लखनौ चारबाग रेल्वे स्थानक
Appearance
(लखनऊ रेल्वे स्थानक या पानावरून पुनर्निर्देशित)
लखनौ भारतीय रेल्वे स्थानक | |
---|---|
स्थानकाची इमारत | |
स्थानक तपशील | |
पत्ता | चारबाग, लखनौ, उत्तर प्रदेश |
गुणक | 26°49′55″N 80°55′8″E / 26.83194°N 80.91889°E |
मार्ग |
लखनौ-कानपूर उपनगरी रेल्वे मार्ग लखनौ-वाराणसी मार्ग लखनौ-नवी दिल्ली मार्ग |
जोडमार्ग | लखनौ मेट्रो |
फलाट | ९ (LKO) + ६ (LJN) |
इतर माहिती | |
उद्घाटन | इ.स. १९२३ |
विद्युतीकरण | होय |
संकेत | LKO व LJN |
मालकी | रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे |
विभाग | उत्तर रेल्वे |
स्थान | |
|
लखनौ चारबाग हे उत्तर प्रदेशच्या लखनौ शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. उत्तर रेल्वे क्षेत्राच्या लखनौ विभागाचे मुख्यालय असलेले लखनौ उत्तर प्रदेशातील सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक आहे. हे स्थानक लखनौच्या चारबाग ह्या भागात स्थित असून लखनौ जंक्शन हे रेल्वे स्थानक चारबाग स्थानकाला लागूनच आहे व अनेकदा ते चारबाग स्थानकाचाच एक भाग मानले जाते. येथून रोज सुमारे ८५ गाड्या सुटतात तर ३०० गाड्यांचा येथे थांबा आहे.
लखनौ चारबाग स्थानकाच्या इमारतीचे बांधकाम १९१४ साली चालू झाले व १९२३ साली पूर्ण झाले. स्थानकाच्या बाहेरच एक मोठे उद्यान असून स्थानकाच्या वास्तूरचनेमध्ये अवधी व मोगलाई ठसा आढळतो व हे स्थानक भारतामधील सर्वात सुंदर रेल्वे स्थानकांपैकी एक मानले जाते.
प्रमुख रेल्वेगाड्या
[संपादन]- लखनौ−मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस पुष्पक एक्सप्रेस
- लखनौ−नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेस
- लखनौ−नवी दिल्ली गोमती एक्सप्रेस
- लखनौ मेल
- जम्मू तावी−हावडा हिमगिरी एक्सप्रेस
- लखनौ−अलाहाबाद गंगा गोमती एक्सप्रेस