फणस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फणसाच्या झाडाला लागलेले फणस
फणस
बरक्या फणसाचे गरे

फणस हे एक प्रकारचे फळ आहे. फणस हा आकाराने मोठा असतो. फणसाच्या आवरणाला चारखंड असे म्हणतात. चारखंडाला काट्यासारखा टोकदार भाग असतो. फणसाच्या आतील भागात मधोमध काठीसारखा भाग असतो. त्याला पाव असे म्हणतात. त्यालाच गरे लागलेले असतात. गऱ्यामध्ये बी असते. त्यला आठल असे म्हणतात.

प्रकार[संपादन]

फणसाचे दोन प्रमुख प्रकार असतात:-

बरका[संपादन]

बरका ही फणसाची एक जात आहे. हा फणस हा अधिक मधुर आणि रसाळ असतो. बरका फणस हा प्रामुख्याने कोकणात आढळून येतो.

कापा[संपादन]

कापा ही फणसाची एक जात आहे. हा फणस हा बरक्या फणसापेक्षा कमी गोड आणि रसाळ असतो. कापा फणस हा प्रामुख्याने देशावर आढळून येतो.

विलायती फणस[संपादन]

फणसाच्या कापा आणि बरका याप्रमाणेच विलायती फणस हि सुद्धा एक जात आहे. या जातीचा फणस प्रामुख्याने भाजीसाठी वापरतात.

लागवड[संपादन]

महाराष्ट्रातील कोकण भागात याची प्रामुख्याने लागवड होते. तसेच देशावर किंवा घाटावर ही फणस आढळून येतात. फणसाचे झाड हे आकाराने मोठे असते.

फणसापासून तयार केले जाणारे पदार्थ[संपादन]

  • फणसाच्या साकट्याची भाजी
  • फणसाच्या कच्या गऱ्याची भाजी
  • सांजणे (फणस इडली)
  • तळलेले गरे
  • फणसाची साठे (फणस पोळी)
  • आठलांची भाजी
  • पावेची भाजी
  • उकडलेल्या आठला

फणसाचे गरे खाल्यावर त्यावर विडयाचे पान खाऊ नये. तसे करणे हे विरुद्धाशन आहे.

बाह्य दुवे[संपादन]

  • मराठी विश्वकोष. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ. (मराठी मजकूर)


हे सुद्धा पहा[संपादन]