Jump to content

गेटवे ऑफ इंडिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भारताचे प्रवेशद्वार
विजय स्मारक (आर्च)
स्थापना1924 संपादन
मूळ लेबलGateway of India संपादन
देशभारत संपादन
या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थानमुंबई जिल्हा संपादन
स्थानकुलाबा संपादन
पाणीसाठ्याजवळअरबी समुद्र संपादन
भौगोलिक गुणक१८°५५′१९″N ७२°५०′५″E संपादन
मालक संस्थाभारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग संपादन
वास्तुविशारदजॉर्ज विटेट संपादन
स्थापत्यशास्त्रातील शैलीइंडो-सारासेनिक रिव्हायवल आर्किटेक्चर संपादन
अधिकृत उद्घाटनाचा दिनांक४ डिसेंबर 1924 संपादन
वारसा अभिधानState Protected Monument संपादन
Map

गेटवे ऑफ इंडिया ही दक्षिण मुंबईमधील एक इमारत आहे. १९११ मध्ये पाचवा जॉर्ज आणि राणी मेरी यांनी भारताला दिलेल्या भेटीचे स्मारक म्हणून ही भव्य कमान बांधण्यात आली होती. याची पायाभरणी ३१ मार्च, १९१३ रोजी करण्यात आली व १९२४ मध्ये ही इमारत बांधून पूर्ण झाली. हिची रचना इंडो-सारासेनिक शैलीत केली गेली आहे. त्याचे १६ व्या शतकातील गुजराती स्थापत्यांतील काही नमुनेही आढळतात. बेसाॅल्ट दगडांनी बांधलेली ही कमान २६ मीटर (८५ फूट) उंचीची आहे.

यानंतर गेट वे ऑफ इंडिया ही व्हिक्टोरिया राणीसाठी व बॉम्बेचे नवे राज्यपाल यांच्यासाठी भारताचे प्रतीक म्हणून वापरात आली. गेटवे ऑफ इंडिया ही इमारत दक्षिण मुंबईतील शिवाजी मार्गाच्या शेवटी अपोलो बंदर परिसरात असलेल्या वॉटरफ्रंटवर आहे. ही इमारत शहराचे प्रमुख पर्यटन आकर्षण आहे.

इतिहास

[संपादन]

गेटवे ऑफ इंडिया, बॉम्बे, १९२४,
गेटवे ऑफ इंडियावरील शिलालेखात असे म्हणले आहे की, "एमसीएमएक्सआय (MCMXI -रोमन अंकलेखनपद्धतीनुसार १९११) डिसेंबरच्या दुसऱ्या दिवशी दिल्ली दरबारापूर्वी किंग जॉर्ज पाचवा आणि क्वीन मेरी यांनी हिंदुस्तानला दिलेल्या भेटीच्या आठवणींसाठी गेटवे ऑफ इंडिया तयार करण्यात आले होते. मात्र,१९११ साली या इमारतीचा नुसता आराखडा तयार झाला होता. ३१ मार्च १९१४ रोजी बाॅम्बेचे राज्यपाल सर जॉर्ज सिडेनहॅम क्लार्क यांनी गेटवे ऑफ इंडिया बांधण्यासाठी मंजूरी दिली. व बांधकाम १९१५ साली सुरू करण्यात आले.

रावबहादूर यशवंतराव देसाई चौक

[संपादन]

गेट वे ऑफ इंडिया आणि ताजमहाल हॉटेलच्या जवळ असलेल्या चौकाला रावबहादूर यशवंतराव देसाई चौक असे बृहन्मुंबई महानगरपालिकेने नाव दिलेले आहे.[]

घटना

[संपादन]

२५ ऑगस्ट २००३ रोजी एका बॉम्बस्फोटामुळे गेटवे समोर उभे असलेले अनेक लोक जखमी झाल्यामुळे गेटवे ऑफ इंडियाच्या इमारतीसमोर मोठ्या प्रमाणावर दहशत पसरली होती. ताजमहाल हाॅटेल या शहरातील सर्वात जुन्या लक्झरी हॉटेलसमोर बॉम्ब असलेली टॅक्सी पार्क केलेली होती. ताजमहाल हाॅटेलजवळच्या कारच्या खिडक्या फोडल्या गेल्या आणि मोटारी खराब करण्यात आलल्या. स्फोटाच्या शक्तीने अनेक लोक समुद्रात उडून पडले असल्याची शक्यता आहे.

२००८ च्या मुंबई हल्ल्यांनंतर सर्व जेटी बंद करण्यात आल्या आणि बॉम्बे प्रेसिडेन्सी रेडिओ क्लबजवळ दोन नवी बांधकामे करण्यात आली.

Sunset at Gate Way of India - Mumbai
  1. महाराष्ट्र टाईम्स, मुंबई टाईम्स, मंगळवार,९ जुलै २०२४