महाराष्ट्रातील सात आश्चर्ये

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

महाराष्ट्रातील सात आश्चर्ये ही एबीपी माझा दूरचित्रवाणी चॅनलने सेव्हन वंडर्स ऑफ महाराष्ट्र कार्यक्रमाच्या माध्यमातून जगभरातून मिळालेल्या २२ लाख मतांच्या आधारावर 'महाराष्ट्रातील सात आश्चर्ये' निवडलेली आहेत. महाराष्ट्रातील अद्भुत आणि देखण्या सात आश्चर्यांची जून २०१३ मध्ये घोषणा करण्यात आली.[१]

सात आश्चर्ये[संपादन]

निवड झालेली महाराष्ट्रातील सात आश्चर्ये

नाव स्थान चित्र
विश्व विपश्यना पॅगोडा मुंबई Global Vipassana Pagoda 1.jpg
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई Chhatrapati Shivaji Terminus (formerly Victoria Terminus) - Lit up on Republic Day 2015 - Trail Lights.jpg
दौलताबादचा किल्ला औरंगाबाद जिल्हा DaulatabadFort.JPG
कास पठार सातारा जिल्हा Shadow play !.jpg
रायगड किल्ला रायगड जिल्हा Raigad fort towers.jpg
लोणार सरोवर बुलढाणा जिल्हा LonarCrater.jpg
अजिंठा लेणी औरंगाबाद जिल्हा 5 Ajanta Caves overview.jpg

नामनिर्देशित स्थळे[संपादन]

जगदीश पाटील, अरुण टीकेकर, राजीव खांडेकर, अरविंद जामखेडकर, निशीगंधा वाड, विकास दिलावरी, व्ही. रंगनाथन या वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर सात ज्युरींनी महाराष्ट्र राज्यातील सुमारे चारशे अद्भुत स्थळांमधून चौदा स्थळे निवडली आणि त्यानंतर या ज्युरीने निवडलेल्या १४ आश्चर्यांमधून लोकांच्या मतदानाद्वारे अंतिम ७ आश्चर्यांची निवड करण्यात आली.

 1. ग्लोबल पॅगोडा
 2. रायगड किल्ला
 3. लोणार सरोवर
 4. वरळी सी-लिंक
 5. कैलास मंदिर
 6. अजिंठा लेणी
 7. रामटेक
 8. बिबी का मकबरा
 9. दौलताबादचा किल्ला
 10. कोयना धरण
 11. झुलते मनोरे-फरकांडे
 12. कास पठार
 13. छत्रपती शिवाजी टर्मिनस
 14. पाणचक्की

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]