Jump to content

कॉटन ग्रीन रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कॉटन ग्रीन रेल्वे स्थानक फलाट
कॉटन ग्रीन रेल्वे स्थानक

कॉटन ग्रीन हे मुंबईच्या मध्य रेल्वे (हार्बर) उपनगरीय मार्गावरील एक स्थानक आहे. १८ व्या शतकात इंग्रजाच्या किल्ल्यात (आजचा फोर्ट भाग) असलेले "सेंट थोमस चर्च" खूप "हिरवी" झाडे असलेल्या भूभागात (हिरवा पट्टा) होते. तसेच जवळच्या बंदरामुळे आसपास कापसाचे गड्डे साचून ठेवलेले दिसायचे. म्हणून या भागाला "कॉटन ग्रीन" (हिरवा कापूस) हे नाव पडले. १८४४ साली इथला कापसाचा व्यापार अजून दक्षिणेला म्हणजे कुलाब्याला हलवला गेला व त्या भागाला नाव पडले, "न्यू कॉटन ग्रीन". त्यानंतर परत शिवडी-माझगाव भागात रेक्लमेशन करून तयार झालेल्या नव्या भूभागात, कापसाचा व्यापार हलवला गेला व इथे एक मोठी कॉटन एक्सचेंज इमारत पण बांधण्यात आली. साहजिकच या समोर बांधण्यात आलेल्या रेल्वे स्थानकाला "कॉटन ग्रीन" असे नाव देण्यात आले.

कॉटन ग्रीन
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
रे रोड
मुंबई उपनगरी रेल्वे: हार्बर उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
शिवडी
स्थानक क्रमांक: मुंबई छशिमटपासूनचे अंतर: कि.मी.