लौजी रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लौजी

मुंबई उपनगरी रेल्वे स्थानक
स्थानक तपशील
पत्ता लौजी, रायगड जिल्हा
मार्ग मध्य मार्ग
इमारत प्रकार नाही
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण होय
संकेत LWJ
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग मध्य रेल्वे

लौजी हे मुंबई उपनगरी रेल्वेच्या मध्यम रेल्वेवरील कर्जत-खोपोली दरम्यानचे खोपोलीच्या आधीचे स्थानक आहे. खोपोलीहून सुटून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाण्यासाठी कर्जत-कल्याणमार्गे जाणाऱ्या दररोजच्या सहा लोकल्स लौजीला थांबतात. त्यांतील पाच लोकल जलद आहेत तर एक लोकल धिमी आहे. लौजी हे गाव रायगड जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यात येते. हा भाग अविकसित, डोंगराळ आहे. येथे फार कमी लोकसंख्या आहे.

लौजी
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
डोलवली
मुंबई उपनगरी रेल्वे: मध्य उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
खोपोली
स्थानक क्रमांक: ३९ मुंबई छशिमटपासूनचे अंतर: ११२ कि.मी.