Jump to content

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मुंबई सीएसएमटी या पानावरून पुनर्निर्देशित)
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस

छ.शि.म.ट.
मध्य रेल्वे टर्मिनस
मुंबई उपनगरी रेल्वे टर्मिनस
स्थानक तपशील
पत्ता डॉ. दादाभाई नौरोजी मार्ग (हॉर्नबी रोड) मुंबई
गुणक 18°56′24″N 72°50′07″E / 18.94°N 72.8353°E / 18.94; 72.8353
मार्ग मध्य, हार्बर
फलाट १८
इतर माहिती
उद्घाटन मे १८८८
विद्युतीकरण होय
संकेत CSMT, VT
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग मध्य रेल्वे
स्थान
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस is located in मुंबई
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस
मुंबईमधील स्थान
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसची ऐतिहासिक इमारत

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), आधीचे नाव व्हिक्टोरिया टर्मिनस (व्हीटी), बोरीबंदर हे मुंबई शहरामधील एक ऐतिहासिक व सर्वात मोठे रेल्वे स्थानक आहे. ते युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आणि त्यासोबत मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे. मुंबईच्या बोरीबंदर भागात असलेले हे स्थानक बोरीबंदर स्थानकाच्या जागेवर इ.स. १८८७ मध्ये व्हिक्टोरिया राणीच्या राज्याभिषेकाच्या सुवर्णजयंतीनिमित्त बांधण्यात आले. येथे १८ फलाट असून फलाट क्र. १ ते ७ हे मुंबई उपनगरी मार्गिकेवरील स्थानकांचे आहेत. फलाट क्र. ८ ते १८ हे मुख्य मार्गिकेवरील असून तेथून लांब पल्ल्याच्या पॅसेंजर / जलद गाड्या मार्गस्थ होतात.

छशिमट वरून सुटणाऱ्या रेल्वेगाड्यांची यादी

[संपादन]
क्रमांक आगगाडीचे नाव गंतव्यस्थान कधी सुटण्याची वेळ
११०९३ महानगरी एक्सप्रेस वाराणसी रोज ००:१०
२२१०५ इंद्रायणी एक्सप्रेस पुणे रोज ०५:४०
१२८५९ गीतांजली एक्सप्रेस हावडा रोज ०६:००
१७६१७ तपोवन एक्सप्रेस नांदेड रोज ०६:१५
१२१२७ इंटरसिटी एक्सप्रेस पुणे रोज ०६:४०
११००७ डेक्कन एक्सप्रेस पुणे रोज ०७:००
१०१०३ मांडवी एक्सप्रेस मडगांव रोज ०७:१०
११३०१ उद्यान एक्सप्रेस बंगळूर सिटी रोज ०८:०५
१२५३४ पुष्पक एक्सप्रेस लखनऊ रोज ०८:२०
११०२९ कोयना एक्सप्रेस कोल्हापूर रोज ०८:४०
१२३६२ आसनसोल एक्सप्रेस आसनसोल बुध ११:०५
१२८६९ हावडा एक्सप्रेस हावडा रवि ११:०५
१६३५१ बालाजी एक्सप्रेस (तिरुपती मार्गे) नागरकोईल मंगळ, शनि १२:१०
१६३३१ तिरुअनंतपुरम एक्सप्रेस तिरुअनंतपुरम सोम १२:१०
१६३३९ नागरकोईल एक्सप्रेस नागरकोईल रवि, बुध, गुरू, शुक्र १२:१०
१७०३१ हैदराबाद एक्सप्रेस हैदराबाद रोज १२:४५
१२१८८ गरीबरथ एक्सप्रेस जबलपूर मंगळ, गुरू, शनि १३:३०
११०४१ चेन्नई एक्सप्रेस चेन्नई रोज १४:००
१२५९८ गोरखपूर जनसाधारण एक्सप्रेस गोरखपूर बुध १४:२०
११००९ सिंहगड एक्सप्रेस पुणे रोज १४:३०
१२१३९ सेवाग्राम एक्सप्रेस नागपूर रोज १५:००
११०१९ कोणार्क एक्सप्रेस भुवनेश्वर रोज १५:१०
१६३८१ जयंती जनता एक्सप्रेस कन्याकुमारी रोज १५:४५
१२१२५ प्रगती एक्सप्रेस पुणे रोज १६:२५
११४०१ नंदीग्राम एक्सप्रेस (नांदेड मार्गे) बललारशाह रोज १६:३५
१२१२३ डेक्कन क्वीन पुणे रोज १७:१०
१२२६१ दुरांतो एक्सप्रेस हावडा रवि, मंगळ, बुध, गुरू १७:१५
१२१०९ पंचवटी एक्सप्रेस मनमाड रोज १८:१५
१२१०५ विदर्भ एक्सप्रेस गोंदिया रोज १९:१०
१२१३७ पंजाब मेल फिरोजपूर रोज १९:४०
१२१११ अमरावती एक्सप्रेस अमरावती रोज २०:०५
१२२८९ दुरांतो एक्सप्रेस नागपूर रोज २०:१५
१७४११ महालक्ष्मी एक्सप्रेस कोल्हापूर रोज २०:२३
१२८०९ हावडा मेल (नागपूर मार्गे) हावडा रोज २०:३५
२२१०७ लातूर एक्सप्रेस लातूर बुध,शुक्र,शनि २१:००
१७०५७ देवगिरी एक्सप्रेस सिकंदराबाद रोज २१:१०
११३०५ सोलापूर एक्सप्रेस सोलापूर गुरू सोडून २१:२०
१२३२२ हावडा मेल (अलाहाबाद मार्गे) हावडा रोज २१:३०
१२७०१ हुसेनसागर एक्सप्रेस हैदराबाद रोज २१:५०
१२१३३ मंगळूर एक्सप्रेस मंगळूर रोज २२:००
१२११५ सिद्धेश्वर एक्सप्रेस सोलापूर रोज २२:४५
१०१११ कोकण कन्या एक्सप्रेस मडगांव रोज २३:०५
११०५७ अमृतसर पठाणकोट एक्सप्रेस अमृतसर रोज २३:३०
११०११ धुळे एक्सप्रेस धुळे रोज १२:००
११०२७ चेन्नई मेल चेन्नई रोज २३:४५
२२२२१ राजधानी एक्सप्रेस हजरत निजामुद्दीन बुध,शनि १४:५०
सेंट थॉमस कॅथेड्रल (c. 1855-1862) पासून दिसणारे बोरी बंदर.

