धा पहा

[संपादन]
रत्‍नागिरी जिल्ह्यातील तालुके
मंडणगड तालुका | दापोली तालुका | खेड तालुका | चिपळूण तालुका | गुहागर तालुका | संगमेश्वर तालुका | रत्‍नागिरी तालुका | लांजा तालुका | राजापूर तालुका
  1. महाराष्ट्र टाईम्स, गुरुवार दिनांक ०२ मे २०२४.