केव नदी
Appearance
केव नदी ही रत्नागिरी जिल्ह्यातील एक नदी आहे. तिचा व गड नदी यांचा संगम होऊन ती काजळी या नावाने पुढे ओळखली जाते. केव नदीचा उगम सह्याद्री पर्वतात आंबा घाटाजवळ तर देवडे या विशाळगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या गावाजवळ होतो. केव नदीला साखरपा येथे गड नदी येऊन मिळते.
काजळी नदी पश्चिमवाहिनी असून रत्नागिरीजवळ भाट्ये या गावाजवळ ती अरबी समुद्राला जाऊन मिळते व तेथे भाट्याची खाडी तयार होते.