महाराष्ट्राचे आश्चर्य

[संपादन]

महाराष्ट्राच्या ७ आश्चर्यांपैकी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे एक आश्चर्य ठरले आहे.[] महाराष्ट्रातील अद्भुत आणि देखण्या सात आश्चर्यांची जून २०१३ मध्ये घोषणा करण्यात आली. शांती-सद्भावनेचे प्रतीक ग्लोबल पॅगोडा, मुंबईच्या मध्य रेल्वेचे मुख्यालय सीएसएमटी स्थानक, मध्ययुगीन काळातील एक अभेद्य किल्ला दौलताबाद किल्ला, पश्चिम घाटातील कास पठार, स्वराज्याची दुसरी राजधानी रायगड किल्ला, बुलढाण्यातील लोणार सरोवर, औरंगाबादमधील अजिंठा लेणी ही महाराष्ट्राची सात आश्चर्ये आहेत.

जगभरातून मिळालेल्या २२ लाख मतांच्या आधारावर महाराष्ट्रातील सात आश्चर्य निवडली गेली आहेत. जागतिक स्तरावर जशी सात आश्चर्ये निवडली गेली, त्याच धर्तीवर ‘एबीपी माझा’ने महाराष्ट्रातूनही सेव्हन वंडर्स ऑफ महाराष्ट्रा कार्यक्रमाच्या माध्यमातून सात आश्चर्य निवडली. डॉ. जगदीश पाटील, डॉ. अरुण टिकेकर, राजीव खांडेकर, श्री. अरविंद जामखेडकर, डॉ. निशिगंधा वाड, श्री. विकास दिलावरी, श्री. व्ही. रंगनाथन या सात ज्युरींने निवडलेल्या १४ आश्चर्यांपैकी सात आश्चर्यांची निवड करण्यात आली.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "महाराष्ट्रातील सात आश्चर्यांची घोषणा". 2018-01-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-10-21 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
मुंबई उपनगरी रेल्वे: मध्य उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
मशीद
स्थानक क्रमांक: मुंबई छशिमटपासूनचे अंतर: कि.मी.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
मुंबई उपनगरी रेल्वे: हार्बर उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
मशीद
स्थानक क्रमांक: मुंबई छशिमटपासूनचे अंतर: कि.मी.